TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक

‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक
जाश्वनिळा प्रिय गिरिजा  जान्हवि परि जेथ जनकजा - भाजा ॥ जागुनि अनुभवति मजा  जाणुनि त्या सेवि शंभु रघुराजा ॥१॥
नरवर पतीतपावन  न जगिं सुखास्पद असा तया न - मन ॥ नव नव हर्षद मन्मन  नवल पदीं रमत पावता श्रम न ॥२॥
कीर्तन - परा त्रिलोकी  कीटक पशु पक्षि नरतती कि - तकी ॥ किन्नर सुरतति जितकी  किति सांगूं नामतत्परा तितकी ॥३॥
जीवस्थिति वपुमय जी  जीववि विषयां त्रिताप जी - माजी ॥ जीव कळुनि मग ते त्यजि  जी रामीं रमवि वृत्ति धरि ताजी ॥४॥
वरिला राम रमाधव  वरिष्ठ यन्नामरत सदैव भव ॥ वरद महाबळ वैभव  वदनिं जपत नाम त्य अन ठेवि भव ॥५॥
न असा त्रिजगज्जीवन  नवल सुखस्वरुपिं उरवुं दे न मन ॥ नमिन तया रात्रंदिन  नतभजकां रक्षि करुनि अरिदमन ॥६॥
राघव आणित नगरा  रात्रिंचर वधुनि निज वरा दारा ॥ राष्ट्रीय कारभारा  राम चिदानंद चालवि अपारा ॥७॥
मन रमवुनि सौख्य परम  मज करि हृदयांत हरुनि तम राम ॥ मत्पालक पुरुषोत्तम  मजमाजिवसे अखंड सुखधाम ॥८॥

जानकिजीवनरामा नाम जपें उघड कळविं निजनातें ॥ विष्णू कृष्ण जगन्नाथ प्रिय आत्मस्वरूपचि मनातें ॥१॥
जानकिजीवनरामा मंत्रार्याष्टक तुवांचि रघुराया ॥ रचिलें तुज अर्पाया कृष्ण जगन्नाथ मीपण नुराया ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:15:08.4500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घडमोड

  • f  Making and destroying. Changing, shifting, setting up and pulling down. Buying and selling. 
  • स्त्री. १ ( भांडीं , मडकीं , दागिने इ० ) घडण्याची आणि मोडण्याची क्रिया ; बनविणें व नष्ट करणें ; २ ( ल . ) देण्याघेण्याचा , खरेदी - विक्रीचा , उसने घेण्या - देण्याचा व्यवहार ; खटाटोप ; उचापत ; धंदा ; व्यवहार ; व्यापार . ३ फेरफार ; उलथापालथ ; ( सरकारी नोकर ) ठेवणें काढणें ; बदलणें ; जुन्याच्या जागीं नवीन आणणें इ० किंवा नवे - जुनें करणें . ४ रचना ; घाट ; बनावट ; घडण ( यंत्रावयवाची , भागाची इ० ). ५ ( धंद्यांतील , व्यापारांतील ) भानगडी ; गुंतागुंत ; गाशा गुंडाळणें दिवाळें इ० . ६ ( एखाद्या श्लोकाची , कवितेची , उतार्‍याची ) गुंतागुंत ; घोंटाळा ; क्लिष्टता ; लपेटी ( कवीच्या काव्यरचनेंतील ) गुंतागुंत ; क्लिष्टता ; नाना तर्‍हेच्या युक्त्या . ७ ( नाटकांतील - नाटकाच्या संविधानकांतील ) कूट ; डावपेंच ; खुबी ; गुंतागुंत . ८ ( सामा . ) कुशलता ; चातुर्य ; खुबी ; हातोटी ; कला ( एकत्र मांडणें , विवरण करणें ; वागविणें इ० ची ) [ घडणें + मोडणें ] ईश्वराची घडामोड , ब्रह्मदेवाची घडामोड - स्त्री . चढविणें व खालीं पाडणें हा परमेश्वराचा व्यापार - खेळ . संसारांतील चढउतार ; अवस्थांतरें . घडमोडणें - अक्रि . ( काव्य . ) घडलें , बनवलें आणि मोडलें जाणें ; उत्पन्न आणि नष्ट होणें . तुमच्या इच्छामात्रें निश्चितीं । अनंत सृष्टि घडमोडती । [ घडमोड ] 
RANDOM WORD

Did you know?

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.