मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें १८४ ते १८६

गोविंदकृत पदें १८४ ते १८६

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद १८४ वें.

हे आदिमाया प्रणवाकार राया ! रे !  ॥ध्रुवपद.॥
इंदिरा हृन्मंदिरावरि ठेवि श्रीधर सुंदराकृति मंदिराप्रति आणिली दशकंधरा कुलनाशकारण ॥ हे आदिमाया० ॥१॥
सिद्धि घे, दुर्बुद्धितें करुणाब्‍धि ! तूं स्‍निग्‍धांग पाहुनि स्त्री नव्हे भ्रम यत्र भुलवी मान वचन अनुमान दूर करीं ॥
हे आदिमाया० ॥२॥
आणि तिज बहु मान देउनि ध्यान धरि अज्ञान दूर करि ज्ञानयुक्त प्रणम्‍य करि निज दास दीन गोविंद प्रार्थी ॥
हे आदिमाया० ॥३॥

पद १८५ वें.

सांग सुंदरी सखिये ! मंदिरीं वरलेंस कोणाला? ॥ध्रुवपद.॥
कां गे ! दुःखित, आतां शोधित उठलीस, मजकडे ।
पाहतां मोहुनी हा गेला ॥ सुंदरी० ॥१॥
उषा म्‍हणे आज चार प्रहर। जवळी होते प्राणेश्र्वर ।
रूप तयाचें अति सुंदर। गे ! सखयाला ॥सुंदरी० ॥२॥
बोलुनि बाला मूर्च्छित पडली गोंविंदाचें अनुपद सरलें ।
दासीनें त्‍या सावध केलें शिंपुनि उदकाला. ॥ सुंदरी० ॥३॥

पद १८६ वें.

आवडतो मनीं वर मजप्रती ।
बैसले उदंड पुंड भूप मुंड त्‍यांत चडकीर्ण तोचि रघुपती ॥ध्रुवपद.॥
कोंवळी तनू मदनपूतळा ।
पाहिलें म्‍यां आज द्धषिराजयांत साज करुनि माज बांधि सहज आंवळिला ॥
किरिट कुंडले कस्‍तुरी टिळा ।
चमकतो सुरंग रंग जालें दंग गुंग चित्त रंगभूमीस फांकती कळा ॥
माळ घेउनी उभी ते सती ॥ बैसले० ॥१॥
मैथिलाधिपें पैज घालुनी ।
पाहतो प्रताप बाप आणुनी काप चाप दाप अपघाली भूप जाउनी ॥
रामरूप हें रेखिलें मनीं ।
मंडपांत मात करुनि बैसलासे तांत संशयांत चित्त साजणी ॥
पर्वतापरी धनुष्‍य आंगणी ।
राम सकुमार फार हरचाप सारसार भंगणार कोण या जनीं ? ॥
इच्छिल्‍या वरा देईं भगवती ! ॥ बैसले० ॥२॥
गर्व रावणें करुनि ते क्षणीं ।
धनुष्‍यासि त्राण बाण वाण घेउनि अपमान म्‍लान होउनि पडे मेदिनी ॥
कलहमूळ हें बोलती मुनी ।
घनश्याम राम सिद्ध काम जगीं नाम करी श्याम वामहस्‍त लावुनी ॥
ओढि त्र्यंबका कार्यसाधनीं ।
भंगियलें धनुष्‍य कडड तडड तडउ झडड झडड लघु किंकिणी ॥
सर्व नरपती चकित पाहती ॥ बैसले० ॥३॥
देव स्‍वर्गिचें पुष्‍प वर्षती ।
दुर्जनास भयत्रास श्र्वास दानवांस भक्तदास परम हर्षती ॥
जिवीं तोषती कनक सुमती ।
स्‍वामि ते वसिष्‍ठ शिष्‍ट ज्ञानदृष्‍ट तिष्‍ठ इष्‍ट देवता सदैव स्‍थापिती ॥
गोविंदरावजी यश वर्णिती ।
साधिला त्‍वरा वरा तो नोवरा धरामरांस लग्‍नसमयीं द्रव्य अर्पिती ॥
नेम नेमिला वाल्‍मिकें मती ॥ बैसले० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP