TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या

‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या
आहेपणें सदोदित  आद्य समस्तांसि सर्व व्यवहारीं ॥ आपण मीपण विरहित  आधार अखंड राम निर्धारीं ॥१॥
नंदन अजात्मजाचा  नंदिपतिप्रिय अपार सुखमय जो ॥ नंदवि निजभक्त स्वा -  नंदानुभवेंचि मन तयास भजों ॥२॥
दर्शन सुखमय दे जो  दरिद्र दुःखादि परिहरुनि सकल ॥ दमन करुनि शत्रूंचें  दयाळु भक्ता न होउं दे विकळ ॥३॥
घर दारा सुत न प्रिय  घडि पळ मनिं एक आवडी राम ॥ घसरत न कधिं तयातें  घनदाट सुखींच मिळवि सुखधाम ॥४॥
नवविधभक्तिपथें नव  नव हर्षद आत्मभजनशीलाला ॥ न असा दीन दयाळू  नरवरसुरवंश दावि लीलांला ॥५॥
राजाधिराज सीता  राघव माझा स्वभक्त अभिमानी ॥ राकाधिपप्रतिममुख  रावण वधि जो सुरांसि अवमानी ॥६॥
मजवरि करूनि करुणा  मन माझें स्वस्वरूपिं रमवि सदा ॥ मत्प्रिय आणिक न दुजा  मन्मतिला विषयिं जाउं दे न कदा ॥७॥
आनंदघना रामा  कृष्ण जगन्नाथ विष्णुगुरु दास ॥ आठवि निज नामातें जाणुनि भक्ताश्रयात्म बिरुदास ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:15:08.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धरणें

  • v t  To have in the hand; to hold/ grasp, to keep, retain. To take to, to regard, view; to apply, put to, occupy or take possession of (a place, a piece of ground). To find out or detect; to include. 
  • उ.क्रि. १ पकडणे ; मुठींत , हातांत ठेवणे . तो हाती काठी धरुन उभा राहिला . २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणे . तो हाती काठी धरुन उभा राहिला . २ निसटूं नये म्हणून दाबून ठेवणे ; जोराने पकडणे . पाने वार्‍याने उडतील म्हणून पायाखाली धरली आहेत . ३ सांठविणे ; मनांत ठेवणे . हा सर्वांचा हितोपदेश मनांत ठेवणे . म्ह ० धरीन तर डसेल सोडीन तर पळेल . ५ मनांत आणणे ; बनविणे ; कल्पिणे ( शास्त्रज्ञान , विद्या , कला , खुबी , युक्ति इ० ) तूं मनांत जो अंक धरशील तो मी सांगतो . ६ एखादा क्रम . नियम , शिस्त , व्रत पाळणे ; विशिष्ट गोष्ट , काम अंगिकारणे ; कांही एक उद्योगादि नियमाने करुं लागणे . त्याने सांप्रत प्रातःस्नान धरले आहे . त्याने शिव्या द्यावयाचे धरले आहे . ७ मानणे ; समजणे ; पाहणे . ८ विशिष्ट कामी योजणे , लावणे , गुंतविणे . हा बैल रहाटाखाली धरा म्हणजे चांगला होईल . ९ मानणे ; समजणे ; अमुक गोष्ट अशी आहे असा मनाचा ग्रह करुन घेणे ; अशा ग्रहाचे वागणे ( गोडी , आवड ) लावून घेणे . १० आपल्या कबजांत मालकींत , ताब्यांत घेणे . ( जमीन , शेत ). ११ विचारांत , लक्षांत , मनावर घेणे ; महत्त्व देणे . हा शिव्या देतो हे तुम्ही धरुं नका . १२ अवलंबणे ; स्वीकारणे ; अनुसरणे ; घेणे ( पक्ष , बाजू , भूमिका , वृत्ति ). १३ योजणे ; करणे ( घाई , त्वरा ). त्वरा धरली , उशीरा धरला . १४ संपादणे ; प्राप्त करुन घेणे ; मिळविणे ( सामर्थ्य ; बळ ). १५ बाळगणे ; घेणे ( धास्ती , भीति , अवमान ). १६ . पुरस्कारणे ; प्रतिपादणे ( कार्य , मत इ० ). १७ पकडणे ; उघडकीस आणणे , ( चोरी , लबाडी इ० ) १८ समाविष्ट करणे ; हिशोबांत धरणे . त्या पन्नासामध्ये हा धरला की ... १९ पाळणे ; आचरणे ; ( अनुष्ठान , उपास , व्रत ). धरिला असेल सत्याग्रह म्यां जरि धर्म । - मो अश्व ३ . ७२ . २० चालविणे ; पुढाकार घेणे ( गोंधळ , कथा , तमाशा इ० चा ) २१ आवड असणे . घेणे ; एखाद्यावर ममता करणे . आई मुलास , गाय - वासरास , नवरा - नवरीस धरतो - धरीत नाही . [ सं . धृ ] धरुन बसणे - हट्ट करणे ; हेका न सोडणे ; चिकटणे ; घट्ट धरणे . ( मत , मागणी , निश्चय , इ० ). धरुन सोडून - क्रिवि . मधून मधून ; धरसोडपणे ; अनिश्चिततेने ; चंचलतेने ( वागणे , बोलणे ). धरुन सोडून वागणे - वेळ प्रसंग पाहून , संभाळून , धूर्तपणाने एखाद्याशी वागणे . कपटी पुरुषाबरोबर धरुन सोडून वागावे लागते . 
  • धरून बसणें To hold pertinaciously (a sentiment, resolution, demand). 
  • v i  To stick or adhere to. Ex. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

aatmyathyatmya meaning
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site