मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| वैराग्य विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ वैराग्य श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ वैराग्य Translation - भाषांतर १३२३ ( राग-छायानट; ताल-धुमाळी )गोडी लागली रामीं । न गुंतत कामीं हो ॥ध्रु०॥कनकमंदिरें सांडुनि सुंदरें विजन सेवियेलें । त्यजुनि सुंदरी वसविली दरी चरण भावियेले ॥१॥शुक सनकादिक नारद तुंबर आर्षभादि मुनिराज । दास उदासिन होउनि विचरति सांडुनि राजसमाज ॥२॥१३२४( राग-श्रीराग; ताल-धुमाळी ) नाना फराळ जाण व्यर्थ भोजनेंवीण तैसें गोसावीपण विवेकेंवीण ॥१॥नाना निर्मळपण शोमेना स्नानेंविण । तैसें गोसावीपण वैराग्येंवीण ॥२॥दास म्हणे भूषण नसतां दूषन । तैसें गोसावीपन । भगवंतेंविण ॥३॥ १३२५( चाल-हे दयाळुवा० )देह दंडिसी मुंड मुंडिसी । भंड दाविसी नग्र उघडा ॥१॥भस्म लेपन तृण आसन । माळ भूषण सोंग रे मुढा ॥२॥अन्नत्याग रे हट्टयोग रे । फट्ट काय रे हिंडसी वनीं ॥३॥एके सांगातो रामदास तो । ज्ञानयोग तो साघितां भले ॥४॥१३२६( राग-कामोद; ताल धुमाळी; चाल-लावुनियां लो० )संसारीं शिणसी थोर । कोणासी उपकार । राहिला ईश्वर । तेणें गुणें रे ॥ध्रु०॥संसारीं शिणोनि काय । सज्जना शरण जाय । पावसी उपाय । राम सोय रे ॥१॥सांडुनि आपुलें हित । धरिले गणगोत । गेलें हें जीवित । हातोहातीं रे ॥२॥म्हणे रामीरामदास । आतां होईं उदास । घरीं रामकास । सावकाश रे ॥३॥१३२७ ( राग-बोगेश्री; ताल-घुमाळी. )मूर्खाची संगती कामा नये रे । उपायाचा होतसे अपाय रे ॥ध्रु०॥विकारी ते भिकारी बराडी रे । त्यांचे संगतीची जनीं कोण गोडी रे ॥१॥वैराग्याची वृत्ति ते उदास रे । तेथें न दिसती आशापाश रे ॥२॥वासना ओढाळ आवरावी रे । विषयबुद्धि ते सावरावी रे ॥३॥बोलणें चालणें उदासीन रे । अनुतापें सकळांसी मान्य रे ॥४॥रामदास म्हणे सांगों काय रे । मूढासी तों आवडे अन्याय रे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP