मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय ११ वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय ११ वा Translation - भाषांतर ७१ईशकृपेनें हा लाभतां विजय । इंद्र वदे काय बळिसी ऐका ॥१॥घेऊनियां रुपें बालिशभावानें । मूढहो, आम्हांतें खेळवितां ॥२॥परी बले, आतां पाचारीं मित्रांतें । वांचवीं प्राणांतें वज्र आलें ॥३॥बळि म्हणे इंद्रा, खेळ हा काळाचा । अभिमान ऐसा न करीं व्यर्थ ॥४॥जय-पराजय मृत्यु वा रणांत । निश्चयेंचि साच वीराप्रति ॥५॥भाषणें या तव ज्ञात्यालागीं कींव । कथी वासुदेव बळिवाक्य ॥६॥७२बोलूनियां बळि ताडी दिव्य बाण । इंद्र तैं ताडन करी वज्र ॥१॥पतन बळीचें पाहूनियां जंभ । करी गदाघात ऐरावता ॥२॥मातली तैं वेगें रथ करी सज्ज । देई धन्यवाद जंभ तया ॥३॥प्रशंसूनि सोडी प्रखर तो बाण । परी घेई प्राण इंद्र त्याचा ॥४॥पाहूनि तें बल, पाक तैं नमुचि । करिती इंद्रासी समर घोर ॥५॥बल-पाकासी तैं वधिलें इंद्रानें । नमुचि क्रोधानें तदा धांवें ॥६॥वासुदेव म्हणे नमुचीचें बल । बाधे न त्या वज्र नवल इंद्रा ॥७॥७३वृत्रासुरादींचे वध ज्या वज्रानें । नमुचीसी तेणें बाधा नसे ॥१॥पाहूनियां इंद्र तुच्छ लेखी वज्रा । नभोवाणी तदा होई एक ॥२॥इंद्रा, आर्द्र शुष्क वस्तूनें नमुचि । न मरे कदापि वरें माझ्या ॥३॥ऐकूनियां इंद्र योजी जलफेन । तदा गतप्राण नमुचि होई ॥४॥देवांसी आनंद तदा बहु होई । नारद थांबवी बोधें युद्ध ॥५॥सायंकाळीं शुक्र, बळिआदि दैत्यां । अर्पूनि सामर्थ्या सौख्य देती ॥६॥वासुदेव म्हणे बळिराज ज्ञाता । पराजयें चिंता न गणीं खेद ॥७॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP