मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय २० वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय २० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय २० वा Translation - भाषांतर १२९निवेदिती शुक राया, शुक्रवाणी । ऐकूनियां मनीं चिंती बळि ॥१॥अल्प काळ ऐसा राहूनियां स्तब्ध । नम्रत्वें शुक्रांस वदता झाला ॥२॥म्हणे गुरो, तुम्हीं वदलां तें सत्य । देतों ऐसा शब्द परी माझा ॥३॥प्रल्हादाच्या कुळीं जन्म हें स्मरण । कदा विस्मरण होऊं नये ॥४॥असत्यभाषणी मानवाचा भार । पृथ्वीही असह्य होई म्हणे ॥५॥वासुदेव म्हण असत्यचि घोर । पातक दुर्धर जगतीं एक ॥६॥१३०बळि म्हणे गुरो, विप्रांची वंचना । नरकयातनांहूनि घोर ॥१॥दारिद्र्य वा राज्यभ्रष्टताही तुच्छ । मृत्यूही न मज अधिक वाटे ॥२॥द्रव्य भूमिआदि एथल्या एथेंचि । अर्पितां सत्पात्रीं पुण्यलाभ ॥३॥निर्वाहापुरेसें राखावें हें सत्य । परी न याचक तुष्ट तेणें ॥४॥याचकसंतोषाविण व्यर्थ दान । याचकार्थ प्राण देई शिबि ॥५॥प्राणाहूनि काय राज्याची प्रतिष्ठा । कीर्तीविण श्रेष्ठा प्रिय न कांहीं ॥६॥वासुदेव कथी बळीचें वचन । भोग काळाधीन, अमर कीर्ति ॥७॥१३१गुरो, वीराहूनि दाताचि वरिष्ठ । मत ऐसें स्पष्ट होई मम ॥१॥सत्पात्राची इच्छा पुरवील लोकीं । ऐसा क्वचितचि भेटे दाता ॥२॥सामान्य याचकास्तवही दारिद्य्र । भोगिताती श्रेष्ठ जगामाजी ॥३॥मग या ब्रह्मज्ञ बटूस्तव दैन्य । स्वीकारावें कां न मज सांगा ॥४॥म्हणाल हा बटु नसूनियां हरी । संकल्प हा तरी अधिक दृढ ॥५॥वासुदेव म्हणे शुक्रालागीं बळी । भावना आपुली कथी ऐका ॥६॥१३२प्राप्तीस्तव ज्याच्या गुरो, तुम्हांसम । थोर थोर यज्ञ आरंभिती ॥१॥विश्वपति तोचि होऊनि याचक । द्वारावरी भीक मागे जरी ॥२॥तरी अन्य भाग्य असेल तें काय । दानाचा निर्धार दृढ माझा ॥३॥हित अहित वा करो तो कांहींहीं । माझ्यास्तव घेई विप्ररुप ॥४॥भिऊनि मजसी केलें वेषांतर । तयावरी शस्त्र उचलीं न मी ॥५॥लढेल तो जरी लौकिक इच्छील । जिंकील, वरील अथवा मृत्यु ॥६॥वासुदेव म्हणे गुरुआज्ञा भंग । करावया सिद्ध ऐसा बळि ॥७॥१३३ऐकूनि तें क्रुद्ध शुक्र । देती बळीप्रति शाप ॥१॥मूढा, होसी स्वयंमन्य । होईं ऐश्वर्यविहीन ॥२॥ऐकूनिही शाप ऐसा । न ढळे निश्चय बळीचा ॥३॥विंध्यावली उदक आणी । रमला चरणप्रक्षालनीं ॥४॥वामनाचें चरणतीर्थ । सिंची मस्तकीं तो श्रेष्ठ ॥५॥पूजूनियां श्रद्धायुक्त । सोडी दानाचें उदक ॥६॥वासुदेव म्हणे तदा । देवां आनंदा न तोटा ॥७॥१३४विद्याधर, सिद्ध, गंधर्व, चारण । आनंदनिमग्न तयावेळीं ॥१॥दुंदुभीचा नाद, गान गंधर्वाचें । सकल बळीतें वाखाणिती ॥२॥सुमनवर्षाव होई बळीवरी । आदर अंतरीं सकलां वाटे ॥३॥जाणूनि सर्वस्व अर्पी जो शत्रूसी । काय त्या दात्याची ख्याति गावी ॥४॥वासुदेव म्हणे बळीचें औदार्य । जगीं एकमेव, धन्य धन्य ॥५॥१३५पुढती बटूचें रुप पावे वृद्धि । वाटे आश्चर्यासी बहु आश्चर्य ॥१॥वाढतां वाढतां व्यापिलें ब्रह्मांड । पर्वत, समुद्र, बळि पाही ॥२॥चरणांबुजीं पृथ्वी पर्वत शोभती । जानुस्थळीं पक्षीगण सर्व ॥३॥वायुसमूह तो उरुंत विराजे । वस्त्र तोचि साजे संध्याकाळ ॥४॥कटि पुरोभागीं बळिआदि दैत्य । प्रजापति श्रेष्ठ गुह्यस्थानीं ॥५॥नाभिस्थानीं शोभे दिव्य अंतरिक्ष । उदरीं ते सप्त दिसती सिंधु ॥६॥नक्षत्रें तीं उरीं हृदयीं तो धर्म । ऋत सत्य स्तन शोभती त्या ॥७॥मन तोचि चंद्र वक्षस्थळीं लक्ष्मी । वासुदेव ध्यानीं चिंती हेंचि ॥८॥१३६रोमरोमीं ऐशा सकळ देवता । पाहूनियां मूर्छा दैत्यांप्रति ॥१॥शंख चक्र गदा शार्ड्गधनुआदि । आयुधें जयासी भूषविती ॥२॥मकर कुंडलें कौस्तुभ लांछन । ऐसा त्रिविक्रम व्यापी विश्व ॥३॥एका पादें भूमि स्वदेहें आकाशा । व्यापियेल्या दिशा स्वबाहूंनीं ॥४॥अन्य पादें स्वर्ग व्यापिलें, न कांहीं । अवशिष्ट राही तृतीय पादा ॥५॥वासुदेव म्हणे कौतुक प्रभूचें । अनंत ब्रह्मांडें रोमरोमीं ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP