मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| गण शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - गण शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती गण Translation - भाषांतर १ श्रीगजानना गणपति । मंगलमूर्ति । द्यावी मज मतीसमारंभाला । हो । प्रसन्न व्हावें मजला ॥ध्रु०॥तुझें नाम कोणी न घेती । शीघ्र कवि गाती । यश नाहीं त्याला । फड प्रसंगाला । तिन्ही लोक सिद्धनाथ म्हणती । गंगा पार्वती । आवड सांबाला । हो ।ब्रह्मा विष्णूला ॥१॥ कविराज म्हणे हैबति । नमुन गणप्ति । कैलगी डफाला । हो । धाक वैर्याला ॥२॥२( कलगी - तुर्याच्या गाण्यांतील हैबतीबुवांचा गण ) गणराज यावें गणपती । करतों मी स्तुती । सभेमध्यें तुजला । प्रसन्न व्हा मजला ॥ध्रु०॥तुझें नाम कोणी न घेती । शीघ्र कवि गाती ।यश नाहीं त्याला । फड प्रसंगाला । त्रिलोक नाथ सिद्ध म्हणती । गंगा पार्वती - आवड सांबाला । ब्रह्मा विष्णुला । कविराज म्हणे हैबति ।कलगीवाला धाक वैर्याला ॥जी जी॥ह्या गणांत खोच आहे व ती खोच प्रभावी आहे. हैबतीचा पक्ष कलगीचा, हें या गणांतील स्पष्ट वचनानें सिद्ध होतें. ३गण गणपति सरस्वती नमो गण थोर । आधि नमितो माता - पिता । तेथुनी जग सारें । मातोश्रीनें दूध पाजिलें । अमृताची धार । केला हाताचा तिनें पाळणा । मायालोभ फार । केले नेत्राचे दिवे जिनें भोगले कष्ट फार ।कवि हैबति म्हणे मायेचा मोठा उपकार ॥ह्या गणांत कवीनें आपल्या मातापित्यांना वंदन केलें असून आईंचें ( मातेचें ) महत्त्व सांगून तिचा महिमा गाइली आहे. ( कोणी म्हणतात, कलगीला माया असें समजून तिचें महत्त्व रूपकांत दाखविलें आहे. ) N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP