मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ६८

शतश्लोकी - श्लोक ६८

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


पक्षावभ्यस्य पक्षी जनयति मरुतं तेन यात्युच्चदेशं
लब्ध्वा वायुं महान्तं श्रममपनयति स्वीयपक्षौ प्रसार्य ।
दुःसंकल्पैर्विकल्पैर्विषयमनुकदर्थींकृतं चित्तमेतत्खिन्नं विश्रामहेतोः
स्वपिति चिरमहो हस्तपादान्प्रसार्य ॥६८॥

अन्वयार्थ-‘पक्षी पक्षौ अभ्यस्य मरुतं जनयति तेन उच्चदेशं याति-’ पक्षी आपले दोन्ही पंख हालवून वायु उत्पन्न करितो; व त्याच्या योगानें (आकाशात) उंच वर जातो. ‘महान्तं वायुं लब्ध्वा स्वीयपक्षौ प्रसार्य श्रमं अपनयति-’ (तेथें मोठ्या वायूपर्यंत पोंचला असतां आपले दोन्ही पंख पसरून ( आपले) श्रम घालवितो.‘दुःसंकल्पैः विकल्पैः (च) विषयं अनु कदर्थीकृतं एतत् चित्तं खिन्नं सत् विश्रामहेतोः हस्तपादान् प्रसार्य अहो चिरं स्वपिति-’ (तसेंच) दुष्ट संकल्प व विकल्प यांच्या योगानें, विषयांना अनुलक्षून, दीन (रंक) झालेलें हें चित्त खिन्न होऊन विश्रांतिस्तव हातपाय पसरून पुष्कळ वेळापर्यंत निजतें. (‘तद्यथास्मिन्नाकाशे ’ इत्यादि श्रुतींतील पक्ष्याच्या दृष्टान्तानेंच मागच्या श्लोकांतील अर्थ येथें निश्चित करितात- पक्षी पंख हालवून वारा उत्पन्न करितो व त्याच्या साहाय्यानें आकाशांत उंच उडून जातो. अंतरिक्षांतील महावायूपर्यंत जाऊन पोंचल्यावर तो आपले पंख पसरून त्या महावायूच्या साहाय्यानें तेथें तरंगत राहतो; त्यामुळें पंख हालविण्यापासून झालेल्या त्याच्या श्रमाचा परिहार होतो. त्याचप्रमाणें विषयांना उद्देशून हें चित्त अनेक संकल्प व तद्विपरीत विकल्प करितें; आणि त्यांच्या योगानें परस्वाधीन व दीन झालेलें हें चित्त अत्यन्त खिन्न होतें व आपले श्रम घालविण्याकरितां हातपाय पसरून स्वस्थ झोंप घेते. ह्याप्रमाणें निद्रावस्थेंत सुख भोगीत असलेल्या प्राण्याला जागें केलें असतां तो अत्यंत दुःखी होतो. ‘तं नायतं बोधयेदित्याहुः । यास्तव हातपाय पसरून स्वस्थ निद्रित झालेल्या पुरुषाला जागें करूं नये असें सांगतात.’ अशी व ‘तस्मादुह स्वपन्तें ’ म्ह०  ‘म्हणून सुरतासक्त झालेल्या इंद्र व इंद्राणीच्या सुखाचा भंग करणें मला उचित नाहीं असा विचार करून निद्रिताला उठवूं नये’ अशी श्रुति आहे. या श्रुतीनें निद्राभंग करणाराला मोठा दोष सांगितला आहे] ६८.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP