मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
नदी-ओढयातून जाई बाजाराची ...

हिरामण माळवे - नदी-ओढयातून जाई बाजाराची ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


नदी-ओढयातून जाई
बाजाराची पाउलवाट
बाजारात जकातीची
पडे पावती हातात
मडकी-लाकडी खेळणी
उभी टोपली टोपली
रुपयाचे सोळा आणे
सुट चवली-पावली
शेळ्या-कोंबडया विकून
फुटत्‍ पैशालाही वाटा
कांद्या बटाट्याच्या असे
फक्त एक आणा वाटा !
कष्टकरी गरिबाला
किती संसाराचा ताप
धान्यधुन्य देता- घेता
मिळे आठव्याचे माप !
तेल- गूळ मिळायचा
माप त्याचे शेरभर
कापडचोपडाचे माप
असे दोन्ही हातांवर
धोतराच्या धडप्याला
जिन्नसांच्या किती गाठी
आपुलकीचा अनुभव
घडता माणासांच्या भेटी
भेळ-चिवड्याची वाट
घरी बघत लेकरं
आठ दिसांचा आधार
असा टोपली- बाजार !

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP