मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री नवदुर्गेचीं पदें

श्री नवदुर्गेचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
आइ मज नवदुर्गे नवदुर्गे सदा आनंदमय कर गे ॥धृ०॥
दुर्गतिच्या संसर्गे, श्रमलों मी इंद्रिय वर्गें ॥आ०॥१॥
ब्रह्मादिक सुरवर गे । वंदिति स्तविति तुज निरंतर गे ॥आ०॥२॥
भवनिधि हा सुस्तर गे । तरवुनी जनन मरण निस्तर गे ॥आ०॥३॥
निश्चय ज्या तुजवर गे । त्याचा घेसि प्रपंच भर गे ॥आ०॥४॥
मजवरि मन निष्ठुर गे । करुनी होउ नको कधिं दुर गे ॥आ०॥५॥
संसारिक हुर हुर गे । आत्म कृपेविण हे कसि दुर गे ॥आ०॥६॥
त्रिविध ताप संहर गे । कळउनि आपण सुखसागर गे ॥आ०॥७॥
हाचि मला दे वर गे । कधींच न पडो आत्म विसर गे ॥आ०॥८॥
दे निज भजनीं भर गे । कृष्ण जगन्नाथा दृढ तर गे ॥आ०॥९॥

पद २ रें -
श्री नवदुर्गे निज करुनि कांहीं जगदंबे श्री०मज काम क्रोध मत्सरादि रिपु गांजिति हे परिहारीं ॥धृ०॥
प्रणव रूपिणी शिणविसि कां मज, तुजविण पहातां कोणी, रक्षिता त्रिजगीं नाहीं । देह मीपण नुरवुनि आत्मशक्तिनें संकट विघ्न निवारीं ॥श्री०॥१॥
सच्चित्सुख स्वरुपा आपण, एकचि त्रिभुवन नटली, संत हे वदति पाहीं । ऐसा अखंड अनुभव देउनि मिळविं स्वानंदा माझारीं ॥श्री०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाच्या करुणा शब्दें जागुनि सर्वदा हृदयीं राहीं । तूं ब्रह्माभ्यंतर भेद रहित निर्वेद फिरवि संसारीं ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP