मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|
गोविंदकृत पदें ३२१ ते ३२३

गोविंदकृत पदें ३२१ ते ३२३

पद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.


पद ३२१ वें.

गुणगहना रे ! प्रियकरा ! सख्या ! रुक्मिणीवरा ! कटिसूत्रभूणा ! ।
मग भवश्रमहारका ! दीनतारका ! पद्मलोचना ! ॥ध्रुवपद॥
तव नामविषय हें सार, गोड मज फार, जळो संसार दु:खवेदना ।
किती सोसाचा हा भार, काय करणें या दाराधना ।
सुखकर हे तूझे पाय, हृदयिं मी ध्या, तोडि भवबंधना ।
भिवरातीरनिवासा, येइं बा ! त्वरे कंसमर्दना ॥
चाल ॥ आधींच लाविलें पिसें पुढें भलतिसें करुं इच्छिसी ।
मी कदा सोडिना तुला भक्तवत्सला जि आव्हेरिसी ।
पहिलेचि प्रीति लाविली आतां कां मजला तूं त्यागिसी ! ॥
टीप ॥ सोडिली लाज श्रीपती, देइं मज मती । दु:संगती न देईं मना ॥मम०॥१॥
जनविरुद्ध दिसे मात, आणि ध्यानांत, निंदिती आप्तवर्ग सर्वही ।
परि मी न गणीं कोणास, आस धरलीसे तुझे पायीं ॥
लौकीक सोडिला हरि ! धांब लौकरी करीं मज धरीं बुडतों भवडोहीं ।
दे सत्वर वरदान मान रक्षीं तूं विठाबाई ॥
चाल ॥ साम्राज्यसौख्यवर्धना ! गोवर्धनोद्धारणा ! हरी ! ।
राधामानसरंजान ! भवभंजना ! येइं लवकरी ।
आरामवाटिका बरी, येइं सत्वरी हृदयमंदिरी ॥
टीप ॥ तूझें म्हणविल्या आज कायसी लाजासांग यदुराज हेचि सूचना ॥मम०॥२॥
पातक म्यां केलें फार, बुद्धि अविचार पतित साचार जाण श्रीधरा ! ।
नाहि मला आधार, नेइं परपार, भक्तप्रियकरा ॥
नामाचा देईं थार, चुकविं संसार, तार वा ! बा ! तूंचि सोयरा खरा ।
धीर नसे मम मनीं, वैस हृद्भुवनीं सीतावरा ! ॥
चाल ॥ गुरुनाथ नृसिंहा हरी, स्वस्थ करिं चित्त भ्रंति वीघडी ।
वा ! मी बुडतों भवपुरी, येइं सत्वरी घालि तूं उडी ।
नामाची सांगड घेइं, नेई गोविंदा पैलथडी ॥
टीपा ॥ गुरुनाथ नृसिंहा हरी, स्वस्थ करिं चित्त भ्रंति वीघडी ।
बा ! मी बुडतों भवपुरीं, येइं सत्वरी घालिं तूं उडी ।
नामाची सांगड घेइं,, नेईं गोविदा पैलथडी ॥
टीप ॥ तूं निदानींचा एक पाहिला लेख दविं श्रीमुख गुरु चिद्धना ॥मम०॥३॥

पद ३२२ वें.

बोल एकदां, एकदां इंदुवदने । क्षेम दे मला दनुजकदने ! ॥ध्रुवपद॥
सजल धन जसा, तसा रंग तनुचा । नांइं जन्मला जनक मनुचा ।
न चले तुजपुढें, गर्व अनुचा । मारिला ज्येष्ठ पुत्र दनुचा ॥
चाल ॥ तेचि करकटीं । उभि राहुनि भिवरातटीं ।
स्वजनासी लक्षी दिठी । दिठी कंसकदने ! ॥क्षेम०॥१॥
वेष्टिलें कटीं, कटीं पीतवसन । हदयिं द्विजपायाचें भुषण ।
मकरकुंडलें, कुंडलें युक्त श्रवण । पाहतां तुझें वदननलिन ॥
चाला ॥ काम लाजला । शिवनेत्राग्नित भाजला ।
होवोनि तनय राजला । राजला पद्मनयने ! ॥क्षेम०॥२॥
तुझ्या स्वरुपाचा, स्वरुपाचा हा चाळा । लागला वृद्धतरुणबाळा ।
हौनी पिसें, पिसें आननाला । पाहसि परि न बोलसी त्याला ॥
चाल । बहुत प्रार्थित । सुर सकळ तुला विनविती ।
बोलाया कुंठित मती । मती दर्पहरणें ॥क्षेम०॥३॥
ऐकुनी तुझी, तुझी कीर्ति ऐसी । आम्हि दुर्बळ फणिपुरवासी ।
फिरत पातलों, पातलों पंढरीसी । तुला देखिलें सगुणरासी ॥
चाल ॥ बोल एकदां । दे क्षेम, चुकवि आपदा
निजसूख भोगवी सदा । गोविंद घेत धरणें ॥क्षेम०॥४॥

पद ३२३ वें.

कधिं येसिल पंढरिराया ! । भवसिंधू पार कराया, ! ॥ध्रुवपद॥
भेटीची फार अपेक्षा । काम त्यजिली अंतरसाक्षा ।
धांव रे ! पद्मदलाक्षा । सर्वांतरचित्तपरीक्षा ।
गुणगहना सर्वाध्यक्षा । स्रमहरणा येइं अलक्षा ।
स्मरहरप्रियकर यदुराया ! ॥भव०॥१॥
निढळावरि ठेवुनि पाणी । अष्टदिशा पाहतों नयनीं ।
न येसी कां माझें ध्यानीं । झालों उदास अंत:करणीं ॥
तूं दासाचा अभिमानी । सज्जनजन वदती वदनी ।
दुर करीं अविद्यात्मक माया ॥भव०॥२॥
कधिं नाहीं मुकृत घडलें । दुष्कृत बहु अंगीं भिडलें ।
तव नामीं मानस जडलें । म्यां तेंचि सख्या जिवीं धरिलें ।
गोविंदा तारी सखया ! ॥भव०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP