मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| चारचंद्र शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - चारचंद्र शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती चारचंद्र Translation - भाषांतर चारचंद्र ( चढ ) तुम्ही कवि सुज्ञान आतां कळेल प्रसंगीं ज्ञान ॥ध्रु०॥सर्व शास्त्र जाणता थोरले कविराज ब्रिदवाले ।मुखोत्तरें ऐकाया पंडित बैसलेत भवताले ।ऐकत होतों नांव फार फार दिसानें दर्शन झालें ।अर्थ आठवला सहज मजला । तोच पुसतो तुजला मति आहे अज्ञान ॥१॥एक अचंबा असा दिसाचे चंद्र पाहिले चार ।चारी चंद्र सारखे सारखा नामाचा उच्चार ।चार चंद्र कोणते तयाचा करा मनीं विचार ।आहे सत्य नव्हे असत्य । वाल्मिक मुनिचे कृत्य कथिलें भविष्य स्वतःनं ॥२॥आणिक एक वितरीत अयोध्या नाथ जवळ असतांना ।सीता सति पतिव्रता ह्रदयी धरिती लंकेचा राणा ।दिसते विपरीत कसा तो अर्य मनासी आणा ।शोध पहावा ठिकाण लावा । प्रत्यय तो यावा ।वाहवा म्हणतील गुणी सुज्ञान ॥३॥कोण संवत्सर मास कोणता कोण वार तिथि बोला ।शास्त्र युक्तिचें उत्तर बोलुन कवि मतामधें डोला ।सुचेना शब्द तरी मग आहे अब्रुला धोका ।बराच कविला अर्थ सेविला । नाथ हैबती कविला प्रसन्न देता मति वरदाना ॥४॥१३ चार चंद्र ( उत्तर ) चारी चंद्र सारखे देखिलें एक दिशीं नयनीं ।जरी म्हणाल विपरित तरी परीसा अन्वय श्रवणीं ॥ध्रु०॥लंकापति रावण वधिला पाहा श्रीरामानीं ।ही रामायणी कथा असें कथिला वाल्मिकानीं ।सीता सह निर्जर बंदीचे सोडवले त्यांनीं ।ब्रह्मा शिव आदि करून सुवेळा स्थानीं ।दिव्य सीतेने घ्यावें ऐसे सर्वांचे वदनी ॥१॥चेतवून महा अग्नी टाकिली उडी कुंडामाजी ।निघे अग्निंतुन तेव्हां पडली आप शब्दांची मांजी ।इंद्र चंद्र साक्षीस कोटी तेहतीस त्या समाजीं । धन्य धन्य ते सीता माय म्हणती सर्व नामाजी ।चार चंद्र त्या वेळीं जमले असें ग्रंथ कथनीं ॥२॥रामचंद्र तो एक, सीता मुखचंद्र दुजा जाण ।शिव मस्तकीं तिजा, अत्रीनंदन चवथा जाण ।सीता हृदयीं धरा रवण तेव्हां कैसे जाण ।विपरीतच अर्थ दिसतो परी तिथेंच संधान ।आंचळ नाम जो पदर तोचि रावण पहा मननीं ॥३॥लज्जित होऊनी सीता सावरून पदर हृदयीं धरला ।तेहतीस कोटी सुरांसहित संशय साग हरला ।जयजयकारें गर्जता आनंद ब्रह्मांडी भरला ।रामराम अती मधुरध्वना हा नादची एक सरला ।कविराज हैबती मती देतसे नाथ कवनीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP