मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
झुंडी निघाल्याहेत पेटते प...

अनंत ढवळे - झुंडी निघाल्याहेत पेटते प...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


झुंडी निघाल्याहेत
पेटते पलिते घेऊन
रस्त्यात येतील त्या गोष्टी जाळीत
तुटात चालला आहे
शेकडो वर्ष जुना
बंध
मीर तकी आणि दाराशुकोहने
जोडलेला
शहेंशा अकबर आणि छत्रपती
शिवाजींनी घडवलेला
मला आजकाल ओळखूच येत नाही
हा प्रदेश
ही जमेन
विद्वेषाच्या रंगात माखून गेलेली
हे कोण लोक आलेत
धर्मांच्या नव्या व्याख्या घेऊन
आपल्याच मर्जीने सीमा ठरवीत
एका सहस्त्रकाची सहिष्णुता त्यागून
आपण कसे जगावे हे सांगत
झुंडीनो
तुम्हाला दिसलेच नाहीत
सूर्फ़ीसोबत संवादात रंगलेले
एकनाथ;
गहन चर्चेत बुडालेले
शाघनुर मियां हमवी आणि मानपुरी
प्रसाद;
भाषा, स्वर आणि इतिहासाची गाठ
जोडीत बसलेले
हजरत आमीर खुसरौ
तुम्हाला माहीत आहेत का
महात्मा बुद्ध
कबीर
तुकाराम
नामदेव ?
निदान गांधी ?
तुम्ही ऐकूनच असाल
की
काळ अनंत आहे आणि
पृथ्वी विशाल
आणि हे
की कधीतरी निवाडा होतोच
हेही
की नष्ट होऊन जातात
भरकटलेली जनपदं
धर्मांच्या अंध एषणेत
दिशा चुकलेले समुदाय
पण तुम्ही
बहुधा ऐकू शकत नसाल
विचार करू शकत नसाल
पचवू शकत नसाल
आपल्या धमन्यांमध्ये पेरलेलं विष
जे बाहेर पडतंय
रस्तोरस्ती
उन्मादाचे लोळ होऊन...

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP