मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य| अभंग ५६ ते ६० श्रीकृष्णमाहात्म्य अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५० अभंग ५१ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७५ अभंग ७६ ते ८० अभंग ८१ ते ८५ अभंग ८६ ते ९० अभंग ९१ ते ९५ अभंग ९६ ते १०० अभंग १०१ ते १०५ अभंग १०६ ते ११० अभंग १११ ते ११५ अभंग ११६ ते १२० अभंग १२१ ते १२५ अभंग १२६ ते १३० अभंग १३१ ते १३५ अभंग १३६ ते १४० अभंग १४१ ते १४५ अभंग १४६ ते १५० अभंग १५१ ते १५५ अभंग १५६ ते १६० अभंग १६१ ते १६५ अभंग १६६ ते १७० अभंग १७१ ते १७५ अभंग १७६ ते १८० अभंग १८१ ते १८३ बालक्रीडा - अभंग ५६ ते ६० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ५६ ते ६० Translation - भाषांतर ५६.मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥१॥लांकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥२॥भावा भुललासे खरा । कांपतसे थरथरा ॥३॥मुख दावीं उघडोनी । पाहें ह्मणे चक्रपाणी ॥४॥ब्रह्मांडें देखिलीं । नामा ह्मणे वेडी झाली ॥५॥५७.यशोदा घुसळीत । स्तन मागे भगवंत ॥१॥घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥२॥दूध जातसे उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥३॥मंथन पात्रातें फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥४॥मागें धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥५॥हातीं न लगे जगजेठी । नामा ह्मणे होय कष्टी ॥६॥५८.कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥धरूनि आणीला । आजी बांधीन मी तुला ॥२॥दावें सोडूनियां । बांधि-तसे देवराया ॥३॥फार करितोसी खोडया । गोपी दाविती वांकु-डया ॥४॥दावीं अनंत लावीत । दोन बोटें उणें येत ॥५॥करि-ताती चोज । परी नव्हेचि उमज ॥६॥श्रमतसे वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥७॥विष्णुदास नामा पुढें । आला जेथें उभीं झाडें ॥८॥५९.दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥अनंत अवतार घेसी भक्तां-साठीं । कृपाळु जगजेठी तुज नमो ॥३॥यज्ञेशा सर्वेशा दयानिधि ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥४॥धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहें आह्मांकडे ॥५॥जोडोनियां हात करिती विनंति । देईं तुझी भक्ति जन्मोजन्मीं ॥६॥करूनि नमस्कार हळू-हळू चालती । वेळोवेळां पाहाती कृष्णाकडे ॥७॥मोडतांचि वक्ष नाद ऐकूनियां येती । धांवोनि पहाती नामा ह्मणे ॥८॥६०.समस्तां सांगती लहानालीं मुलें । नवल देखिलें आह्मीं आतां ॥१॥वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासीं लागती कान्होबाच्या ॥२॥यशोदेचे मनीं झालासे विवेक । वैकुंठनायक येथें आला ॥३॥नामा ह्मणे तिशीं घालितसे घाला । अपराध तिजला काय असे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP