मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|अनेककवि कृत पदे| रामकविकृत पदें ७७ ते ७९ पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते. Tags : padramkaviपदमराठीरामकवि रामकविकृत पदें ७७ ते ७९ Translation - भाषांतर पद ७७ वें. पंढरपुर वैकुंठभुवन । विठ्ठल नांदे महाराज रुक्मिणीरमण ॥ध्रुवपद.॥श्यामसुंदर हस्त कटावर । कमललोचन गळां पदकहार ॥पंढर०॥१॥मस्तकीं मुगुट कासे पीतांबर । हास्यवदन उभा विटेवर ॥पंढर०॥२॥भाळीं टिळक, गळां तुळसीहार । आंगी उठि चंदन केशर ॥पंढर०॥३॥शंख चक्र गदा पद्म आयुध । कौस्तुभ वैजयंती माळ सुगंध ॥पंढर०॥४॥सर्व तीर्थांचें तीर्थ चंद्रभागा । स्नान करितां पातक जाई भंगा ॥पंढर०॥५॥ऐसें पांडुरंगाचें पूर्ण ध्यान । दर्शन होतां नासे जन्ममरण ॥पंढर०॥६॥भगवज्जन प्रेमभावें भजती । त्यांसी मोक्ष त्वरित होय प्राप्ति ॥पंढर०॥७॥राम म्हणे शरण देवा ! तुज । तुझी स्मृति सतत देई मज ॥पंढर०॥८॥पद ७८ वें.कृष्णा ! धननीळा ! लौकर येईं ।देवा ! श्रमलों मला मुक्ति देईं देईं ॥ध्रुवपद.॥संसाराचें दु:ख झालें भारी । कन्यापुत्रांवरी लोभ बहुपरि ।येणें चित्ता व्यामोह मुरारि ! आतां दिनातें सोडवीं हरि हरि ॥कृष्ण०॥१॥कामसर्पें मज ग्रासियलें । तेणें मन भ्रांतिमध्यें पडियलें ।म्हणुनि निजसुख अंतरलें । हरि ! सोडवीं आयुष्य गेलें गेलें ॥कृष्ण०॥२॥नारायणा ! देवा ! कृपा करीं । जन्ममर्णमोह निवारीं ।मला मायानदितें उतारीं । ऐसें विनवितों कुंजबिहारी हो हरि ! ॥कृष्ण०॥३॥ह्रदयी गोपाळ प्रगढला । तेणें ब्रम्हानंद थोर जाला ।अहंममता विसर पडियेला । राम म्हणे द्रगद्दश्यभाव गेला गेला ॥कृष्ण०॥४॥पद ७९ वें.हरि ! मज दीनातें उद्धरीं ॥ध्रुवपद.॥त्रिविध ताप वैरी जाळिताती । बहु याचें दु:ख होतसे भारी ॥हरी०॥१॥बासनेच्या छंदें काम्यकर्मे केलीं । इहस्वर्गफळभोगकारी ॥हरी०॥२॥आतां देवा ! भ्रमांत बुडालों । कृपा करी, भवाब्धितें तारीं ॥हरी०॥३॥राम म्हणे कृष्णा ! करुणा परिसावी । तव स्मृति देईं अंतरीं ॥हरी०॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP