मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय १० वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय १० वा Translation - भाषांतर ६५निवेदिती शुक रायासी त्या काला । प्रभु साह्य ज्याला यश त्यासी ॥१॥देव-दैत्यांलागीं समानचि श्रम । पावले कल्याण परी देव ॥२॥भक्तकाज ऐसें करुनि श्रीहरी । वैकुंठविहारी निघूनि गेले ॥३॥पाहूनि तें दैत्य क्रोधाकुल होती । जाहले युद्धासी सकळ सिद्ध ॥४॥एकाचि कार्यार्थ ज्यांचा महायत्न । घ्यावयाची प्राण सिद्ध तेचि ॥५॥वासुदेव म्हणे स्वार्थ हा राक्षस । करीतसे ग्रास ब्रह्मांडाचा ॥६॥६६खवळलीं सैन्यें कोंदे रणनाद । संहार असंख्य सैनिकांचा ॥१॥‘वैहायस’ नामें विमानीं बैसूनि । बळी समरांगणीं युद्ध करी ॥२॥नमुचि, शंबर, बाणादि सकळ । विमानस्थ वीर लढती शौर्ये ॥३॥इंद्रादि देवही बैसूनि वाहनीं । सिद्ध रणांगणीं युद्धालागीं ॥४॥वासुदेव म्हणे वाग्युद्ध प्रथम । द्वंद्व तें दारुण पुढती होई ॥५॥६७महाभयंकर युद्ध वर्णवेना । प्रमुखांच्या संज्ञा कथिती शुक ॥१॥इंद्रासवें बळी, तारकासुर तो । भिडला सक्रोध कार्तिकेया ॥२॥मयासुर विश्वकर्मा, तेंवी त्वष्टा । वैरी शंबराचा महावीर ॥३॥राहूप्रति चंद्र, वायु, पौलोम्यासी । शुंभ-निशुंभांसी भद्रकाली ॥४॥वातापि-इल्वलां ताडी ब्रह्मपुत्र । बृहस्पति - शुक्र भिडले रणीं ॥५॥वासुदेव म्हणे उभयही वीर । विजयेच्छा थोर धरिती मनीं ॥६॥६८चक्र गदा खड्ग भृशुंडी उल्मुक । प्रास परशु भल्ल भिंदिपाल ॥१॥आयुधें यापरी योजूनि संहार । करिताती घोर उभय योद्धे ॥२॥छिन्न अवयव भग्न अलंकार । वस्त्रांचा संभार शस्त्रें बहु ॥३॥वस्तूंनीं या रणस्थान भयानक । युद्ध ईर्षायुक्त चालतसे ॥४॥धडें शिरेंही तीं सावेश जाहलीं । पराभूत बळी केला इंद्रें ॥५॥वासुदेव म्हणे अंतीं मायायुद्ध । पाहूनि देवांस भय वाटे ॥६॥६९असुर मायेनें पाषाण वर्षिती । भुजंग सर्पादि वृश्चिकही ॥१॥व्याघ्र सिंहादिक तेंवी क्रूर पशु । संचरती बहु सैन्यामाजी ॥२॥अक्राळ-विक्राळ राक्षसही येती । सवेग वर्षती मेघ बहु ॥३॥प्रलयाग्नि अंतीं निर्मी बळिराजा । उल्लंघी मर्यादा सागरही ॥४॥वासुदेव म्हणे त्यांत झंझावात । ऐशापरी नाश बहु होई ॥५॥७०पाहूनि तो नाश भयाकुल इंद्र । म्हणे लक्ष्मीकांत कृपा करो ॥१॥प्रार्थना तैं देव करिती सकळ । ऐकूनि दयाळ धांव घेई ॥२॥सूर्यदर्शनेंचि अंधकारनाश । तैसा मायानाश देव येतां ॥३॥चिंतनें प्रभूच्या नासती संकटें । सिद्धांत हा असे सुविख्यात ॥४॥कालनेमी, माल्यवान तैं धांवले । अंगावरी आले भगवंताच्या ॥५॥वासुदेव म्हणे लीलेनें श्रीहरी । असुरांचा करी शिरच्छेद ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP