मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय १७ वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय १७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय १७ वा Translation - भाषांतर ११०निवेदिती शुक ऐकूनि तें व्रत । होऊनि सश्रद्ध करी देवी ॥१॥पाहूनि ते श्रद्धा पीतांबरधारी । प्रगटला हरी पुढती तिच्या ॥२॥उत्थापन देई पाहूनि तयासी । लोचनीं लोटती आनंदाश्रु ॥३॥सद्गदित कंठें उमटे न शब्द । अष्टभाव व्यक्त भक्तिभावें ॥४॥पुढती निश्चल करुनियां दृष्टि । हळु हळु स्तुति करुं लागे ॥५॥वासुदेव म्हणे अदिति स्तवन -। करी, तें ऐकून घ्यावें आतां ॥६॥१११यज्ञपते नरोत्तमा जे शरण । अथवा जे दीन रक्षिसी त्यां ॥१॥गुणगान तुझें देवा, पुण्यप्रद । नामें पुण्यश्लोक, रक्षीं आम्हां ॥२॥उभारुनि विश्व आलिप्त तुं नित्य । घेई नमस्कार निर्विकारा ॥३॥प्रसन्न तूं होतां रुप गुण वय । अणिमादि सर्व प्राप्त होती ॥४॥धर्म-अर्थादि ते लाभती पुरुषार्थ । काय या अशक्य देवा, तुज ॥५॥वासुदेव म्हने प्रार्थना ऐकूनि । बोलला हांसूनि जगन्नाथ ॥६॥११२देवमाते, दैत्यनिर्दलनें देव । व्हावे सवैभव इच्छिसी हें ॥१॥परी ब्राह्मणांनीं रक्षिलें जयासी । नाश न तयासी जाण कदा ॥२॥तथापि व्रतानें तोषविलें मज । योजणें उपाय भाग तेणें ॥३॥कश्यपतेजस्थ होऊनि त्वत्पुत्र । रक्षीन देवांस पुण्यव्रतें ॥४॥वचन हें माझें राखूनियां गुप्त । सेवीं कश्यपांस ईशभावें ॥५॥वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । गुप्त होई तेथें भगवान ॥६॥११३देवमाता तें ऐकूनि । होई आनंदित मनीं ॥१॥पतिसेवा करी प्रेमें । मुनि जाणिती तपानें ॥२॥मुनिकश्यपशरीरीं । अंशें प्रवेशला हरी ॥३॥वायु काष्ठामाजी अग्नि । प्रगट करी जेंवी वनीं ॥४॥गर्भधारण तैं होई । देवी अदितीच्या ठाईं ॥५॥वासुदेव म्हणे ब्रह्मा । रुतवी गर्भनारायणा ॥६॥११४षड्गुण ऐश्वर्यसंपन्ना हे देवा । स्तविती तुजला सकल लोक ॥१॥जयजयकार तव असो सर्वकाळ । इच्छिती सकल तव कृपा ॥२॥नमस्कार तुज असो हे ब्रह्मण्या । नियंत्या त्रिगुणां गुणातीता ॥३॥पृश्निपुत्र तूंचि, तूंचि वेदाधार । त्रैलोक्याचें मूळ तव नाभि ॥४॥सर्वश्रेष्ठ तुझें नारायणा, स्थान । व्यापक असून अंतर्यामी ॥५॥आदि अंत तूंचि विश्वाचा अनंता । जल तृणादिकां नेई जेंवी ॥६॥तेंवी तूं प्रलयी ओढिसी विश्वातें । अनंत ब्रह्मांडें लीला तव ॥७॥वासुदेव म्हणे बुडत्यासी नौका । तेंवी तूं पतितां ब्रह्मा म्हणे ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP