TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
१२१ ते १३०

अभंग - १२१ ते १३०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


अभंग - १२१ ते १३०
१२१
पुरे पुरे तुझा मज हा संसार । जहाला बेजार जीव माझा ॥१॥
माजरांच्या खेळें उंदिरा मरण । अनन्य शरण तुज मी रामा ॥२॥
धांव धांव घाली उडीया आकांता । जानकीच्या कांता दीन बंधो ॥३॥
दिन बंधु आपुलें नांव आणि लक्षीं । भेटुनि मज संरक्षी गरीबासी ॥४॥
धांव विष्णु कृष्ण जगन्नाथा मी करंटा । गरिब मोठा धाटा तुज नाहीं ॥५॥

१२२
दिवस मोजूनि राहुं किति काळ । तूं राम दयाळ भेटावया ॥१॥
तुजविण हें माझें स्थिरावेना मन । शत्रुचें दमन तुझ्या हातीं ॥२॥
भक्तांचा अभिमानी आमुचा पक्षपाती । नाहीं सितापती आपणावीण ॥३॥
धरूं मी भरंवसा आणिक कवणाचा । अखंड आपणाचा धीर मज ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ अंतर्साक्षी । दर्शन देउनि रक्षीं आपणाचें ॥५॥

१२३
उतावेळ जीव आत्म भेटीसाठीं । लक्षीं बारा वाटीं आपणातें ॥१॥
नयन शिणले कारे लावितोसि वेळ । पाहसि माझ्या खेळ प्रारब्धाचा ॥२॥
तोडीं माझ्या देहात्म बंधपाशातें । मज दशदीशांतें न फिरवितां ॥३॥
आपण आनंदघन रामराजा । येईं वेगीं माझ्या प्रत्ययासी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा हें मी पण । ग्रासुनी आपण प्रगट व्हावें ॥५॥

१२४
गमतवाली मोठी माया तुझी रामा । नसतां विषयीं प्रेमा वाढवीती ॥१॥
आपण अधिष्ठान जिचें अखंड रामराया । ते हे आत्म माया दृश्यरूपें ॥२॥
सच्चिदानंद आपण एक जे मुळींची खुण । चुकऊनी देह मी पण सबळ दावी ॥३॥
विसरुनि आपणा दाविति चमत्कार नाना । ऐसें वाढविती मना सुख तें हेंचि ॥४॥
सुख हें या मानि जो त्यासी पेटवी दुःखाग्नी । चितेच्या संल्लग्नीं पाहूनेया ॥५॥
सुखाच्या संकल्पें जीवा लोळवी संसारीं । दुःख देउनि भारीं रात्र दिवस ॥६॥
करितां याचा विचार एक आपणचिसार । दिसतो जरि संसार सत्य नाहीं ॥७॥
सत्यासत्याचें मूळ आपण कळला । भाव हा वळला आत्मपदीं ॥८॥
आत्मपद दावीं विष्णु कृष्ण जगन्नाथा । जन्म मरण व्यथा निरसाया ॥९॥

१२५
दिधल्या जन्माचें रामा करिं रे सार्थक । अखंड आपण एक भेटूनीया ॥१॥
आपण एक भेटूणीयां हरिं तळमळ । धरि माझी कळवळ गरीबाची ॥२॥
दाविसी अनेक मज याचि नाहीं गोडी । एकचि आवडी आपणाची ॥३॥
कळवीं मी तुज माझ्या गळविं मीपणा । मिळविं आपणा सच्चित्सुखा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा तूं भक्तांभीमानी । हें ऐकुनि कानीं येरे वेगीं ॥५॥

१२६
राघवा आनंदघना जानकी जीवना । पुरविं कामना आत्म दर्शनाची ॥१॥
आत्म दर्शनाची मज लागली रे आशा । राम जगदीशा पूर्ण करीं ॥२॥
नको लाऊं रे विलंब पडतों तुझ्या पाया ॥ नाशिवंत काया म्हणोनियां ॥३॥
स्वभक्त कैवारी या नामा न लाउनि घे बट्टा । दुर्जन मुखें थट्टा न घडों तूझी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा दयानिधे रामा । आपण सुखधामा भेटे वेगीं ॥५॥

१२७
एक आपण भेटाया विलंब लाविसि किती । रामा सितापती सांग मज ॥१॥
सांग मज आला तुज माझ्यावीशीं कोप । लागली कीं झोंप मत्पापानें ॥२॥
तुज झोंप हें बोलणें मुर्खत्वाचें माझें । आपण रघुराजें लक्षीं न घ्यावें ॥३॥
आपण आनंदघन नित्य जागा स्वामी । भक्तां अंतर्यामी निश्चय हा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा आत्मभेटीसाठी । तळमळतो हो गाठीं आपणाची ॥५॥

१२८
कोणिच कोठें ना प्रिय मज ऐसा आपणा । सत्य जानकि रमणा परमानंदा ॥१॥
इष्टमित्र पुत्र कलत्र धनादिकांचा स्नेह । नावडे हा देह आपणावीण ॥२॥
सर्व सुखाचें निधान एक आपण माझा । सदया रामराजा दीन बंधू ॥३॥
सोडूनि सकळ एकचि लक्षीन आपणातें । देह मीपणातें नाशिवंता ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा आत्म दर्शन हेतू सदा । पुरविसि देउनि कदा आत्म भेटी ॥५॥

१२९
भली सांपडली मज मानवी हे काया । आपण भेटावया सच्चित्सुख ॥१॥
मनुष्य जन्मीच कळे आपण ब्रह्मानंद । सर्व सुख कंद रामराजा ॥२॥
संत संगें सांपडलें मज नीजनातें । आत्म भजनांतें लागावया ॥३॥
आतां मज काय उणें भेटला आपण । सुख परिपूर्ण रूप ज्याचें ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा मनुष्य जन्म सार्थकता । स्वभक्ती तत्वाता कळवीसी तूं ॥५॥

१३०
ऐसा प्रेम नाहीं मज अन्य जागीं कोठें । एक आपण नेटें आवडसी ॥१॥
आपण एकचि वाटे सुखाचा सागर । नटला विश्वाकार - लहरी रूपें ॥२॥
न सुटे लागली मज आपणाची गोडी । अक्षय सुख जोडी आपणाची ॥३॥
अलभ्य हा लाभ झाला आपणाचा रामा । श्री मन्मंगल धामा आनंद मूर्ती ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा जळें मीन जैसा । वांचे मी हा तैसा आत्म कृपे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:15:07.4830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

arc-de-circle

 • स्त्री. धनुष्याकृति 
RANDOM WORD

Did you know?

How do I contact you?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.