उपदेशपर पदे - भाग ३

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१४५१
( राग-कामोद; ताल-धुमाळी, चाल-लावूनिया० )
प्राणी संपत्ति उणें हांसती ते पिसुणें । येळिल करितां दुःख दुणें रे ॥ध्रु०॥
पुरवीं जीवीचें कोड तंवरी सकळ गोड । नसतां अंतरीं भंडभंड रे ॥१॥
रामेविण जिणें तेणे दुःख भोगणें । दास म्हणे उणें कोटिगुणें रे ॥२॥

१४५२
( राग-श्यामकल्याण; ताल-धुमाळी )
लंडी भ्याले रे चकचकिले रे । कांपत कांपत पळोनि गेले विमवीं लपाले ॥ध्रु०॥
जरी म्याल तरी जाल जाणें चुकेना जाणें चुकेना । ऐकिलें जना आलें मना करणी होयेना ॥१॥
वीतभरी पोट त्यासी चट अवघें आटलें । तरी मेले तेव्हां गेलें वैभव तूटलें ॥२॥
रामदास म्हणे आस सोडून ऊठ आतां । दिसेंदिस गेलें आयुष्य न मिळे पाहतां ॥३॥

१४५३
( राग-मैरव; ताल-धुमाळी )
कोणाचे हत्ती घोडे । वाडे वाडे पवाडे । दिवसंदिवसा वमक वाढे । संसार मोडे ॥ध्रु०॥
वय जातसे पळेंपळ । जिणें हें चंचळ । केव्हां येईळ काळवेळ । देह विकळ ॥१॥
दास म्हणे सोय घरीं घरीं विवरीं । काय येणार बराबरी । विचार करीं ॥२॥

१४५४
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी )
बाह्यात्करें ठकलीं पोरें । कोण जाणे पोर कीं थोर । देवद्वारीं अभक्त चोर ॥ध्रु०॥
व्याप केला परि काबाडाचा । अर्थ कैंचा परमार्थ कैंचा । सर्व गेलें द्रोही देवाचा ॥१॥
सार गार ओळखी कांहीं । पाहों जातां कांहींच नाहीं । कष्टरूप सर्वदा पाहीं ॥२॥
दास म्हणे ज्याचें तो जाणे । परीक्षिती लोक शाहाणे । अंतर्वेधी सर्वहि बाणे ॥३॥

१४५५
( राग-खमाज;  ताल-धुमाळी )
या वैभवाचा वीट कां येना ॥ न ये त्याची सुटिका होयना ॥ध्रु०॥
सकळ गोपिका हरिविरहित सुंदरी ॥ वियोग न कंठे दुःख भारी । कृष्ण गोपिकेचें वियोगदुःख हरी ॥ ऐसा तोही गेला लाज धरीं ॥१॥
वैभव जालिया सुख ॥ गेलिया परम दुःखा ॥ हित नेणें दुःखी होय रंक रे ॥ तया वोसंडूनि गेला हा विवेक ॥ वय गेलिया अंतीं कुंभिपाक ॥२॥
वैभव गेलिया जनीं ॥ न पुसे तया कोणी ॥ अव्हेरिला स्वजनपिसुणीं ॥ देह खंगतां जाणवेल निर्वांणीं ॥ आपंगिना विण चापपाणी ॥३॥
विषय वोरंग करी ॥ स्वहित मनीं घरीं ॥ गुंतों नको प्रपंचविचारीं ॥ वायां कासया सिणसी संसारीं ॥ रामीं रामदास्य धरीं ॥४॥

१४५६
( चाल-नामामध्यें उ० )
अरे जना तुज कैसें विश्वासलें । किंवा नरदेह चिरंजीव जालें । किंवा अमरपद फावलें । सांग कोण्यागुणें भुललासी ॥ध्रु०॥
किंवा त्नयलोकींचें वैमव । तुजचि अचळ अढळ सर्व । सोयरा केला यमराव । कां रे रघुराव न भजसी ॥१॥
देह तंव अस्थींची पंजरी । दुर्गंधि स्त्रवती नव ही द्वारीं । येथें वसावयाची कोण बा थोरी । कां रे श्रीहरि न भजसी ॥२॥
येचि अथीं शास्त्रें सांगतचि ठेलीं । येचि अथीं पुराणें वदलीं । येचि अथीं सिद्धसाधकाचि बोली । कां रे अव्हेरिली मूढमती ॥३॥
वक्तयाच्या सूखा पाठ पडिलें । श्रोतयाचें श्रवण घसाटुनि गेलें । एवं उमयतां वय वेंचिलें । अर्थ जात गेलें वाहातचि ॥४॥
आतां लाज धरिं होईं उदास । सांडीं सांडीं नाथिला विषय-सोस । विनवि रामीरामदास । शरण राघवास जाईं वेगीं ॥५॥

१४५७
( राग-अहेरी: चाल-गावें रे नाम० )
जातो रे, काळ जातो रे ॥ध्रु०॥
बोलत चालत शेवट आला ॥ कोण राहतो रे ॥१॥
पळ घडी दीस मास वरुषें ॥ क्षीणचि होतो रे ॥२॥
दास म्हणे तो येकट जातो ॥ लोक पहातो रे ॥३॥

१४५८
ऐक सजणा रे मनमोहना संपत पाहतां कवणाची । जाइल काया जाइल वांया उसणी आणिली पांचांची ॥१॥
रावण ज्ञानी ( तो ) अमिमानी लंका ज्याची सोन्याची । तेहतिस कोटी बंदीं सुदलें घडि त्यांला हो जाची ॥२॥
सूर्यवंशीं राम जन्मले केवळ माय भक्तांची । हनुमंतानें दहन केलें नगरि जाळिली पाप्याची ॥३॥
दहा अवतार ऋषिजावर वार्ता मार्कंडेयाची । चौदा कल्प उष्ण सोशिलें छाया नाहीं गुंफेची ॥४॥
कौरव गेले पांडव गेले काय कथा आणिकांची । छप्पन कोटी यादव गेले कुडी नाहीं कृष्णाची ॥५॥
सावध व्हावें भजन करावें भक्ति करावी देवाची । असो तरी गोष्टी ऐका रामीरामदासाची ॥६॥

१४५९
( राग-महाड; ताल-दादर )
भक्ति नको भक्ति नको विषयांची ॥ध्रु०॥
विषयें वाटतसें सुख ॥ परि तें दुःखमूळ ॥१॥
विषय सेवितां गोड ॥ शेवटीं जड परिणामीं ॥२॥
रामदास म्हणे मनीं ॥ विषयें जनीं अधोगती ॥३॥

१४६०
( चाल-धांव रे राम० )
दुर्लभ हा संसार ॥ परिक्षणभंगूर ॥ नासतां वेळ नाहीं ॥ याचा पहावा विचार ॥ध्रु०॥
चौर्‍यांसी लक्षयोनी ॥ फेरे करुनी आला ॥ शेवटीं अकस्मात ॥ नरदेह प्राप्त जाला ॥१॥
जेणें हें सर्व केलें ॥ त्यास पाहिजे धुंडीलें ॥ नेणतां व्यर्थ चि हें ॥ नरदेह वांया गेलें ॥२॥
रामदास म्हणे भावें ॥ हिता आपुलें करावें ॥ अंतकाळीं येकायेकीं ॥ सर्व सांडुनि जावें ॥३॥


N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP