अध्यात्म ज्ञान वेदान्त

शाहीर हैबतीचे कवन म्हणजे रसमधुर काव्य.


( चढ )
ज्ञान खुण गुरुकिली मत अध्यात्म शोध पहावा ।
एक प्रश्न पुसतो करा उत्तर तरीच वाहवा ॥ध्रु०॥
लहानथोर बोलतात जें कां न पाहिलेम रविनं ।
कविमत मत कठीण कळेल ते युक्तिचियेवीण ।
होईल जरी कृपा तरीच बोलेल मुळ पैरविन ।
घट कविता करून म्हणल कविच ब्रिद वागवीन ।
पुसतां भेटेल तेव्हां काय बोलावे एडझवीन ।
गुरुकृपा जे ठाईं ते स्थळीं ज्ञानाचा राहावा ॥१॥
पंचतत्त्वहि कोण एकासी काय नातं ।
दश इंद्रियहि कशीं काय व्हावीत या प्राणांत ।
दश वायोची जात करावी चवकशी ध्यानांत ।
कोण कुणाचा आप्त कोण कोणाचे वचनांत ।
बुध्ध कोण मन कोण लगत कशी अंतःकरणांत ।
कोण आली कोठून कोण आली भ्रान्तवितो स्वप्नांत ।
मुख्य अंश शरिरांत आहे पांचात किंवा सहावा ॥२॥
आली कुणें वाटेनें कोण रस्ता जायाचा ।
जीव कोण शिव कोण ठिकाणा कोठें राहण्याचा ।
नाद छंदें कोण कोण धरणी सिध्ध राहण्याचा ।
पाप पुण्य तें काय कोण शरीर चालवायचा ।
नेत्रीं कोण पाहणार कोण श्रवणीं ऐकायाचा ।
झोपत जागा कोण स्वप्नीं चावळायाचा ।
कुणे ठिकाणीं कोण काय मजकूर कुणास लिहावा ॥३॥
आला गेला कोण आला कोठून कुठें गेला ।
येता आला कसा कोण राहिला कोण मेला ।
तंतु कोण रू कोण कोणता कोष्टी कोण शेला ।
कोण कुणाचा पुत्र कोण गुरुनाथ कोण चेला ।
कवि हैबती म्हणे प्रभु गुरुपुत्राप्रती केला ।
हें जरी नकळे तरी जन्मा येऊनी व्यर्थ गेला ।
गुरुपदी लीन झाला घावल ठिकाणी दाहावा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP