TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री संत लक्षणें पदें

श्री संत लक्षणें पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


श्री संत लक्षणें पदें
पद १ लें -
तो तो सुखात्मा करि स्वहित साचें जो ॥धृ०॥
पावतां मनुष्य देह, सांडुनि वैषयिक स्नेह, विसरुनि स्त्री पुत्र गेह, श्री गुरुपदीं रत होउनि स्वरुप मात्र जो ॥तो तो०॥१॥
देखतांचि दृष्य द्वैत, कोण मी हा धरुनि हेत, आपुला आपण शोध घेत, सच्चित्सुख विवरणांसि परम पात्र जो ॥तो तो०॥२॥
विष्णु गुरु पदाब्ज भृंग, कृष्ण सेवितो असंग, चिदानंद मधु अभंग, प्राशित निज हित उमजुनि दिवस आत्र जो ॥तो तो०॥३॥

पद २ रें -
राम हृदय गगन रवि उघड करिल त्या सुजना मी नमीं ॥धृ०॥
बिंब प्रति बिंबातें निवडुनि, ऐक्य विचरें भेद हरिल ॥त्या०॥१॥
नासुनि जगनग अंतर्ज्ञानें, आत्म कनक जो सत्य वरिल ॥त्या०॥२॥
दृष्य भास शब्द सह सांडुनि, अखंड आत्म जो सत्य वरिल ॥त्या०॥३॥
ग्रासुनि मीपण एकचि आपण, चिदानंद परिपूर्ण स्मरिल ॥त्या०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, अखंड अद्वय पथ विवरिल ॥त्या०॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-10T00:57:05.7700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उचले

  • बाजार भरला नाही तोंच उचल्यांनी कमरा बांधल्या 
  • बाजाराची गर्दी झाली म्हणजे उचले लोक आपले कौशल्य दाखवून लोकांच्या वस्तू चोरतात पण गर्दी होण्यापूर्वीच त्यांनी कमर बांधून तयार होणें म्हणजे फार उतावीळपणा दाखविणें होय. यावरून कशास काही ठिकाण नसतां फार उतावळी दाखविणार्‍या मनुष्याबद्दल ही म्हण वापरतात. 
RANDOM WORD

Did you know?

जननशांती म्हणजे काय ? ती केव्हा करावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site