मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ६१

शतश्लोकी - श्लोक ६१

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


प्राक् पश्चादस्ति कुंभाद्रगनमिदमिति प्रत्यये सत्यपीदं
कुम्भोत्पत्तावुदेति प्रलयमुगते नश्यतीत्यन्यदेशम् ।
नीते कुंभेन साकं व्रजति भजति वा तत्प्रमाणानुकारं
इत्थं मिथ्या प्रतीतिः स्फुरति तनुभृतां विश्वतस्तद्वदात्मा ॥६१॥

अन्वयार्थ-‘कुंभात् प्राक् पश्चात् च इदं गगनं अस्ति इति प्रत्यये (सति) अपि इदं कुभोत्पत्तौ उदेति-’ घटाच्या उत्पत्तीपूर्वीं व नाशानंतर हें आकाश असतें; असा प्रत्यय येत असूनहि हें घटाकाश घटोत्पत्ति झाली असतां उत्पन्न होतें, ‘प्रलय उपगते नश्यति अन्यदेशं नीते (सति) कुंभेन साकं व्रजति वा तत्प्रमाणानुकारं भजति-’ घट नष्ट होतांच तें नष्ट होतें, तो अन्य ठिकाणीं नेला असतां त्याच्या बरोबर जातें, व घटाच्या प्रमाणाचें होतें; ‘इत्थं तनुभृतां मिथ्या प्रतीतिः स्फुरति तद्वत् विश्वतः आत्मा (अस्ति) याप्रमाणें प्राण्यांना मिथ्याप्रतीति जशी होते, तसाच विश्वाच्या पूर्वीं व नंतर हा आत्मा असतो, पिण तो उत्पन्न होतो, लय पावतो इत्यादि मिथ्या ज्ञान होतें. श्रीमत् आचार्यांनीं पूर्वश्लोकांत ज्या सिद्धान्ताचें प्रतिपादन केलें, त्याचेंच ह्या श्लोकांत ते दृढीकरण करितात- हें आकाश सर्वदा स्वस्वरूपानें असतें; तरी घटाची उत्पत्ति झाली असतां महाकाशाहून निराळें असें घटाकाश उत्पन्न झालें; घट नष्ट झाला असतां तेंहि नाश पावलें; घट इकडे तिकडे नेला असतां तेंहि त्याबरोबर गेलें, व घटकाराप्रमाणेंच तें वर्तुलाकार, लहान, मोठें झालें, अशी सर्व प्राण्यांना खोटीच प्रतीति येते. त्याप्रमाणेंच ह्या सर्व चराचर सृष्टीचा पूर्वीं व नंतर आत्मा स्वरूपानेंच असतो; असें जाणूनहि दृष्टान्तांतील आकाशाप्रमाणेंच प्राणी त्याविषयीं भ्रांतिमूलक अनेक कल्पना करितात] ६१.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP