मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय २३ वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय २३ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय २३ वा Translation - भाषांतर १४८दयावंताचें तें दयाळु भाषण । ऐकूनियां मन बळिचें द्रवे ॥१॥आनंदसागरा पातली भरती । कंठही दाटती भक्तिभावें ॥२॥अश्रुपुर त्याच्या लोटती लोचनीं । जोडूनियां पाणी उभा राहे ॥३॥म्हणे देवा, ऐशा अनुग्रहासम । घडलें कांहीं न कर्म माझें ॥४॥नीचानें या तुज वंदिलेंही नाहीं । प्रयत्नचि पाहीं केला तैसा ॥५॥साक्षात् वंदनाचा केवढा प्रभाव - । असेल, सदय तूंचि देवा ॥६॥बोलूनियां ऐसें ब्रह्मा विष्णु शिवां । दंडवत केला प्रणिपात ॥७॥वासुदेव म्हणे पाशमुक्त बळि । जावया सुतलीं सिद्ध होई ॥८॥१४९होउनि उपेंद्र रक्षिलें देवांसी । हर्ष अदितीसी होई बहु ॥१॥पाशमुक्त पौत्र पाहूनि प्रल्हाद । म्हणे आम्हीं दैत्य धन्य झालों ॥२॥कृपापात्र देवांसम झालों आम्हीं । कल्पवृक्ष जनीं तूंचि आम्हां ॥३॥प्रल्हादासी देव बोलताती पौत्र । घेऊनि सुतल गाठीं सौख्यें ॥४॥गदापाणी द्वार रक्षीन मी तव । दर्शनें त्या नित्य तुटती बंध ॥५॥आज्ञेसम भक्त सुतलांत जाती । शुक्रांसी मंडपीं वदला देव ॥६॥यज्ञन्यून सर्व करावें संपूर्ण । वासुदेव धन्य कथागानें ॥७॥१५०वंदूंनियां शुक्र बोलले हरीसी । यज्ञहेतु तूंचि एक देवा ॥१॥यथासांग यज्ञ तुझ्याचि लाभार्थ । जाहला कृतार्थ दैत्यराज ॥२॥तैसेंचि त्वन्नामें न्यून पूर्ण होई । आज्ञा मान्य पाहीं परी तव ॥३॥बोलूनियां ऐसें पूर्ण केला यज्ञ । समर्थ वामन धर्मकार्यीं ॥४॥यास्तव उपेंद्र योजी तया ब्रह्मा । विमानीं वामना घेई इंद्र ॥५॥वासुदेव म्हणे शिवादिक देव । करिती कौतुक अदितीचें ॥६॥१५१परीक्षितीलागीं शुक महायोगी । बोलले कथा ही कथिली तुज ॥१॥पापविनाशी हें वामनचरित्र । कथा अलौकिक प्रभुच्या बहु ॥२॥रज:कणांहूनि संख्या ते अपार । वर्णन करील कोण त्यांचें ॥३॥नित्य वामनाची कथा हे ऐकतां । पठण करितां सौख्यलाभ ॥४॥सर्वकार्यारंभीं कथा हे ऐकतां । कर्मासी न्यूनता न राहेचि ॥५॥वासुदेव म्हणे अंतीं मोक्षलाभ । वामनचरित्र नित्य गावें ॥६॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP