मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी| नरेंद्र शर्मा - काय तुला मी देऊ ? सांग प्... अनुवादितएकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले. Tags : poemsongकवितागाणीमराठी काय तुला मी देऊ ? Translation - भाषांतर काय तुला मी देऊ ? सांग प्रियतमे, राणी तूच...वेडे, या दुर्बल हातांनीक्षण रोखून धरू शकशील कशी तू ?केवळ क्षणभरास्तव होते हेप्रणयामधले चंचल श्वासकिती भाबडी ! तुला वाटले...हे आता जन्मभरीचे पाश !मी वारा स्वच्छंद सदोदितमला बद्ध करू शकशील कशी तू ?वेलींना सोडुन जातातच नाबागेतुन सगळे सुगंध...सरोवरातुन हंसही उडतीलाटांचे तोडुनिया बंधमग मीलनरात्रीचे रंग उभ्याजन्मात भरू शकशील कशी तू ?मी तर कायमचात फिरस्तामुक्काम असो हा काही क्षणथांबवू नको तू मज रडुनीमम अगतिक पार्यासम जीवन !पुनवेनंतर अवसही येते...अवस विस्मरू शकतील कशी तू ?मज दिल्यास ज्या दुखमय भेटीजन्मात तरी विसरेन कधी का ?ते पहिले, अगदी पहिले चुंबन...ही निरोपसमयीची अश्रुमालिका !स्वप्न हवे अन् वास्तवताही ?हे भान हरू शकशील कशी तू ?काय तुला मी देऊ ? सांग प्रियतमे, राणी तूच...तुज वास्तवतेचे भान हवेकीपुन्हा पाहिजे स्वप्न नवे ? N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP