मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग ८ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ करूणापर पदे - भाग ८ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ८ Translation - भाषांतर १३११ ( राग-काफी; ताल-धुमाळी )सुंदर नामा रघुपति रामा रे ॥ध्रु०॥राम ऐसें वाचे वदतां । पावन करिं तूं आम्हां रे ॥१॥मी बुडतों भवसागरडोहीं । पार करीं तूं आम्हां रे ॥२॥रामदास मी अंकित तुजला । धांव धांव तूं आम्हां रे ॥३॥१३१२( चाल-कोण मी मज० )दीनवत्सल राघवा पतितपावना देवा ॥ध्रु०॥पुण्यपरायण सुंदर गायन विसरवी देहभावा ॥१॥पंकजलोचन विबुधविमोचन गांजलीयांस कुडावा ॥२॥दास म्हणे दोन सकळ तुझे लोभ बहुत असावा ॥३॥१३१३( चाल-वरील ) देवा तुज कोठें रे पाहावें । तुजविण कैसें रे रहावें ॥ध्रु०॥बहुविध श्रम करितां श्रमला । नेणों कोठें जाऊन निजेला ॥१॥सकळ कांहीं करित चि असे । नयनीं पाहतां न दिसे ॥२॥दास म्हणे तो जगजीवनु । तेथें माझें तनु आणि मनु ॥३॥१३१४( राग-कल्यान; ताल-धुमाळी; चाल-कोणाचे हे हत्ती ) थोर वाट पाहतां जाला सीण रे । तुजविणें रे । वाटे संसार परम कठिण रे । तुजविण रे ॥ध्रु०॥पराधेन न चले कांहीं केलें रे । वय गेलें रे । तुझ्या पायी मानस गुंतलें रे । विगंतुलें रे ॥१॥मायबापा वियोग साहवेना रे । राहवेना रे । तुजविण संसार यातना रे कंठवेना रे ॥२॥देवराया न करिं उदास रे । रामदास रे । तुझा मार्ग पाहतों रात्नंदिस रे । निजध्यास रे ॥३॥१३१५( राग-खमाज; ताल-धुमाळी; चाल-सदुगुरु सेवीं० )चातक पाह्तें गगन न दिसे घन । न मनें आणिक जीवन । तैसें हें मन ॥ध्रु०॥सकळ विकळ जगति नस्तां जीमूति । तुजविण मज भूपती तैसी हे गती ॥१॥तटाकें संपूर्ण भरलीं पंकजें आलीं । जीवनें तेथींचीं आटलीं । कमळें कोमालीं ॥२॥उदंड देखतां जीवन तळपती मीन । जळशोक पडतां जान न ठेविती प्राण ॥३॥वन तळपती मीन । जळशोक पडतां जाण न ठेविती प्राण ॥३॥रघुराया कृपाळू होसी कां रे न येसी । तुजविण नाहीं आम्हांसी आम्ही परदेसी ॥४॥काय तुज संकट आलें कठीण केलें । जीवित्व आमुचें वेंचलें प्राणांत जालें ॥५॥पाहावी कोणाची रे आस जालों उदास रामा पावें रे आम्हांस विनवी दास ॥६॥रघुवीर पावला कैसा जाला तमासा । भक्ता न विसंबे आमासा कृपाळु ऐसा ॥७॥१३१६( राग-बिहाग; ताल-धुमाळी ) रामा ये रामराया रे ॥ध्रु०॥ शरिराचा पांग आतां नको रे रामा । देहबुद्धि बेडी तोडीं नेईं निजधामा ॥१॥इच्छेचें बंधन माझें तोडूनि टाकावें । मन हें प्रपंचीं रामा गुंतोंचि नेदावें ॥२॥प्रपंचाचा रंग माझा वोरंगोनि गेला । मानसीं सखया तुझा वेधु लागला ॥३॥सवें त्वां लाविली आतां सांडी कां रे केली । वृत्ती हे निघेना तुझे स्वरूपीं गुंतली ॥४॥तुझिया वियीगें जिणें नलगे आम्हांसी । लागलीसे तुझी सवे रामीरामदासीं ॥५॥१३१७( हुसेनी; ताल-धुमाळी; चाल-धन्य हे० )कानकोंडया सुखाकारणें मनें लुलु केली । तेणें देहा सुख नव्हे हळहळ जाली ॥१॥कृपासिंधु रघुनायका अव्हेरूं नको रे । शरण रविकुळटिळका दास दीन मी रंक रे ॥२॥तुझे भेटी येतां रामा तुझा मार्ग चुकलों । विषयकांटे रुतले तेणें सीण पावलों ॥३॥ऐसा दगदला देखोनि रामा करुणा आली । तंव वैराग्यहनुमंतें पुढें उडी घातली ॥४॥हा हनुमंत जयाचा कोंवसा धन्य तयाचें जिणें । तयालागीं ज्ञान बापुडें लाजिरवाणें ॥५॥रामदास रामदास्यें रामभेटीस गेला । मीपण सांडुनी राम चि होउनी ठेला ॥६॥१३१८( राग-भूप; ताल-धुमाळी )माझे जीवींचा सांगात । माझे मनींचा सांगात । भेटी घडो अकस्मात ॥ध्रु०॥पावन तो रे आठवतो रे । गळव ढळत अश्रुपात ॥१॥कोण तयाला भेटवि त्याला । निकट मनें प्रणिपात ॥२॥दास उदासिन करितो चिंतन । पावन ते गुणगात ॥३॥१३१९( राग-कल्यान; ताल-दादरा ) वेळु कां लाविला रामें भक्तजानपूर्ण कामें । तयावीणें भवभ्रमें बांधिजेतें ॥ध्रु०॥अंतर गुंतलें गुणीं । जीव हा जाहला ऋणी । आठवितां प्रीति दुणी वाढतसे ॥१॥असतां नाहींसा जाला । जवळींच दुर्हावला । तेणें गुणें मज जाला संदेहबाधु ॥२॥रामीरामदासी मन । जालें होतें उदासीन । अंतर समाधान राघवा देखतां ॥३॥१३२०( राग-कल्यान; ताल-धुमाळी; चाल-सुंदर पंकज० )कां नये अझुनि देवराणा । तयालागीं मंदिरें तजिलीं आजि वो कवणें गोंविला प्रेमळ साजणी वो ॥१॥पदीं प्रेमा गुंतला साजणी माय वो । न कळे चिंतनीं दासा मनीं भावित वो ॥२॥१३२१ ( राग-भूप; ताल-धुमाळी )आम्हां भक्तांचिया काजा । कैं पक्षी रघुराजा ॥ध्रु०॥काय आहे मा तें द्यावें । कैसें उत्तीर्ण व्हावें ॥१॥दास म्हणे धन्य लीळा । जाणे सकळ कळा ॥२॥१३२२( राग-मैरव; ताल-धुमाळी )जन बुडाले बुडाले पोटेंविण गेलें । बहु कष्टले कष्टेले किती एक मेले । विसा लोकांत लोकांत एकचि राहिले । तेणें उदंड उदंड दुःखचि साहिलें ॥ध्रु०॥कांहीं मिळेना मिळेना मिळेना खायाला । ठाव नाहीं रे नाहीं रे नाहीं रे जायाला । हौस कैंची रे कैंची रे कैंची रे गायाला । कोठें जावें रे जावें रे जावें मागायाला ॥१॥शेत पिकेना पिकेना पिकेना उदंड । कष्ट करूनि करुनि होत आहे भंड । अवघें जाहालें जाहालें जाहालें थोतांड । दुनिया पाहतां पाहतां उदंड जाली लंड ॥२॥देश नासला नासला उठे तोचि कुटी । पिकें होतांचि होतांचि होते लुटालुटी । काळाकरितां जिवलगां जाली तुटातुटी । अवघ्या कुटुंबा कुटुंबा होते फुटाफुटी ॥३॥कैंचा आधार आधार नाहीं सौदागर । कांहीं चालेना उदीम व्यापार । सर्व सारिखे सारिखे जाला एकंकार । काळ कुठीण कठीण कैसा पावे पार ॥४॥नलगे हांसावें हांसावें सगट सारिखेंचि । लोक तुटले तुटले संसाराची चीची । जनीं इज्जती हुरमती पाहों जातां कैंची । दुनिया जाली रे जाली रे बळाची ॥५॥धान्य महाग महान तैसें हि मिळेना । कैसें होईल होईल होईल कळेंना । काय होणार होणार टळेना । पुण्य गेलें रे गेलें रे कांहींच कळेना ॥६॥पाउस पडतो पडतो उदंड पडतो । नाहीं तरी उघडे उघडे अवघा उघडतो । पीळ पेंचाचा पेंचाचा प्रसंग घडतो । लोक उधवेना उधवेना अवघाच दडतो ॥७॥सुडकें पटकर पटकर न मिळे पांघराया । शक्ति नाहीं रे नाहीं रे कोपट कराया । वाट फुटेना फुटेना विदेशीं भराया । अवघे बैसलों बैसलों बैसलों मराया ॥८॥बायला लेंकुरें लेंकुरें सांडुनियां जाती । भीक मागती मागती तिकडेचि मरती । रांडापोरांच्या पोरांच्या तारांबळी होती । मोलमजुरी भिकारी होउनी वांचती ॥९॥बरें होईल होईंल लागलीसे आस । बरें होईना होईना आसेची निरास । काळ आला रे आला रे जाहलें उदास । कांहीं केल्यानें केल्यानें मिळेना पोटास ॥१०॥नदी भरतां भरतां घालुनियां घेती । विख घेउनी घेउनी उदंड मरती । अग्नि लाउनी लाउनी जळोनीयां जाती । मोठी फजिती फजिती सांगावें तें कीती ॥११॥एक पळाले पळाले दुरी देशा गेले । बहु कष्टले कष्टले तेथें नागवले । फिरोनि आले रे आले रे घरींचे लोक मेले । कोठें उपाय दिसेणा कासावीस जाले ॥१२॥उदंड चाकरी चाकरी मिळेना भाकरी । लोक नीलंड नीलंड काढुनि नेती पोरी । न्याय बुडाला बुडाला जाहाली शिरजोरी । पैक्याकारणें कारणें होते मारामारी ॥१३॥कोण्ही वांचला वांचला तो सवेंचि नागवला । उदीमा गेला रे गेला रे तो मध्येंचि मारीला । कांहीं कळेना कळेना कोणाचें कोणाला । येतो एकाकीं एकाएकीं अकस्मात घाला ॥१४॥येतो पाहुणा पाहुणा लौकरी जाईना । अन्न खातो रे खातो रे थोडेंहि खाईन । उदंड वाढीलें वाढीलें तरी तो धाईना । गवें बोलतो बोलतो कोठोंचे माईना ॥१५॥लोक झीजले झीजले झडेसीच आले । द्वारीं बैसले बैसले उठेनासे जाले । इरे नाहीं रे नाहीं रे बुद्धीनें सांडिले । अन्नाकारणें कारणें उदंड धादावले ॥१६॥लोक खाती रे खाती रे तेथें चि हागती । रातीं उठती उठती भडभडां ओकिती । उदंड घेतलें घेतलें अखंडा उचक्या देती । कर्पट ढेंकरें ढेंकरें राऊत सोडीती ॥१७॥राहे वस्तीस वस्तीस चोरीतो वस्तांस । खोटा अभ्यास अभ्यास हानी महत्त्वास । परी तो सांडेना सांडेना ठकीतो लोकांस । पुढें ठके रे ठके रे ठके अवेवास ॥१८॥लोक मलेसे दीसती खेटरीं चोरिती । वस्त्रें घोतरें पातरें लपउनि पळती । कोठें धरिती मारीति महत्त्वा हारीती । काय करीति करीति वाईट संगती ॥१९॥दास म्हणे रे भगवंता किती पाहसी सत्त्व । काय वांचोनी वांचोनी ने परतें जीवित्व । किती धरावें धरावें धरावें ममत्व । जालीं शरीरें शरीरें निःसत्त्व ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP