मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें २८४ ते २८७

गोविंदकृत पदें २८४ ते २८७

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद २८४ वे.

गौरीरमणा ! तूं सत्वर येईं । आलिंगन देईं ।
मजला भवत्राता, तुजविण कांहीं । भुवनत्रयिं नाहीं ।
मदनदहन, भवशयन नमन तुज, नंदिवहन, विजजनसुखदायी ॥ध्रुवपद॥
नाहीं सुकृत बा ! माझ्या पदरीं । मज दीना तारीं ।
जन्मांतर आडवें पडलें भारी । हें कोण निवारी ।
त्रिपुरदमन सुखसदन वदन मज दाखवि, मी बुडतों भवडोहीं ॥गौरी०॥१॥
हीनयाती शंबर तव नामीं । नेला निजधामीं ।
ठेवीं विरूपाक्षा ! मज पदपद्मी । या अंतर्यामीं ।
प्रागटुनि भवतम दुर करी हरि श्रम, चिद्रुप सुख गोचिंदा दावीं ॥गौरी०॥२॥

पद २८५ वें.

‘नरहरि’ हा चतुराक्षरिमंत्रसुधारस घे रसने ! ।
भवक्षयरोग निवारी श्रीगुरु निश्चय पदिं वरणें ॥ध्रुवपद॥

नवलगुरु तो देशिक माझा उपदेशिल ज्ञान ।
नयनकटाक्षें पाहतां सहज चुके हें अज्ञान ।
न करी अग्य विलक्षण वार्ता करि नामस्मरन ।
उठाव ॥ न भव पुनरपि हे रसने ! होईल कल्यान ॥न्रहरि०॥१॥
रस संपूर्ण परीक्षा करिसी तिकाम्लक्षार ।
रसीं क्षर लावुनियां वदसि जन हे लाघव फार ।
रव रव बांधित या अपवादें हे काय होय वर ।
उठावा ॥ रक्षिल हा परमात्मा अंतर वाम्हा रमावर ॥नरहरि०॥२॥
हर्ष मनीं भजनाचा तेणें तुष्टे रमानाह ।
हंस परात्पर योगी रमती अर्पुनियां देह ।
हरिनामामृत रस घे सत्वर जाईं सहदेह ।
उठावा ॥ हरिहरकीर्तनि गाईं ध्याईं तत्पदिं सुखलाह ॥नरहि०॥३॥
रिता ठाव नसे ज्यावांचुनि व्याप्त चराचरीं ।
रिद्धि सिद्धि जयाचे द्वारीं असती कामारी ।
रीस वानर नाथ नरोत्तम प्रभु दशवदनारी ।
उठाव ॥ रिणानुबंध तुझा मज गोविंदाला पदरीं धरीं ॥नरहरि०॥४॥

पद २८६ वें.

हो ! सुमंत ! राम हा श्रीमंत दाखवा ।
अंतसमय प्राप्त सीताकांत भेटवा ॥ध्रुवपद॥
मित्रकुळिं सुमित्र राम चित्र सम विचित्र गात्र विश्वामित्र सद्दश योगि
भोगिती अरूपरूप हृदयमंदिरी ।
जानकीसहित राम दाविं मंदिरीं ।
ज्यास्तव तप करिती मुनि गिरिकंदरीं ॥हो सुमंत०॥१॥
चंड द्विरदशुंड तसे मंडित भुजदंड सरळ कुंडलयुत गंडप्रभा चंड धनुर्दंड तुणिर पृष्ठिं बांधिला ।
चीर वसन त्यागुनि कटिं वल्क नेसला ।
अजिनांबर टाकुनि वनि राम बैसला ॥हो सुमंत०॥२॥
श्रीमद्रणरंगधीर अयोध्यापुरीचा अमीर सौ मित्रादिक वजीर वेष्टित मुनिवृंद राघवा ।
प्रेमभरित पाहीन मी केव्हां रमाधवा ? ।
तत्पदिं सुख घ्या तुम्ही गोविंद मानवा ॥ हो सुगंत०॥३॥

पद २८७ वें.

माझ्या सुकुमारा रामा कोणी तरिदावा. ॥ध्रुवपद॥
सुमंत निर्दय बाई ! कसी दया नाहीं ।
बुद्धिमंत मोठा त्यातें म्हणूं आतां कांहीं ? ।
माझ्या प्रारब्धाची गती विपरीत पाहीं ।
कसी ह्टी पडली याच्या भरताचि आई ॥
टीप ॥ कसा सवतीनें माये ! साधियला दावा ॥माझ्या०॥१॥
मही तुझा तो जाबाई तुज निरवीला ।
आपुलिये कन्येसाठीं स्नेह मिरवीला ।
एका सत्यासाठी राजा इनें हारवीला ।
असा कोणी नाही राजाराम फिरवीला ॥
दीप ॥ दूर वनीं गेला माझा जीवांचा विसावा ॥माझ्या०॥२॥
भारिरथी ! संग त्या वरुणासी कांहीं ।
तृपाकाळीं क्षणक्षणा पाणी ठायीं ठायीं ।
तुझा पिता राम त्यातें असोनियां देईं ॥
नदी वापि सरोवर तेथें प्रगट होईं ॥
टीप ॥ रामावरी प्रेम माये बहुत असावा ॥माझ्या०॥३॥
रामाचेनि वंश तुझा धन्य दिनकरा ! ।
तेव्हां उष्ण किरणा स्वामी तुम्ही शांत करा ।
माझीं बाळें वनीं भ्रमती सांभाळीं लेंकुरां ।
मेघा आड होईं, होई सुख रघुवीरा ॥
टीप ॥ सदैव राम माझा जवळी असावा ॥माझ्या०॥४॥
लोकप्राणसंरक्षका मंद मंद येईं ॥
श्रम वनीं चालण्याचे निवारुनि घेई ।
योगिदीक्षा ज्याची ऐसा श्रीराम विदेही ॥
टीप ॥ लवकरी येईं असा निरोप वदावा ॥माझ्या०॥५॥
अलक्षा नि:संगा योगिमनविश्रामा ! ।
आत्मारामा सत्ता तुझी चैतन्यनिष्कामा ।
हृदयस्था सद्रुरुराया ! स्वामी नरोत्तमा ! ।
चिदाकाशसूर्या आर्या दावि रूप आम्हां ॥
टीप ॥ गोविंदाचा जीव चिदानंदी मिळवावा ॥माझ्या०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP