मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| लग्नाविषयीं शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - लग्नाविषयीं सहदेव - भाडळी ज्योतिषमतावर हैबतीबुवा घाडगे यांचीं कवनें. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती लग्नाविषयीं Translation - भाषांतर ( लावणी )सहदेव मतावरुनि दाखले पहा याची चौकशी ।वर्जवार तिथि नक्षत्रावर लग्नें देतां कशीं ॥ध्रु०॥बुधवारी अष्टमी हस्त नक्षत्र आलें जरी ।तरी लग्न देऊं नका काळ पडेल दोहीं घरीं ।गुरुवारीं रेवती आणिक पहा दशमी आली जरी ।नवरी अथवा नवरा मरेल तिथ संभाळा बरी ।बिजे उत्तरा आदितवारा वर्हाड पडतील फशी ।वर्जवार तिथी नक्षत्रांवर लग्नें देता कशीं ॥१॥सोमवारी चौथ स्वाती तरी लग्न देऊं नका ।पहायची कल्पना दोहीं घरी बसेल कीं हो धका ।मंगळवारी षष्टी अनुराधा वारस तिथ घेऊं नका ।विहीण किंवा व्याही मरतिल पुढें मारतिल हका ।शुक्रवारीं अनुराधा वारस विघ्न करविली पाशीं ।वर्जवार तिथी नक्षत्रांवर लग्न देतां कशीं ॥२॥सोमवारी पुष्य पुनर्वसु पाडवा येईल ।अनर्थ होईल पुढें नवरीचा बाप विष खाईल ।तिजेस पडती तीन उत्तरा वरा नाश होईल ।मूळ शनिवार किंवा रविवार उभयतांस खाईल । भरणी रोहिणी मंगळवारीं काळ उभयतां पाशीं ।वजवार तिथि नक्षत्रांवर लग्नें देतां कशी ॥३॥घातवार घातचंद्र टाकून निष्पंचक उत्तरा ।त्यापरि लग्नें द्या सांभाळूण तरिच ज्योतिषी खरा ।कवि हैबती म्हणे पंचांग पाहुनी गणती करा ।तंत्र मंत्र तांत्रिक याची ओळख कांहीं धरा ।आळस करूं नये शाहिरा का डोळे झाकशी ।वर्जवार तिथी नक्षत्रांवर लग्नें देतां कशी ॥४॥८लग्नाविषयीं ( लावणी ) भाडळीचा तो होरा ऐका लक्ष्य देऊन अंतरीं ॥ज्योतिष ऐका तुम्ही सत्वरीं ॥ध्रु०॥पूर्ण ज्योतिषी असेल त्यानें पाहावी वेळ घटिका ॥करूं नये आळस पडेल तो फिका ॥दिवस रात्रीं आठ वेळेचा विचार करीं तूं निका ॥पाहूं नका काळाच्या कौतुका ॥जरा मनामधिं शांत होऊनी तिथि नक्षत्रादिका ॥नाहीं तर कार्या बसेल तो धका ॥वार योग कर्णाचा मुहूर्त ध्यानीं आणी चालका ॥पहा जरा कार्या लागेल बुका ॥सत्य बोलावें म्हणे हैबती ज्योतिषाची टिका ॥सहदेव सांगे भाडळी आका ॥चंद्रबळ पाहुनी कार्या जाईं तूं सत्वरी ॥ज्योतिष ऐका तुम्ही सत्वरीं ॥१॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP