मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर हैबती| अधर ताल शाहीर हैबती गण कवन देवास प्रार्थना देहावरील मळा अध्यात्म ज्ञान वेदान्त अमृतानुभव गीतेवरील चुडा कटाव गजगौरीव्रत रामायण चारचंद्र सिमंतक मणी अधर ताल गणित काव्य संगीतशास्त्र सवाल घरच्या आयाविषयीं सहदेव भाडळी लग्नाविषयीं अमृतसिद्धियोग शाहीर हैबती - अधर ताल शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य. Tags : haibatipowadaपोवाडाहैबती अधर ताल Translation - भाषांतर अधर ताल ( चढ ) अधरा अधर न लागे गा गाणं । कळेल आतां हें ज्ञान ॥ध्रु०॥घरच्या घरांत ते शाहिरी करिता । चित्तीं अहंता धरिता ।रणांत लढतांना कारे डरतां । गली गली दडतां ।गांठ सहज आज घडली आतां जर का अससी ज्ञाता ।दाखले सांग आधार अर्थानं ॥१॥स्त्री एक ऐसी देखिली आचाट । हृदयीं स्त्रीया आठ ।येकीला चरण रे तिनसे साठ । दिसले हारीनें दाट ।तिचा हृदयीं कांत तिचा सदढ । कीर्त जसी ग जगजगाट ।त्याला चार लक्ष रे कान ॥२॥त्याचा आधार आहे सर्वाला । सृष्टी तारकवाला ।सनकादिक हृदयीं ध्याती ज्याला । हात सातशें त्याला ।नयन तर गणती नाहीं तेजाला । नर हा आण ध्यानाला ।त्याला तीन लक्ष रे चरण ॥३॥दाखला सांग शाहिरा आज याचा । कळेल तर्क ज्ञानाचा ।रठा आला हो नागेशाचा । असरा आहे नाथाचा ।ध्यानीं अर्थ आण रे शास्त्राचा । रंग टाक रे वेडाचा ।ह्या अज्या आधीं लक्ष रतीचें गाणं ॥४॥शाहीरश्रेष्ठ हैबतीबुवाला एकदा फडांत वरील प्रश्न नागेशाच्या रठांतील कवीनं विचारलेला होता. हैबतीच्या ज्ञानाला हें जवळ जवळ आव्हानच होतें. तें हैबतीनें स्वीकारून त्याला खालीलप्रमाणे उत्तर दिलेलें आहे. २१ ( उत्तर ) उत्तर ऐकून घ्यावें प्रश्नाचें । शब्द रोकडे याचें ॥ध्रु०॥स्त्री एक अचाट ती पृथ्वी जाण । हृदय स्त्री आठ म्हणनं । त्याचा आठ दिशानें नेत्रि पाहणं ।दिशा चरण परिमान । तिनसे साठ ग्राम च लून जाणं ।ऐसें आहे संधान । दिशा पति दिसते वस्ती स्थळ त्याचें ॥ध्रु०॥अग्नी दिशापति अग्नी कळला । हात सात हे त्याला ।कान ते चार लक्ष आपला । लक्ष म्हणती पाहण्याला ।योगी मुनी हवनी नमती त्याला । श्रेष्ठ आहे सर्वाला ।त्याचें प्रमाण तीन चरणाचें ॥१॥अग्नी तेज श्रेष्ठ सर्वांनाही आसी जाणती शाई ।शांति स्थित अग्नी वाचूनि नाहीं । शास्त्रें देती ग्वाही ।पाक सिद्धि अग्नीविण कांहीं । कदापी होणार नाहीं ।ऐसें महत्त्व अग्नीचें साचे ॥२॥वदनें दोन, चार शिंगें त्यासी । ग्रंथीं कथिलें ज्यासी ।अन्वय शोधुन पाहावा चित्तासी । येईल अनुभवासी ।कवि हैबति ध्यातसें नाथासी । लक्ष गुरुचरणासी ।मती दे कवनासी बळ आहे त्याचें ॥३॥२२ ( चढ ) बराच लावून झोक तुम्ही कवि बसला गायासी ।एक पुसतो पुसबोल उत्तर या ठाण्यासी ॥ध्रु०॥गाल ताल सुर धरून घातला डोल बरा मोठा ।छान चतुरता फारदिस वला ज्ञानाचा कोता ।असाच सर्वा भग्मनका आणु अब्रुला तोटा ।उत्तर कमी पडतां म्हणतील माळावरला गोटा ।कशास यावें पोटा गावें लौकिक नाथासी ॥१॥एक पाडिला शुभ्र चरा तो घ्यावा ऐकून ।लांबी ऐसी सहस्र गज तो होता चहुकोन ।हम चौरस सारखा किता गति गज पाहवा मोजून चोविस तसु गज एक ठाव आहे सर्वासी खूण ।कितेक झाल तसु जमाकर बेरीज अनायासी ॥२॥एक तसुचीं लिंगें तिनशें तेहतीस निर्धार ।किती लिंगें झाली कर गणती पाहे गुणाकार ।येक लिंग किंमत ती मोहराचा सुमार ।साडे पंध्रा रुपये एका मोहरेचा आकार ।किती करसी वेडे विचार शहाणपण येईल प्रत्ययासी ॥३॥तसु गज लिंगें द्दंव्य न्यारी न्यारी कर संधान ।किती रुके यैक कर विश्व समजेल आज ज्ञान ।कविराज हैबति नाथ निरंजन वरदान ।सवाई डफावर ब्रिद करण अर्थधुक प्रमाण ।तुरेवाले नादान मूर्ख लागले पळायासी ॥४॥२३ ( उत्तर ) ऐकून घ्या चिरा सांगतों बेरीज नेमाची ।गज तसु आणि लिंगें मोहरा गणित रुपयाची ॥ध्रु०॥ऐसी सहस्र गजचिरा सारखा ऐका गज गणती ।निधी एकावन आणिक वग्वीस सर्वाची भरती ।तसु शंख सत्तर पद्म सत्याहत्तर म्हणती ।निधि आठ्याऐशा आणिक ऐसी सर्व गणित वरती ।पुढें सांगतों आतां अटकल ऐका लिंगाची ॥१॥दोन रुप पस्तीस कल्प एकून उत्तर शंक ।छत्तिस पद्में सत्तर निधी च्याळीस सर्व ठीक ।मोहरा झाल्या किती सागतों ऐका तह कीक ।सत्तर रुप सत्तर कल्प आठ शंक पद्म दशक ।सारा निधी विस खर्व गणीत ही आली मोहराची ॥२॥आतां सांगतों रुपये किती ते ऐका परिमाण ।एक आहे फार आठ विस्तार असे जाण ।पंधरा रुपे शतहात्तर कल्प घ्या ऐसी शंका मान ।पदम सत्तावीस निधी एकवीस चाळीस खर्व पाहण ।जमा बंदी एकंदर गणती झाली हो यांची ॥३॥गज तसु आणि लिंग रुपये मोहराचा आकार ।एकंदर सांगितला आवधा करून गुणाकार ।लटके म्हणशील तर गुणून दावितो आतां सार ।कवि हैबति म्हणे चुकी नाहीं यात रतिभर ।कवितेसी आधार पूर्ण कृपा आहे नाथाची ॥४॥२४ ( चढ ) कविनें कविसी बोलावें । काय ताबा गैरीचा । ऐकून गप रहावें ॥ध्रु०॥ शाहाणपणाची जात घरोघरअर्थ नाहीं बरवा । दीड लावणिमध्येच मोठे झाला ।बेपरवा । किती तुझा दम आहे गाण्याचा कळला कीं सर्वा । मनांत समजावं ॥का॥ एक पुसतो पुस तुम्ही कवि म्हणता सुज्ञान । कुणे युगीं जन्मला वीर जांबुवंत बलवान । कोण तयाची माता पिता लावा ठिकान ।शास्त्रीं शोधावं ॥का॥कोण दिवशीं जन्मला नांव ठेवलें कुणीं त्याचें । कोणाचा अवतार काय कारण त्या जन्माचें । मेरुवरून टाकली उडी काय नांवदिवसाचें । प्रत्यया यावें ॥का॥ नका बसू भ्रमांत गावना हें उत्तर सांगा । जाईल लौकिक तुझावाडवडिलास थांगा । कविराज हैबति म्हणे काय करशील नुसत्या ढोंगा । शरणांगत जाव कविला ॥का॥२५ ( उत्तर ) पुसीचा जाब साल घ्यावा । रामायण ग्रंथा आन्वयकथितों प्रत्ययास यावा ॥ध्रु०॥ कृता युगाचा प्रथम संवत्सर परिमल हें नांव । ज्येष्ठ शुध तृतिया दिन बुधवार कविराव । जांबुवंत जन्मला पुष्य नक्षत्रों ऐकावें । पुढें ध्यान लावा । अर्थीं या । रिष मनुष्य अ कृती रुक्षराज नाम आभिधानी । ज्यांबुवंती त्याची स्त्री असे त्या उभयतांनीं । आराधना ब्रह्मयाची केली तप आती निर्वाणी । पोटीं जन्म व्हावा । अंशरू ॥रा॥आदि ब्रह्म तो शयनि असतां जांबई आली त्याला ।जांब अंश म्हणून नाम ठेविलें जांबुवयाला । गोरज रुषी पहावा । उपाध्या ॥रा॥ जन्म जांबुवंताचा झाला ऐसी या प्रमाण । जन्म कथन रामायणीं कथिलें आहे वाल्मिकानं । कवि हैबति म्हणे अगस्ती रामायणीं पाहणं । नाथ हृदयीं ध्यावा अखंडित । N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP