मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय २४ वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय २४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय २४ वा Translation - भाषांतर १५२राव म्हणे गुरो, वर्णितां तें थोर । प्रथमावतारवृत्त कथा ॥१॥तमोरुप निंद्य लोकांमाजी मत्स्य । कथा परी वृत्त पुण्यद तें ॥२॥निवेदिती मुनि भक्त तूं यास्तव । ईशगुणी तव लक्ष असे ॥३॥कोठेंही गेलिया वायूसी न दोष । तैसाचि निर्दोष ईश सदा ॥४॥गो-विप्र, सज्जन, वेद, धर्म, अर्थ । यांच्या रक्षणार्थ अवतार हे ॥५॥वासुदेव म्हणे भक्तांस्तव हरी । नाना खेळ करी लीलामात्रें ॥६॥१५३कल्पान्तीं विरंची असतां निद्रिस्थ । मुखांतूनि वेद गळले त्याच्या ॥१॥हयगीव दैत्य होता तयास्थानीं । गेला तो हरुनि सकळ वेद ॥२॥सर्वज्ञ ईश्वर होता तें जाणूनि । उपाय योजूनि स्थिर होता ॥३॥कृतमालेमाजी रुपें सूक्ष्म मस्त्स्य । होऊनि, प्रसंग शोधूं लागे ॥४॥वासुदेव म्हणे मनु श्राद्धदेव । सत्यव्रत राव होता पूर्वी ॥५॥१५४कृतमालातीरीं उदक प्राशूनि । तयांत रंगूनि गेला राव ॥१॥तर्पणसमयीं एकदां करांत । आला सूक्ष्म मत्स्य नृपाळाच्या ॥२॥त्यागितां त्या मत्स्य बोले दयावंता । मत्स्य भक्षी मत्स्या रक्षीं मज ॥३॥जगत्त्राता निज रक्षणार्थ प्रार्थी । लीला श्रीहरीची अतर्क्यचि ॥४॥आर्त मत्स्यशब्द ऐकूनियां नृप । निज कलशांत मत्स्या रक्षी ॥५॥वासुदेव म्हणे वाढला कलशीं । मत्स्य नृपाळासी विनवी तदा ॥६॥१५५राया, अन्यस्थळीं नेईं मजलागीं । नेतां अन्यस्थळीं न पुरे तेंही ॥१॥सरोवरी तदा नेई सत्यव्रत । तेंही व्यापकास केंवी पुरे ॥२॥अंतीं सागरांत नेऊं लागे राव । मत्स्य मानी भय तयावेळीं ॥३॥पाहूनि तें राव म्हणे मत्स्यश्रेष्ठा । मोह मज ऐसा पाडूं नको ॥४॥आजवरी ऐसा बलवंत मत्स्य । ऐकिलाही नच पुण्यवंता ॥५॥एका दिनीं शतयोजनें ज्या वृद्धि । कोण तूं निवेदीं ऐसा मज ॥६॥वासुदेव म्हणे विनवी त्या राव । वाटे मज देव अससी मत्स्या ॥७॥१५६विश्वचालका, कां वदें । घेतलेंसी रुप ऐसें ॥१॥देहावरी ज्यांचा भाव । शरण जाऊनि त्यां काय ॥२॥अद्भुत ही तव शक्ति । येई माझ्या प्रत्ययासी ॥३॥प्रलयसागरांत क्रीडा । करावया मत्स्य झाला ॥४॥इच्छा राजाची पाहूनि । मत्स्य बोले त्यालागूनि ॥५॥वासुदेव म्हणे ईश । खेळे खेळ हे प्रत्यक्ष ॥६॥१५७सप्तम दिनीं बा, होईल प्रलय । बुडेल हें सर्व सागरांत ॥१॥नौका एक तुझ्या येईल सन्निध । औषधि ऋषींस घेईं सवें ॥२॥बैसूनि नावेंत ऋषिप्रकाशानें । संचार आनंदें उदकीं करी ॥३॥वासुकीरज्जूनें नौका मत्शृगासी । बांधावी यदा ती हालूं लागे ॥४॥विरंचीची रात्र संपेतोंपर्यंत । नौका उदकांत फिरवीन मी ॥५॥पुढती मजसी प्रश्न करीं राया । येईल प्रत्यया ब्रह्म तदा ॥६॥वासुदेव म्हणे कथूनि हें मस्त्य । उदकीं त्या गुप्त होत असे ॥७॥१५८पुढती प्रतिक्षा करी सत्यव्रत । दिन जातां सप्त नवल होई ॥१॥जलमय पृथ्वी होऊनियां जाई । इतुक्यांत येई नौका तेथें ॥२॥बीजांसवें तदा औषधि ऋषींतें । घेऊनियां बैसे नावेमाजी ॥३॥केशवातें ध्याईं कथिती त्या ऋषि । तोंचि राव पाही महामत्स्य ॥४॥अयुत योजनें विस्तीर्ण देहाचा । सुवर्णवर्णाचा देह तया ॥५॥शृंगासी तयाच्या बांधी नौकेप्रति । उक्ति ते मत्स्याची आठवूनि ॥६॥वासुदेव म्हणे निर्भय नृपानें । स्तवन मांडिलें भगवंताचें ॥७॥१५९अनादि अज्ञानें बद्ध जे संसारीं । तारक त्यां हरी तूंचि होसी ॥१॥कर्मबद्ध जीव कर्मेचि वरिती । कर्मग्रंथि त्यांची छेदीं गुरो ॥२॥अग्निसेवनेंचि रौप्या जेंवी शुद्धि । सेवा तव तैसी पुण्यदायी ॥३॥ऐसा तूं समर्थ गुरु होईं आम्हां । प्रसादासी सीमा नसे तव ॥४॥यास्तव अंधासी अंध जैं शरण । देवता न अन्य भजणें तेंवी ॥५॥गुरु तूंचि माझा देवा, तूं यास्तव । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥६॥१६०अन्य गुरुंचा त्या अर्थ काम बोध । तेणें संसारांत मग्न जीव ॥१॥आत्मप्राप्तिमार्गदर्शक तूं एक । संसाराचा भंग होई जेणें ॥२॥भूतवत्सल तूं सर्व शक्तिमंत । त्यागूनि अन्यास भजती मूढ ॥३॥हृदयीं असूनि शोधिती ते तुज । देवा, उपदेश करीं मातें ॥४॥शरण मी देवा, पातलों तुजसी । तोडीं अहंग्रंथि दावीं रुप ॥५॥वासुदेव म्हणे सत्यव्रत ऐसी । प्रार्थना प्रभूची करी भावें ॥६॥१६१निविदिती शुक राया, तें स्तवन । मत्स्यानें ऐकून बोध केला ॥१॥‘मत्स्यपुराण’ तें जनीं या प्रसिद्ध । ज्ञान, कर्म, योग, कथिला जेथें ॥२॥कथूनि तें ज्ञान गुप्त होई मत्स्य । हवग्रीववध पुढती करी ॥३॥आणूनियां वेद अर्पी ब्रह्याप्रति । सत्यव्रत आजि मनु तोचि ॥४॥राया, मस्त्स्यरुपी ईश्वराची कथा । निवेदीं म्हणतां कथिली तुज ॥५॥पठण-श्रवणें याच्या बहु पुण्य । असो त्या वंदन महामत्स्या ॥६॥वासुदेव म्हणे स्कंध हा अष्टम । समाप्त वामन तोषो येणें ॥७॥इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ८ वा समाप्त.श्रीकृष्णार्पणमस्तु॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP