मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग ३ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ नानाविध भक्ति - भाग ३ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ३ Translation - भाषांतर १४०१( राग-कानडयाची बहार; ताल-दादरा )धरीं धीर राहें स्थिर अरे तूं मना । अरे० । क्षणभरि तरी आठवीं रघुनंदना ॥ध्रु०॥चंचळ चपळ मन हें नाटोपे कोणा । सृष्टिकर्ता ब्रह्मा तोही नाडला जाणा ॥१॥हाचि समय टळल्यां मग कैंचा श्रीराम । स्मरणीं सावध होईं माझा फिटेल भ्रम ॥२॥सांवळा सुंदर राम कोदंडधारी । परेहूनि परता रामदासा अंतरीं ॥३॥१४०२( राग-देस्कार; ताल-धुमाळी ) आरंभी नाम तुझें, देवाधिदेवा ॥ आरंभी० ॥ध्रु०॥नाम मंगलदायक । नाम त्रैलोक्यदायक ॥१॥नामें होते कार्यसिद्धि । नामें तुटे उपाधि व्याधि ॥२॥रामीरामदास म्हणे । सर्व सिद्धि होय जेणें ॥३॥१४०३( राग-वसंत; ताल-धुमाळी )नाम तुझें कल्याण माझें ॥ध्रु०॥संकट वारी भय निवारी । सारीं भयें अपहारी ॥१॥दासा म्हणे परंपार पाववी । उतरवी जीव बद्ध भवार्णवीं ॥२॥१४०४( राग-ललित; ताल-धुमाळी )पतितपावन रे नाम तुझें ॥ध्रु०॥नाना पंथ नाना मतें । भूमंडळीं असंख्यातें ॥१॥नाना भाषा देशाचार । वृद्धाचार कुळाचार ॥२॥रामदास ध्यातो मनीं । नाम सार त्रिमुवनीं ॥३॥१४०५( राअग-विमास; ताल-धुमाळी )गावें रे । नाम गावें रे ॥ध्रु०॥त्निलोकीं हें पावन आहे । जीविं धरावें भावें ॥१॥दोषदहन हें गहन पुराणीं । सुचित्त व्हावें घ्यावें ॥२॥दास म्हणे हें सार फुकाचें । नलगे यावें जावें ॥३॥१४०६( राग-प्रमाती; ताल-धुमाळी )सांधन हें बरवें । सकळ जनीं ॥ध्रु०॥नामें महादोष जाती । पुढें संतांची संगति ॥१॥नामें होय चित्तशुद्धि । नामें होय द्दढबुद्धि ॥२॥रामदास सांगे खूण । नाम सिद्धांचें साधन ॥३॥१४०७ ( राग-परज: ताल-धुमाळी० )रे राघवा नाम तुझें बरवें ॥ध्रु०॥ज्ञानें गर्व चढे । अहंभाव वाढे । स्थिति मोडे वैभवें ॥१॥कर्म आटाआटी । प्रायश्चितांच्या कोटी । संशय घेतला जीवें ॥२॥दास म्हणे आतां । नाना पंथीं जातां । काय किती पाहावें ॥३॥१४०८( राग-मैरव; ताल-धुमाळी ) हरिचें नाम सुखधाम दाखवी । नामरूप आनंदा चाखवी ॥ध्रु०॥नाम चि ऐसें तें रूप कैसें । ओळखतां मग होइल तैसें ॥१॥दासा म्हणे जगदीश वोळगा । तेणें करूनि नव्हेल दगा ॥२॥१४०९( चाल-साधुसंतां० )नामामध्यें उत्तम रामनाम । रामनामे तुटतो भवभ्रम । नासे तम सर्वदा सुखसंभ्रम । मोक्षपंथा जावया अनुक्रम ॥ध्रु०॥विष घेतां शंकरा श्रम जाला । बहुविध उपाय तेणें केला । केला परी सर्वही व्यर्थ गेला । रामनामें प्रचितीनें निवाला ॥१॥वाल्हा कोळी पातकी भूमंडळीं । अपसव्य नामानें लावी टाळी । तत्काळेंचि पातका जाली होळी । रामकथा विख्यात तिहीं ताळीं ॥२॥शुकासाठीं कुंटिणी रामवाणी । उदंडचि महिमा तो पुराणीं । रामनाम उत्तम पुण्यखाणी । अंतकाळीं चुकवी ताणाताणी ॥३॥रामदास सांगतो उदास । रात्नंदिवस धरावा निजध्यास । कोणीएकें करावा हा अभ्यास । फलद्र्प होताहे विश्वास ॥४॥१४१०( रागा-असावारी; ताल-धुमाळी )हरि नाम तुझें अमृतसंजीवनी ॥ध्रु॥सकळ मंगलनिधि सर्वाहि कार्यसिद्धि । तरणोपाय जनीं ॥१॥आगमनिगम संतसमागम । वेधले देवमुनी ॥२॥दास म्हणे करुणाघन पावन । तारक त्रिभुवनीं ॥३॥१४११ ( चाल-कैवारी हनुमान० )नाम हरीचें गोड । सखया ॥ध्रु०॥घेउनि रुचि त्या नामरसाची । भवबेडी हे तोड ॥१॥बैसुनियां गृहीं वेळ नको गमूं । भलती बडबड सोड ॥२॥रामदास म्हणे आवरुनि मन हें । सद्गुरु चरणां जोड ॥३॥१४१२( चाल-वरील ) नामचि कारण रे । महामय नामें निवारण रे ॥ध्रु०॥नाना संकटीं निर्वाणीं । युद्धकाळसमरंगणीं ॥१॥दुःख संसारींचें जना । अथवा यमाची यातना ॥२॥रामीरामदास म्हणे । गर्भवास येणें जाणें ॥३॥१४१३( राग-मुलतानी; ताल-दादरा )परतरपावना हरी । सरी न दिसे दुसरी ॥ध्रु०॥साधक बोधक योगी मुनिजन । स्मरणें तरले उदंड ॥१॥नारद तुंबर गाती पूर्वापर । फणिवर विधि हर देव ॥२॥आगम निगम भजन सुगम । भगत तरले अपार ॥३॥दास म्हणे मज स्मरणें हें निज । साधन थोर उपाय ॥४॥१४१४( चाल-कैवारी हनुमान )आठवला श्रीराम । ह्रदयीं ॥ध्रु०॥आठव नाठव शोधुनि पाहतां । मन जालें विश्राम ॥१॥फळलें भाग्य बहु जन्माचें । नामीं जडला प्रेम ॥२॥रामाविण अनुन दिसे कांहीं । दासाचा हा नेम ॥३॥१४१५( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-आवडतो प्रिय० )हरि कल्याणकारी । भवमय अपहारी ॥ध्रु०॥पतितपावन नाम जयाचें । दुःख शोक निवारी ॥१॥दास म्हणे हरिभजन करावें । सारासार विचारीं ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP