शाहीर हैबती - देहावरील मळा

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


मळा मळा म्हणवितां मळ्याची लांब आहे कळा ।
निराकार निर्गुण निराकारांत झाला मळा ।
औट हताची विहीर काढली पाणी वाहे झुळझुळा ।
होता पूर्वीचा मळा, मळ्याला पैलाच जीव्हाळा ।
आधार चक्रावर बांधला वरोटा हरी नाम सोळा ।
निराकार आधार मायेचे मकार बनविले चकार करे चाळा ।
पंच तत्त्वाचा नाडा सुंदर कर्ता आहे वेगळा ।
मन पवन बैल स्थानीं मळ्याचा धनी वनमाळा ।
शंभर वर्षांची गणीत आहे पाही नित्य कळा ।
पाय नसुन मोट हाकितो तो मायेचा सोहळा ॥ध्रु०॥
चार पाटानें पाणी वाहतें सात वाकु-द्याला !
नऊ दंड भीजवलें जागा कोर्डा कुठें राहिला ।
चाल -
पाणी मळांत वाहे झुळझुळा । सहस्र दळ मुखीं
जिव्हाळा । देह औट हताचा मळा । ठाईं ठाईं
लावल्या कला । मळ्याचा कर्ता धनी वेगळा ।
मिळवणी -
त्या मळ्याचा भाग निराआळ वर्णूं किती वेळां ।
निराकार निर्गुण निराकारांत झाला मळा ॥१॥
तिनशें साठ रोप मळ्यामधीं लाविल्या केळी ।
नाना तर्‍हेच्या खास लावल्या फुलांच्या करदळी ।
दहा लक्ष मळ्यामधीं बोरी आणि बाभळी ।
सवा लाखाची गणीत फळाची चार घड नारळी ।
देह मळ्याचा राखन धनी एक तो किती वेगळा ।
चाल -
शंभर वर्षें झाला करार । पंचवीसांत भर येनार ।
मग झाला त्याचा करार । त्याचा मृत्यु भुमित खाणार ।
मिळवणी -
कविराज हैबति नाथपदीं अखंडित लळा ।
निराकार निर्गुण निराकारांत झाला मळा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP