मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री चंद्रेश्वराचीं पदें

श्री चंद्रेश्वराचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
शिवहर चंद्रेश्वर पूर्ण कृपा कर गा, देईं परमानंद मला ॥धृ०॥
मुनिवर तुज गाती पाळिसि तूंचि जगा । परि जिव हा बहु श्रमला ॥शि०॥१॥
स्वात्मा रज्जु वरी कल्पुनि जग भुजगा । तुज चुकला किति भ्रमला ॥शि०॥२॥
करि नमन निज जगन्नाथाचा मुलगा । कृष्ण तुझ्या पदीं रमला ॥शि०॥३॥

पद २ रें -
नमन पदीं चंद्रेश्वर महाराज ॥धृ०॥
पूर्ण कृपेनें दर्शन घडलें । धन्य दिवस माझा आज ॥न०॥१॥
पर्वत शिखरीं साच न जाचती । चढतां सज्जन पाज ॥न०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे कीं । साधिं मदिछित काज ॥नमन पदीं चंद्रेश्वर महाराज॥३॥

पद ३ रें -
सुखकर चंद्रेश्वर आजी भेटला ॥धृ०॥
आत्मानुभवें भेद न वाटे । पहातां जया नयनीं जलाचा पूर लोटला ॥सु०॥१॥
ज्या स्वरुपातें निरखुनिं अवघें । निरसलें भवभय परमानंद वाटला ॥सु०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला । गातां गातां महिमा ज्याचा प्रेम दाटला ॥सु०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP