मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें

श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
श्री मदिंदिराकांत मला, एकांत सुखीं मिळवा हो । भजनि पुजनि हरि कीर्तनि रमउनि, अहंवृत्ति गळवा हो ॥श्री०॥१॥
चरण स्मरण सदोदित देउनि, मी माझें पळवा हो । देहभान नुरउनि मन माझें, रामपदीं वळवा हो ॥श्री०॥२॥
वंशोद्धारक सेवा घडउनि, प्रेमपूर्ण कळवा हो । गुरुवर कृष्ण जगन्नाथ तुह्मां, शरण भ्रांति पळवा हो ॥श्री०॥३॥

पद २ रें -
इंदिराकांत गुरु शांत मला आवडती । त्यां पदीं नित्य सद्भक्तियुक्त मत्प्रणती । मजकडुनि घडति त्यां अपराधांचि न गणती ॥इं०॥१॥
मज घडो अखंडित श्री मत्सद्गुरु सेवा । पुरवूनि मनोरथ स्फुरविल आनंद ठेवा । तनु मन धन अर्पुनि अनन्य शरण गुरु देवा ॥इं०॥२॥
मज विसर न मीळे प्रपंच चिंतन करितां । जळुं संचितपण मज कोणि न पावे मरतां । प्रभु धांव धांव गेलें फुकट वय तुज न स्मरतां ॥इं०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ गुरुपद राजीवाच्या । ध्यानीं लंपट कीं बहु अघ पद राजीवाच्या ।रंगवी निरदनिलवीरविठ्ठलीं जिवाच्या ॥इं०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP