मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री महालसेचीं पदें

श्री महालसेचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
महालसे जगदंबे करुणा दृष्टि बघुनियां पाहीं ॥धृ०॥
विषय सुखीं या नष्ट होय मति, कष्टुनि बहु व्यवसायीं । विनउनि तो स्पष्ट न करि मज, दुष्ट दुरात्मा आई ॥म०॥१॥
या त्रिभुवनीं तुजविण कवणाच्या, शरण रिघावें पायीं । चंचल मन हें निश्चल ठेवीं, स्वस्वरुपाच्या ठायीं ॥म०॥२॥
वैष्णविभक्ती कृष्ण जगन्नाथा दुभती गायी । निजानंद दग्ध श्रवणारी, नवविध भजन उपायीं ॥म०॥३॥

पद २ रें -
श्री महालसे मोहिनी नमन तुजला जय सदये ॥श्री म०॥ शमन करुनि भव संकट अंगें, रक्षिसि भक्त जनांतें ॥धृ०॥
या अवतारें त्यांचि निरसिला सकल देव असुरांचा, जइं अमृत घट निपजला । उभयपक्ष समजाविसि घालुनि दितिज्या मोह मनातें ॥श्री०॥१॥
राहसि निवांत बहु श्रमला, सच्चित्सुख पद जिव हा चुकुनियां विषयीं भजला । निज भेटीस्तव तळमळ केवळ तूं जळ मज मीनातें ॥श्री०॥२॥
वैष्णवि भक्ती कृष्ण जगन्नाथाच्या, हृदयिं अखंडित जागुनि मूळ समजला । त्यजुनि देह मीपण आपणांसिच शरण स्मरुनि अधिष्ठानातें ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP