मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| सवाल शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - सवाल शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती सवाल Translation - भाषांतर ( सवाल ) बस बसा कविराज शब्दाची घालुनिया आडती ।परस्परा समजेल कुशलता ज्ञानाची होईल झडती ॥ध्रु०॥दुसर्याचें आश्रयानें बोलता आता प्रत्ययास येईल ।व्यर्थ कविला दुषण देता क्षणामध्यें अब्रु घेईल ।पाठीमागे गप्पा झोकिता क्षणांत अब्रु घेईल ।गैर अर्थ बोलणें बोलता शतमूर्ख तो होईल ।एक पुस सहज पुसतो सभेमध्यें होईल झडती ॥१॥मारुती अकरा एक सारखे होते ऐकून घ्यावें ।एक भक्त त्या ठाई सेवा करी नित्य सोने वाही ।एक मूर्तीला सोने वाहिले कीं पुन्हा दुप्पट व्हावे ।शेवटले मारुतीला साने वाहता सारखेच यावें ।अशी त्याची नित्यानें सेवा घडती ॥२॥प्रथम मुळीं किती सोने घेतले । अंक तेवढा सांगावा ।पुढें तयांचा प्रयोग पुसतां ऐसा समजावा ।चौदा कल्प सोने वाहिले किती आकार झाला पाहावा ।कितिक झाल्या खंड्या मण शेर करून दावा ।सभेमध्यें उत्तर बोला सर्वात आवडती ॥३॥किती मुळीं सोने होते वजन सांगा त्याचे ।कितिक झाले गुंजा तोळे जवू करून साचे ।कवि हैबता म्हणे गणू नका काम हे गाण्याचे नाथ निरंजन प्रसन्न होईल निरसन होईल प्रश्नाचे ।सभेंत उत्तर बोला गुरुकृपा आहे पुरती ।परस्परा समजेल कुशलता ज्ञानाची होईल झडती ॥४॥३७ आम्ही एक सुंदर पाहिनी वरुशे तेरा ।शीर उराला, उर शिराला शास्त्रीं पाहे कविश्वरा ॥ध्रु०॥जिच्या कमरेला छपन्न हात पाय तीनशे खांद्याला ।सर्व अंगाला एकच डोके नाके तीन तिच्या तळव्याला ।गाल घोट्याला कान होटाला दात हताचा अंगठ्याला ।कान सोळाशे योनी चारशे होत्या पायाच्या गुडघ्याला ।मांड्या तिच्या गणतीस आल्या मोजुन पाहिल्या त्या सतरा ।माय बाप नाहीं भ्रतार नाहीं नीर सुन्या मध्यें आहे थारा ॥१॥पाच काळजे त्या नारीला तीन पोटे परीयेसी ।चोळी घातली पायामध्यें लुगडे गुंडाळलें शिरासी । एक थान बिनदुधाचे होते तिच्या टिरीशी ।गुदद्वार सहाशास्त्रे वेद वर्णीती परीयेसी ।सर्वकाळ निपुण चांगली पुराणे बोलती आठरा ।बारा वर्षांतुन येती एकदा पाहा कामिनी आकारा ॥२॥ब्रह्मा विष्णु महेश हे तिन्ही देव तिजला भिताती ।सप्त द्विप नव खंडें चौदा दुर्गे मुखी वसती ।आनंत हात विष्णु कारणें ते सेवा तिची करिती । परंप्रतापी महा अनुतापी स्वरूप सुंदरा रुपवन्ती ।छपन्न कोटी भूमिका तेथील जाणावी रे खेचरा ।ध्यानीं धरवेना स्मरणीं पाहवेना बुद्धिमंद तेथें अगोचरा ॥३॥नार ऐवढी सांगून द्यावा कविराया मज लौकर ।सद्गुरुला पुसुन येई देई पदाचे उत्तर ।कविराज हैबती हमेशा गातो भेद - गुण - गंभीर ।तुरेवाल्याचे कान कापले गैरी पळती दुरदुर ।तुला एक मुदत देतो कविराय जन्म आठरा ।नाथ निरंजन प्रसन्न झले सवाई जरीचा फरारा ॥४॥३८ तुरेवाले प्रश्न विचारतात : ह्या पृथ्वीवर १०७ मस्तकें असणारा मनुष्य कोण ? त्याचे नांव काय ? हैबतीबुवा प्रश्नाचें उत्तर खालील कवनांत देतो :- ( उत्तर चढाचे ) तुम्ही ज्ञानसंपन्न बैसला सर्व जाणते मतांतर ।जाबसाल पुसल्याचा निर्णय ऐकून घ्या उत्तर ।लहान थोर बैसले सभेमध्यें चित्त द्यावें शब्दाला ।शास्त्रमती कविकार बोलले तेंच सांगतो तुम्हाला ।नर देखला स्वार नंदीवर लांब असें म्हणती ज्याला ।मुगुटी गंगा जटेंत ज्याच्या कंठीं वासुकी विषबाला ।अर्धचंद्र मस्तकीं शोभतो, शोभायमान सुंदर ॥ध्रु०॥पंच वदन श्री सांब नंदी तो वदन सहावे म्हणतात ।वदन सातवे आहे गंगेचे ऐसी ही झाली सात ।शंभर वदनें, कंठीं वासुकी हे वदती शास्त्रांत ।एकुन वदने झाली एकशें सात ॥नेत्र दोनशें चौदा मस्तकीं एक जमा पंधरा धरा ॥ध्रु०॥कर्ण दहा तें सदाशिवाचे, दोन नंदीचे तें, तें धरलें ।वासुकिला तर कर्णच नाहींत, चक्षुश्रवा ऐसे कळले ।शोभिवंत नर असा श्रेष्ठ शास्त्र तरी बोलुन गेले ।शचिनाथ सुरपति ज्याला ध्यान, करिती निरंतर ।प्रश्नाचें उत्तर केले हे समजावें चतुर ज्ञानी ।तिन्ही लोकामध्यें सांब असा नमस्कारीला देवांनी ।कविराज हैबति कविता करी शास्त्रसंमत ध्यानी ।प्रसन्न नाथ निरंजन आहे, देतर प्रकटुन ध्यानी ।वरदहस्त मस्तकी तयाचा समयसुचक अक्षर ।३९दहा प्रश्न पुसता ज्यास त्यास नित्य येता जाता ।अर्थ शुद्ध करून सांगतों कवि तुला आता ॥ध्रु०॥सूर्य राज पुरुष तो एक सर्वामधि धरती ।रवि नसता आंधारीं राज्य कसे करती ।रुपवान स्त्री तीच रात्र उडगण्या ठरती ।रात्र नसल्यास मग नाही विसावा । सर्व लोक मरती ।चंचल मन ते चक्र फिरे गरगरती । बिंब तेज सूर्याचे पहा तुज वरती । हा अर्थ समजेना तर कशाल अगाता अर्णी । दोही थड्या भरती नदी नव जाण । नदी बंद झाल्यावरी । नाहीं कायेचें भान । आपला बाप तोच अंतरीं मान ।हे कळत नाहीं ज्याला त्यानें जन्माची केली हाण ।पृथ्वी होते पर्यटन कांहीं नाहीं मागें राहिले ।ध्यानासी आणा । सहा प्रश्न येथें आले शास्त्राच्या बाता । गुणी हैबती दावी जन्माचा रस्ता ।प्रसन्न नाथ महाराज भगवा बाणा डफावरती ॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP