शाहीर हैबती - अमृतसिद्धियोग

सहदेव - भाडळी ज्योतिषमतावर हैबतीबुवा घाडगे यांचीं कवनें.


( लावणी )
अमृतसिद्धि योग कैसा समजेल हें चित्तीं
सहदेवासी सांगे भाडळी त्याच्री प्रचीती ॥ध्रु०॥
रविवारीं तो हस्त आल्यावर कार्य होय पूर्तें ।
रामानें उचलिलें धनुष्य अंगुष्टमात्रें ॥
सोमवारीं मृग हा असतां सर्वही कार्याला ।
बिभीषणासी राज्यीं स्थापिला चिरंजीव केला ॥
मंगळवारीं अश्विनीवरती कार्या निघाले ।
पार्थ उद्धवा ज्ञान दिधलें त्यांसी उद्धरिलें ॥
बुधवारीं अनुराधा सुखाच्या असती निश्चितीं ।
प्रल्हादानें नाम स्मरिलें एकाग्र चित्तीं ॥
गुरुवारचा पुष्य बरवा ऐका हो ख्याती ।
पांडवांनीं यज्ञ केला हरि झाला साथी ॥
शुक्रवार रेवती स्थाइक कार्या तूं घेईं ।
ध्रुवबाळानें तप मांडिलें अढळपदीं जाई ॥
शनिवारीं रोहिणी कुंटिला ऐरावती मिळाला ।
वाण देऊन शेजीचें भीमानें स्वर्गीं पोचविला ॥
यांतुन पुष्य टाळीं विवाहीं सांवतसें तुजला ।
भाडळीचें सांगणें हैबती मुखानें वदला ॥
ऐसा योग उत्तम पाहुनी गमनादिक करिती ।
सहदेवासी सांगे भाडळी त्याची प्रचीती ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP