TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
१६ ते ३०

प्रार्थनापर पदें - १६ ते ३०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


प्रार्थनापर पदें - १६ ते ३०
पद १६ वें -
अजोध्यापुरमें राज्यासनमों राम बैठे हैं, राजाराम० सीताराम० अछाराम०॥धृ०॥
सूरत मूरत आखनमों, देखनके सज्जन आते है, बडे भारसे खडे रहै नर सुरबर शीस नमावत है ॥अ०॥१॥
जडाव सुन्नाके रतन मुकुट झग झग झग मन हर्ते हैं, जबलग दर्शन करके तबलग जनमों हर्सन मावत है ॥अ०॥२॥
चंद्रकोटी सूरज विज्युत्के लख लख तेज चमकतके है, वैजयंति मोतनके माला गलमें चक झलकते है ॥अ०॥३॥
धनुरव बाणन धर वामांक पर बेटी जनक नृपन के है, जनन मरन भय हरन करित प्रभु, चरन कमल दासन के है ॥अ०॥४॥
सामसुंदर के सिरकेउपर छतर पताका धर्ते है, भरत लछमन बबिखन सत्रुघन चामर करके डालत है ॥अ०॥५॥
बानर बहुविध नलनिल अंगद सुग्रिव सुखमें रमते हैं, अंजनि के सुत आगे जै जै रघुवीर समर्थ कहते है ॥अ०॥६॥
सब संतन के थाट मिल रहे, मुखसे नाम समर्ते है, बिना ताल खन खन खन धिमिकिट धिमिकिट मृदंग बजावत है ॥अ०॥७॥
भगत प्रेमसे राम राम भुलगये, जगत्कु आनंद कर्ते है, प्रभु रामचंद्र महाराज दयाके सागर मनमें डुलते है ॥अ०॥८॥
हात जोर के विनति करे सब, देव देवन के सुनते हैं, बिसनु किसन जगन्नाथ वडा, आत्म भजनमें रंगते है ॥अ०॥९॥

पद १७ वें -
प्रिय ज्याचें नाम भालचंद्रा नियमि त्या गाइन रामचंद्रा ॥धृ०॥
भयहर सुखकर गुण ज्याचे नयनीं या पाहिन त्याचे ॥प्रि०॥१॥
निज जन तारक पक्षपाती, विजयि जो त्रिजगीं भक्त गाती ॥प्रि०॥२॥
देव एक रामचि त्रिभुवनाचा, सेवकाचा पुरवि काम साचा ॥प्रि०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ भजनीं, रंगुनि नाचे दिनरजनीं ॥प्रि०॥४॥

पद १८ वें -
चला अयोध्येसि जाऊं । नाथ जानकिचा पाहुं ॥धृ०॥
संत साधु सद्भक्तांचा, मेळा मिळुनि किर्तनाचा गजर होतो आनंदाचा, तेथेंचि अखंड राहुं ॥च०॥१॥
टाळ मृंदगाची ध्वनी, नाम घोष पडती कानी, देह भान हारपोनी, पूर्ण ब्रह्मानंद लाहूं ॥च०॥२॥
रत्न जडित सिंहासनि, श्रीराम कोदंड पाणी, विराजे तो मोक्षदानी, त्याचे पायीं लक्ष लाउं ॥च०॥३॥
शरयु गंगेचे तटीं, किति सज्जनाची दाटी, ऐशीयाची घेउनि भेटि, राघवाचे गुण गाऊं ॥च०॥४॥
वैष्णव सद्गुरु अचलारामीं, कृष्ण जगन्नाथ स्वामी, राम ध्यातां अंतर्यामी, द्वैत भाव हा न साहुं ॥च०॥५॥

पद १९ वें -
सुख सागर आजि राम पाहुं नयनिं सुख० विषयांत निमिष नाहीं सुख सुख सुख ॥सुख साग०॥धृ०॥
राजिव लोचन माझी पुरविल आस, देइल विश्रांति निज पदिं या जिवास, काया मनें वाचा निश्चय साचा, फिरुनि संसारिं काय वरव वरव वरव ॥सु० सा०॥१॥
रत्न जडित सिंहासनिं रघुराज, सन्मुख नाचति भक्त सांडुनियां लाज, गजर करिति नामस्मरणाचा, कोटि सूर्य प्रभा फांके लख लख लख ॥सु० सा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ भजन सदा, करितां अद्वय भावें हरि आपदा, धरितां दृढ विश्वास जयाचा, त्रिविध तापें न होय रख रख रख ॥सु० सा०॥३॥

पद २० वें -
भक्त जन काम कल्पतरु धीर पातला रामचंद्र रघुवीर ॥धृ०॥
कीर्तन प्रिय हरि वर्तन करि, सद्वर्तन ज्याचें स्थीर ॥पा०॥१॥
निज नामाचा लंपट साचा, प्रेमें गुण गंभीर ॥पा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभु, लाउनियां न उशीर ॥पा०॥३॥

पद २१ वें -
राम हा जनक जनकजामाता जनकजामाता ॥धृ०॥
जो सच्चिदानंदघन मुळीं, रावण वधार्थ भूमंडळीं, अवतरला दशरथ कुळीं, भक्ति सुख हाता ॥रा०॥१॥
त्रिगुणात्मक विश्व पसारा, नटला आपण जो सारा, तो प्रगटला भक्त कैवारा, नाहिं भय आतां ॥रा०॥२॥
ब्रह्मेंद्रादि उमाशंकर, स्तविति ज्या अहर्निशीं निरंतर, तो हा कोटि मदन सुंदर त्रिभुवन त्राता ॥रा०॥३॥
शुक सनक जनक योगी भले, तेहि या सगुण ध्यानि रंगले, त्रिजग नगीं चित्कनका लाभले, जन पथिं जतां ॥रा०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, सगुण निर्गुणैक्य भावाचा, आला अनुभव हा साचा, नित्यगुण गातां ॥रा०॥५॥

पद २२ वें -
कोणी कांहिं ह्मणा श्रीराम धणी को० केला राम० को मज राम०॥धृ०॥
अकळ अगम्य जयाची करणी, सकळ जना सुख कारक स्मरणीं, केवळ भवनिधि तरणि ॥के०॥१॥
दक्ष सदा जो पतितोद्धरणीं, अखंड जागे अःकरणीं, तम हर चित्सुख तरणी ॥के०॥२॥
अक्षय आनंदाची भरणी, अघटित लीला करि अवतरणी, लिहिता न पुरे चरणी ॥के०॥३॥
असंग जो विक्षेपा वरणी, ज्यावरि ब्रह्मांड उपरणी, भक्तां संकट हरणी ॥के०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ विचरणीं, व्यतिरेकान्वय ज्ञान विवरणी, ठाव दावि निज चरणीं ॥के०॥५॥

पद २३ वें -
जीवन सर्वां जीवांचा, श्री रामचि साचा, काय निश्चय मतिचा, हा जडला ॥धृ०॥
जो अनंत ब्रह्मांडें नटला, पटतंतु घट मृद्वत्पटला, भक्तांस्तव दुष्ट वधीं झटला, तो मज या सज्जनाच्या संगतिचा अंगीं, भजन प्रसंगीं, कीर्तन रंगीं, सांपडला ॥जी०॥१॥
ब्राह्याभ्यंतर व्यापक सर्वां जो, सच्चित्सुख आपण बरवा तो, निरखिन हरिखें नित्य नवा उत्साहें या मनाचा जो, काम पुरविता नामचि गातां शामसुंदर प्रभु आवडला ॥जी०॥२॥
विधि सुरवर हर शंकर गिरिजा, परमात्म विचारें करिति पुजा, स्मरणांत न ज्याहुनि देव दुजा, तो स्वामि हा जगाचा विष्णु कृष्ण जगन्नाथ निज नयनि संतकृपें दृष्टिस पडला ॥जी०॥३॥

पद २४ वें -
श्री रघुराय आजि पहासि काय, मज तुं बाप माय, निज दाखविं पाय ॥धृ०॥
बहु व्यवसाय, क्षणभंगुर काय, वय हें जव जय, कधिं होसि सहाय ॥श्री०॥१॥
मोठि नवलाय, खोटें वाटे खरें काय, पोटिं षड्रिपु खाय, कोठें जाउं नेणें काय ॥श्री०॥२॥
पुरे सर्व हाय, यासि आपुलि दुराय, मज भेटे लवलाय, तुज बहु उतराय ॥श्री०॥३॥
हरिं हे अपाय, सुचवूनि उपाय, विष्णु कृष्ण जगन्नाथ नित्य नाम गाय ॥श्री०॥४॥

पद २५ वें -
देखोजी देखो राम अजोध्याधीश आते है । सब देखनमों बडा अजो० सब भूपनमों बडा अजो० ॥धृ०॥
सपत द्वीपका भूप जगन्मों कीरत ज्या के गीरत है, कोटि मदनका मूरत सुंदर श्याम मनोहर सूरत हैं ॥दे०॥१॥
जडित रतनको मुकुट बिराजत, मोतन माला झलकत है, शिरके ऊपर छतर पताका, राम नामका फडकत है ॥दे०॥२॥
जिनके आगे थाट मिले सब संतनके प्रभु गाजत है, हात जोर सुरभाट बंदि नर वाद्य तुतारे वाजत है ॥दे०॥३॥
सब त्रिभुवनके रछन करके, बार बार अवतरते है, थार चरणके पास देत निज, दासनके उद्धर्ते है ॥दे०॥४॥
जगत्कि माता सीता जिस्के बामांकेपर बैठे है, आखनमों देखनके सबकूं, हमकू दरसन देते है ॥दे०॥५॥
कोटि सुरजका प्रकाश पुष्पक बिमानमो झग झगते है, लगबग करके आये हमारे, माय बाप हम दिसते है ॥दे०॥६॥
सबसे मोठा दशरथ बेटा, वहाके सज्जन कहता है, भाइ लछीमन भरत शत्रुघन दो दों बाजू रखता है ॥दे०॥७॥
अष्टादस पद्मे कपि उनके दरसन सुखसे उडते है, हर्सभरित अंजनिके नंदन रंजन पावमें पडते है ॥दे०॥८॥
बिधि शिव जिस्के ध्यान करत बहु, भगति प्रेमसे स्मरते है, बिसनु किसन जगन्नाथ प्रभु आत्म भगत हित कर्ते है ॥दे०॥९॥

पद २६ वें -
मंद हसित रघुराय नयनि पाहुं, घस घसित रत्न जडित शिरीं मुकुट प्रकट तेज निकट जानकि शोभे, दीव्य चाप बाण करीं ॥मं०॥धृ०॥
दक्षिणेसि लक्ष्मण, लक्षणयुत लक्ष विचक्षण, दक्ष पवनसुत लक्ष कोटि रक्षःकुल नाशन, पक्षपाति निज भक्त रक्षण करी ॥मं०॥१॥
कुंद रदन इंदीवर लोचन, इंदिर कटाक्ष प्रिय सुंदर, इंदु वदन करि बिंदु सदृश भवसिंधु सकल सच्चित्सुखमय हरि ॥मं०॥२॥
सूर्य कोटि चंद्र प्रभ लख लख, आठवितां मुख होय अमित सुख, गांठ घे होउनि कधिं निरखिन पद नख, पतितासि विष्णु कृष्ण जगन्नाथ उद्धरीं ॥मं०॥३॥

पद २७ वें -
यारे गाडी यारे गडी अयोध्येसि जाऊं, शाम मनोहर सुंदर मूर्ति राम डोळां पाहुं ॥या०॥धृ०॥
कीर्तनाच्या थाटें जातां वाटे यूण गाऊं, ब्रह्मानंदीं मज्जन व्हाया सज्जन पदिं शिर वाहुं ॥या०॥१॥
नेट याचा मोठा तेथें नित्य राहुं, संत जनाची भेटी घेउनि चित्सुखीं विसाऊं ॥या०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रेम पूर्ण लाहूं, हेतु मानसिंचा सद्गुरु कृपे सिद्धि पावूं ॥या०॥३॥

पद २८ वें -
आंगें संत संगें होय तो हा सीताराम, रत्न जडित सिंहासनिं शोभे मेघश्याम ॥धृ०॥
पाहा सुहास्य वदन, महा सुखाचें सदन, भक्त योगि जन मन, मोहन विश्राम ॥आं०॥१॥
एक पत्नि एक बाण, एक वचन प्रमाण, अनंत जिवांचें कल्याण, गुण धाम ॥आं०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, नांदे अखंडानंदात, हृदयिं यत्स्वरुप ध्यात, विपद विराम ॥आं०॥३॥

पद २९ वें -
श्याम सुंदर नयनिं पाहुं राम एकदा । ध्यानि आठवे सदा, गांठ होइल कदा ॥धृ०॥
काम पुरवुनि जो सकळ वारि आपदा । नाम वदनिं वदा, वाम भागिं प्रमदा ॥श्या०॥१॥
शोभे जानकिजीवन दृढ मारुती पदा । परि दैहिक मदा, देतो अमृत पदा ॥श्या०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ वश भजन नवविधा । सुख स्फुरवि हृदा, नुरवूनि आपदा ॥श्या०॥३॥

पद ३० वें -
नाचा नाचा दिवस जाणोनी सोनियांचा आला । जानकी जीवन होय उत्साह मनाचा ॥धृ०॥
रावणादि राक्षसांचा, संहार करुनि साचा । विजयि प्रतापी शोभे राम राजा त्रैलोक्याचा । दिव्य आत्म सिंहासनिं जीवन जीवांचा ॥ना०॥१॥
नाहींच अटक बंध, मुखें गाउनी प्रबंध । नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद । अयोध्येमाजी आनंद, प्रेम राघवाचा ॥ना०॥२॥
न विसरतां नावेक, दृश्य देखतांचि देख । करितो आत्म विवेक, कृष्ण जगन्नाथ लेंक । सेवितो विष्णु राम एक, नित्य वैभवाचा ॥ना०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-10T00:58:48.0200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ऋणायतस्वरुपी

  • पु. 
  • ( सामा . ) ऋणकरी . 
  • कांहीं उपयोग नसतां पोसावा लागणारा ऋणकरी . उगीच ऋणायतस्वरुप्यासारखे डोक्याला हात टेकून चार चौघे येथें येतात तेथें बसूं नका . - मोर ४ . 
  • देणेंदार ; कर्जदार . एक म्हणे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ । - एभा २३ . ५२१ . म्ह० सगळी साळ्याची , अर्धी माळ्याची धनीण तेल्याची अन ऋणाईत ब्राह्मणाची ( बायको ). 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.