मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| गणित काव्य शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - गणित काव्य शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती गणित काव्य Translation - भाषांतर शास्त्रमताचें ज्ञान काय माहित अडाण्याला ।हें उघड दिसते पुसावें उत्तर शहाण्याला ॥ध्रु०॥समयोचित बोलणें सुचावें प्रति उत्तर ।तेच कविचे शब्द जाणता कवि मतांतर ।गैर अर्थ आक्षर काय करणें त्या गाण्याला ॥१॥अर्थ एक पुसतो आतां शास्त्राची खुणगांठ ।उत्तर करण्यावरून समजल ज्ञानाचा घाट ।कोसाचे किती हात किती बोटें हात वहिवाट ।किती जवाचे बोट कोणती खूण जव भरण्याला ॥२॥शोध जवाचा लावुन आकार घाला कोसाचा ।च्यार कोस झाल्यावर ठरला नेम योजनाचा ।किती योजनें झालीं म्हणजे देश म्हणायाचा ।किती देशाचें मंडळ बोला नेम करून त्याचा ।किती मंडळें खंड मोजण्याला ॥३॥शास्त्रावांचुन खरें मानिना कोणी वचनाला ।गणित श्लोक पाहिजेत तेव्हां येतें ध्यानाला ।घडघड बोलावें अंतर पडो नये याला ।कविराज हैबती करी शास्त्र अन्वयाला ॥४॥२७ ( उत्तर ) तुम्ही चतुर बैसला म्हणून बोलावें अनुमान ।पृथ्वीची मोजणी गणित ऐकुन घ्या परिमान ॥ध्रु०॥दोन अणुचा एक आहे त्रसरेणू नांवाला ।त्रसरेणू आठ धरिले तेव्हां रथरेणु झाला ।रथरेणू ते आठ असे म्हणती बालाग्राला ।आठ बालाग्री लिक्षा, आठ लिक्षांस यूका याला ।आठ यूका जव झाला ऐसा याचा आहे मान ॥१॥आठा जवाचें बोट मूठ झाली चव बोटाची ।साहा मुठीचा हात बोली ही आहे प्रत्ययाची ।चार हाताचें धनुष्य आहे बोली शास्त्राची ।दोन सहस्र धनुष्य मोजणी भरली कोसाची ।चार कोस झालीया एक योजन हें संधान ॥२॥शंभर गांवें पृथ्वी जेव्हां आली मोजाला ।तेव्हां गुणी राजसा संदीस एक देश झाला ।शत देशाचें मंडळ, मंडळ ऐसें नांव आहे त्याला ।शत मंडळातें खंड एक आलें बेताला ।ऐसी ही नवखंडे गणिलीं लिलावतर्कानं ॥३॥पृथ्वी नव खंड असी मोजणिला सापडली ।किती कोसाचे जव किती जव नव खंडे भरलीं ।आतां सहज अटकळ गणित जव बोटें सांगितलीं ।कवि हैबती म्हणे असी गणती याची ठरली ।शिरी कृपासावली नाथ निरजन वरदान ॥४॥२८ ( चढ ) कवि बस झोका खाली । आतां वेळ प्रसंगाची आली ॥ध्रु०॥तुम्ही तर थोरले गाणार । शहरामधी राहणार ।सिद्ध ग्रंथ पाहणार । अक्षरवटी कविता करणार ।चतुरता ऐकुन मर्जी खुश झाली ॥१॥म्हणती वनस्पती आठराभार वृक्षाचा संभार ।भार किती वृक्षाचा वद परभार । तुझ्या शिरावर भार ।बैसली सभा नदर कर भवताली ॥२॥आठरा भार गणित किती योजावे । अंतरांत समजावे ।भर मजलसींत सत्वर गर्जावे । गैरशब्द वर्जावे ।बोलु धिटपणा कर अवधारे ॥३॥मध्यम थोर लहान गणती करकी । बोलावे लवकर करकी ।जरी सुचेना उत्तर की । मग आली अब्रु वर की ।म्हणे हैबती तेचि वाली पुरते ॥४॥२९ ( उत्तर ) तुम्ही चतुर बैसला म्हणुन कथितो शास्त्राधार ।वनस्पतीचा भार सांगतो ऐका निर्धार ॥ध्रु०॥वनस्पती आठरा भार बोली सर्वत्रांची ।भार आहे केवढा खबर नाहीं त्या भाराची ।आहे श्लोकाची गणित सांगणी लिलावतर्काची ।श्लोकाचा अर्थ सांगतो गनती नेमाची ।स्वस्ती करून चित्ताची पहावा निर्णय साचार ॥१॥क्रोड एक दहा लक्ष वरते सहस्र एक्याऐसी ।या अंकाची दुणा करावी मोजुन अंखासी ।दोन क्रोड एकवीस लक्ष ऐका वचनासी ।वर सहस्र बासष्ट आला एक भार ताळयासी ।ऐसे अठरा भार वनस्पती म्हणती शास्त्राकार ॥२॥एकंदर अठरा भार किती परिमान ।सकळ जमा सांगतो करून भर भंडीचा मान ।एकुन चाळीस त्रेपन्न लक्ष एकुण नव्वद पाहणं ।वर ते सोळा सहस्र झाले गणती संधान ।आतां सांगतो लहान थोर मध्यमा आकार ॥३॥सतरा कोटी लक्ष एकुणीस बावन हजार ।तेरा कोटी लक्ष अठावीस सहस्र बहात्तर ।नव कोटी चाळीस लक्ष ब्याण्णव सहस्र ।कवि हैबती म्हणे वनस्पतीचा हा प्रकार ।प्रसन्न नाथ महाराज देत तार्किक मती विस्तार ॥४॥३० ( चढ ) ज्ञानवंत बसला थोरले कवीश्वर । एक पुसतो पूस शीघ्र बोलावें उत्तर ॥ध्रु०॥ऐकत होतों कीर्ति फार नांवाचा बडिवार ।कवि ब्रिदाचे भले जाणते शास्त्रांतील सार ।मनांत होता गांठ पडण्याचा विचार ।तो दिन आला आज भेट झाली समयानुसार ।प्रश्न सुचला एक नाहीं बहुतेक अगोचर ॥१॥एक पळाची साठ अक्षरें ऐसी आहे बोली ।एक अक्षरामधीं चाल सूर्याची किती झाली ।साठ पळाची घडी घडीमध्यें किती गावें भरली ।तिसा घडींचा दिन दिनाचें प्रमाण कोठेवर ॥२॥तिसा दिसाचा मास योजनें किती झाली त्याचीं ।एक वर्षामधे योजनें कितीक नेमाचीं ।ऐसी गणती करून सांगा शंभर वर्षाची ।किती योजनें झाली गणती सांगा कोसाची ।किती एकंदर बेरिज होती वदावी सत्वर ॥३॥नका उशीर करूं जरा मोल जलदिला आहे आतां ।उत्तर कल्यविण रिकाम्या काय करून वाता ।समजल अवघें ज्ञान तुम्ही जातीचें कवन गातां ।कविराज हैबती अखंडित मनी आठवी नाथा ।कवितेसी वर देता कृपाहस्त शिरावर ॥४॥३१ ( उत्तर ) तुम्ही चतुर बैसला आतां परिसावी गणित कविता ।परीमाण सांगतों पाहा चालतो किती सविता ॥ध्रु०॥एक अक्षरामधे एक रवि किती चाले ।चार सहस्र चारशेचार योजनें गणित आलें ।साठ अक्षरें पळ, पळामधें काय गणित जाहलें ।दोन लक्ष चौसष्ट सहस्र दोनशे च्याळीस कळले ।साठ पआळ्ची घडी किती ऐका त्याची गणिता ॥१॥क्रोड एक आठावन लक्ष चोपन हजार ।वर आणिक चारशे पुढील ऐकावा प्रकार ।तिसा घडीचा दिन दिनाचा कितिक आकार ।सत्तेचाळीस क्रोड लक्ष छपन ते साचार ।वर ते बत्तीस सहस्र आला ताळा याचा गुणीता ॥२॥एक मास दिन तीस आर्व चवदा क्रोड सविस ।ऐकुन नवद लक्ष साठ सहस्र मोजणीस ।वर्षाचे एक खर्व आर्व एकाहत्तर खास ।वरते बावीस क्रोड लक्ष्य पंचाहत्तर नेमास ।वरते झाले विस सहस्र समजले ध्यानासी आणता ॥३॥ऐसी शंभर वर्षे झाली चाल भास्कराची ।येक निशी खर्वें एकाहत्तर गणित याची ।बावीस आवीवर क्रोड पंचाहत्तर बेताची ।विस लक्ष बेरीज असि गणती झाली त्याची ।कवि हैबती म्हणे कवनमती नाथाची चालविता ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP