मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
ज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५

ज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ३ रें.

नारायण हरी नरहरी. ॥ ध्रुवपद. ॥
नित्य नेम नमी तो प्राणि सुल्लभ ।
लक्ष्मीवल्लभ त्याजवळी हो ! ॥ नारा० ॥१॥
भुक्तिमुक्ति चारी तया घरीं ।
हरिविण जपतप एकचि पैं जाण ।
यमाच पाहुणा प्राणी हो ! ॥ नारा० ॥२॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहुनि वाड नाम आहे हो ! ॥ नारा० ॥३॥


पद ४ थें.

हरि आला वो ! हरी आला वो ! ।
संतसंगे ब्रम्हानांद झाला हो ॥ध्रुवपद.॥
हरी येथें वो ! हरि तेथें हो ! ।

हरिविण न दिसे रितें हो ! ॥हरी०॥१॥
हरी आदी वो ! हरी अंतीं वो ! ।
हरि व्यापक सर्वां भूती वो ! ॥हरी०॥२॥
हरि जाणा वो ! हरी जाणा वो ।
बाप रखुमादेवीवर जाणा वो ! ॥हरी०॥३॥


पद ५ वें.

नवलाव गे ! माय ! न्याहाळितां ।
कैसे मनाचे नयन उमलताती ॥
तेही एक द्दष्टि जिव्हा लाभगी ।
तरि सुलभ देखतां बोलती गे ! माय ! ॥ध्रुवपद.॥

साति वारि दोन्ही आपणच होउनि ।
सुरतरुमाझारिं ओळंगे ॥
तळीं त्रिभंगी मांडुनि ठाणमाण ।
घेउनि मेघाचें मान ।
विजु बरवे जतु गे ! माय ! ॥नवलाव०॥१॥
पहा वो ! याचे पायां शंभुचिये माथा ।
माय  सा शितली चंद्साति वारि दोन्ही आपणच होउनि ।
सुरतरुमाझारिं मांडुनि ठाणमाण ।
घेउनि मेघाचें मान ॥

विजु बरवे जतु गे ! माय ! ॥नवलाव०॥१॥
पहा वो ! याचे पायां शुंभुचिये माथा ।
माय ! सा शितली चंद्रबिंचें ॥
दाही गंगेतें तेथ असुरांचीं शिरें ।
आणि सकळ शरीरें ॥
तोडराचेनि बडिवारे बरवे जतु गे ! माय ! ॥बवलाव०॥२॥

उपनिषदांचा गाभा परि हा देहुडा ।
पाउली उभा मांडला दो खांबी ॥
तैसा दिसे देखा वेगळालिया कुंभस्थळा ।
परी हात सरळा पाट बांधला ॥
माळा मेखळा बरवे जतु गे ! माय ! ॥नवलाव०॥३॥

भलते उतिं वाहे नदी तेंवि स्थिरावे अगाधी ।
तैसी पुंजाळता हे मांदी ॥
दोंदी वेदांचि वेगळालिया वक्ष:स्थळा ।
न पुरे स्तनींचा डोळा ॥
माग न निघे कमळा, नव्हे रोमराजी गे । माय ! ॥नवलाव०॥४॥
लावण्य उदही वेळा तेचि वैजयंती माळा ।
वरि शोभतसे सोहळा ॥
साकारवेचा म्हणोनि प्रेम पुष्कळा ।
थडिये लाभ सकळां ॥
नयनसुखाच्या सुकाळा जग मेळवित गे ! माय ! ॥नवलाव०॥५॥
भोंवतिं तारागणें पुंजुमाजि अचळ ।
सुरिजु अला वक्ष:सथळा ॥
उजु तैसा दिसे देखा जेवणे न आंगें ।
उभवुनि करयुगें ॥
योग नादा तटिं रंगें नभ दुमदुमिलेंत गे ! माय ! ॥नवलाव०॥६॥
इंद्रधनुष्य काढिलें, तेंचि कुरळी वेढिलें ।
तयातळीं पहुडलें ॥
समाधिसुस्व अधरिंचा गुण दोहीं  ।
गर्भीं समवर्णु दाही ॥
स्वरीं गोड वेणु मन निववीत गे ! माय ! ॥नवलाव०॥७॥
यया वेधितां कांहि नुरे, रुपा अलें हेंचि खरें ।
वरी दावितां हें माजिरें ॥
गोपवेषाचें तमावरि हातियेरें ।
रविकाज कायि सरे ॥
तैसें बापरखुमादेवीवरें घेतलें गे ! माय ! ॥नवलाव०॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP