TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें

श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें
पद १ लें -
पाहुं चला यतीश्वर पद्मनाभ गुरु छद्म रहित सुख सद्म आमुचें, मानवा काय पहासि अजुनी ॥धृ०॥
जाय वय फुकट काय, करिसि गुरु बाप माय, वश असुनि सदा । तरि शरण जाउनि भावें चरण हृदयिं धरुं येधवां देह मी पण त्यजुनि ॥पा०॥१॥
घाळ न व्हा कीं काळ ग्रासिल तनु व्याळ मृदु नच सोडिल कदा । प्राण ओढुनि काढिल देह धरणि पाडिल, मग केधवां मुक्ति पावसि भजुनि ॥पा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरण, हरि जनन मरण भव भय आपदा । स्वामी सदय हृदय, सुख उदय करिति जनि, जेधवां निज हित उमजुनि ॥पा०॥३॥

पद २ रें -
शरण जाऊं पद्मनाभ यतिला, पद्मनाभ पद पद्मिं रमतां सुख - स्वप्नि नेईल मज दृढतर निश्चय ॥श०॥धृ०॥
पूर्णप्रज्ञ गुरु शिष्य करिति, परि पूर्ण मनोरथ तूं हरुनि भय ॥श०॥१॥
पाप जनित भव ताप हरुनि, निष्पाप करिल गुरुबाप अमृतमय ॥श०॥२॥
नीरदास श्री वीरविठ्ठल, प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथ न विसरुं अद्वय ॥श०॥३॥

पद ३ रें -
पद्मनाम गुरु शिष्य इंदिराकांत यतिद्वय पाहुं या । शांत दांत वेदांत कुशल ज्यां, सन्मुख हरिगुण गाऊं या ॥धृ०॥
कृपा कटाक्षें लक्षिति ज्यांचे पदरज मस्तकिं वाहु या ॥शां०॥१॥
दर्शन मात्रें निवती गात्रें, अखंड जवळीं राहुं या ॥शां०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथाचें, जीवन सुखमय लाहुं या ॥शां०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-11T23:15:27.5530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच

  • एका घोड्यावर जर दोन माणसे बसली तर त्‍यांत एक पुढे व एक मागे असे असावयाचेच. दोन वस्‍तु घेतल्‍या तर त्‍यांत थोडाफार फरक असावयाचाच. तो लक्षात घेण्याचे कारण नाही. 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.