मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
स्वत:लाच शोधणार्‍या मग्न ...

सुरेखा बोर्‍हाडे ( गायखे ) - स्वत:लाच शोधणार्‍या मग्न ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


स्वत:लाच शोधणार्‍या मग्न जगातून
अचानक वावटळीनं यावं बाहेर
कोश फाटून...
आणि करावा झगमगत्या, बदलत्या जगात
उभं राहण्याचा नव्याने प्रयत्न...
पण या आत्मकेंद्री, आभासी समाजात
ते कसं शक्य व्हावं ?
भोवती स्वार्थाचा गदारोळ
जगण्याची चढाओढ
या सगळ्यात चिरडली जातात
अस्मितेची फुलं...
होत राहते सत्याच्या - स्वत्वाच्या हुंकाराची गळचेपी
आणि मनाची घुसमट...
हसत्या - खेळत्या चेहर्‍यामागं लपवाव्या लागतात
या भळभळणार्‍या वेदना असह्य, अतर्क्य...
तरीही अनिवार्य सारंच...
अशा वेळी कळवळून आठवतो माझा गाव
जिथं घेता येऊ शकेल मुक्त श्वास...
इतका मनमुराद की
थिटी पडावी अवकाशाची पोकळी...
आणि होऊन जावं आपणच...
मुक्त वारा...आसमंत सारा !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP