TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक

‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक
रात्रिंचरां वधुनि जो हरि भूमिभारा ॥ राज्यासनीं बसुनि चालवि कारभारा ॥ राजाधिराज रघुनंदन त्या उदारा ॥ रात्रंदिनीं भजुं सदा सदया सदारा ॥१॥
जीवां सदा रमवि जो स्वसुखाच माजी ॥ जी वासना उठत सौख्यचि तीस पाजी ॥ जीणें तरी जरि घडे हरिभक्ति ताजी ॥ जीचा विचार कळवी दृढ सत्सभाजी ॥२॥
वस्तीसि एक सुखरूप निजात्म ठेव ॥ वर्णाश्रमान्वित सुभूपति राम देव ॥ वस्तू अखंड निज आपण त्यासि खेंव ॥ वन्दूनि देइन सदैव अवश्यमेव ॥३॥
नक्रांतकस्वरुपिं हा भव दृश्यमान ॥ न स्थीर अभ्रसम जो गगनाममान ॥ नम्रत्व त्यां कळवि आपण सत्यना न ॥ नष्टां जनासि घडवी निज ऐक्यता न ॥४॥
यन्नामसाररस सेवित शुभ्रकाय ॥ यप्ताद सेवक सुरांसह देवराय ॥ यन्नाभिपद्मज विधी जग बापमाय ॥ यत्नें मला हृदयिं दाविल आत्मठाय ॥५॥
न प्रेम वैषयिक त्या स्वसुखैक भान ॥ नष्टाज्ञता करुनि दे विभु मूर्तिमान ॥ नक्षत्रराज शिरिं तो करि गूणगान ॥ नम्रें शिरें चरणिं शोभत पावमान ॥६॥
राजीवलोचन कथा सुख मेघधारा ॥ रानीं मनीं जनिं दिसे प्रभु एक सारा ॥ राकाधिपप्रतिम यन्मुख चित्त - थारा ॥ राजेंद्र चिज्जळचि केवळ विश्व गारा ॥७॥
मध्यस्थ राम करुणाब्धि जया न काम ॥ मत्तां वधी स्वभजकांस्तव पूर्णकाम ॥ मच्चित् हें रमवि आत्मसुखांत राम ॥ मत्प्रेम त्यावरिच जो निज सौख्यधाम ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:15:08.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हड

 • उद्धा . कुत्रा हाकलतांआ , बैलाला पळवितांना उच्चारा वयाच्या शब्द . [ ध्व ] 
 • पु. हाड ; अस्थि ; ( प्र .) हाड पहा हडकी --- स्त्री . १ लहान हाड . २ महारांना गावांतील मेलेल्या जनावरांची हाडें , चामडींइ० ठेवण्यासाठीं दिलेली बिगरसारा जमीन . हडकी , हडाळा --- पु . ( व्यापक .) महाराची इनामी जमीन . हाडकी व हाडोळा पहा . हडकुळा , हडक्या --- वि . १ अतिशय रोड ; हाडॆं निघालेला . २ ( ल .) गर नसलेलें ( फळ ). हडक्या ऊंस --- पु . रस थोडा पण गोद , जाड सालीचा कळक्या ऊंस . हडवळा --- हडोळा पहा . हडवैर --- न . फार दिवसांपासून चालत आलेलें भयंकर शत्रुत्व ; हाडवैर . हडस --- वि . १ मजबूत हाडांचा , बांध्याचा . २ निरोगी ; निकोप प्रकृतीचा ; खणखणीत ( म्हातारा माणूस ). ३ ( चुकीनें ) अडस ; हेकाड ; हेकेखोर . 
 • पु. ( दक्षिण महाराष्ट्र ) पाणमांजर . 
 • स्त्री. तळी , डबकीं , खंदक इ० तून उगवणारें जाड , लांब गवत , लव्हाळें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.