मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| षड्रिपु विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ विविधविषयपर पदे - षड्रिपु श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ षड्रिपु Translation - भाषांतर १२२१ ( चाळ-साधुसंतां मागणें० ) साधुसंगें मानसीं राम दाटे । मायासिंधु तात्काळ सर्व आटे ॥ध्रु०॥ जेथें तेथें अच्युतानंत मेटे। ब्रह्मानंदें सर्वदा पूर लोटे ॥१॥राम ध्यातां होसील राम आतां । गंगा सिंधु होय सिंधूसि मिळतां ॥२॥भृंगीमेणें कीटकी होय भृंगी । रामदास रंगें रामरंगीं ॥३॥१२२२( चाल-वरीलप्रमाणें )नाहीं नाहीं नाहीं भय नाहीं रे । निर्भय सज्जनसंग पाहीं रे ॥ध्रु०॥आहे आहे आहे गति आहे रे । सारासार विचारुनि पाहें रे ॥१॥जातें जातें जातें वय जातें रे । नेणतां अनहित बहु होतें रे ॥२॥घरा घरा सेंग घरा रे । दास म्हणे ज्ञानें हित करा रे ॥३॥१२२३ ( राग-काफी; ताल-घुमाळी ) सखियेहो आहेति उदंड वेडे । ऐसे ते सज्जन थोडे । तयाची संगति जोडे । परम भाग्यें ॥ध्रु०॥सकळांचें अंतर जाणें । मीपणें हुंबरों नेणे । ऐसियावरून । प्राणसांडण करुं ॥१॥साहती बोलणें उणें । न पुसतां सांगणें । समचि देखणें उणें । अधिक नाहीं ॥२॥अमिमान नावडे । धांतती दीनांकडे । तयांचे जे उकरडे । महाल त्यांचे ॥३॥आपपर नाहीं ज्यासी । पुसतां सांगती त्यासी । ऐकतांचि भाविकांसी । पालट होये ॥४॥रामीरामदास वास । पाहतो रात्नंदिस । ऐसियाचा सौरस । देईं राघवा ॥५॥१२२४ ( राग-भैरव; ताल-धुमाळी )शाहाणें माणुस कैंचें नजर पडे । तयासी देखतां सुखें सुखचि वाढे । नयनीं नयन मनीं मन पवाडे । धारणा धरितां होती चतुर वेडे ॥ध्रु०॥रागमानएं तानमानें पाहणीं बरीं । विवेकाचा प्रत्यय धरणें अंतरीं । संगुण ऐकतां घेणें वरच्यावरी । तयासी तुळणा जनीं कवण करी ॥१॥प्रचीति रोकडी घडे तीक्ष्ण बुद्धि । अंतर जाणतां साधु सकळांसि बोधी । जयाचे तयापरि समता वेधी । दास म्हणे ऐसियाची मेटि हो आधीं ॥२॥१२२५( राग-मारु; ताल -धुमाळी ) देव कळला न जाय । संतसंगेंवीण काय ॥ध्रु०॥स्वप्रमरानें वेगतिरानें कैसेनि होय उपाय ॥१॥वैद्य पाहतो औषध घेतो । प्रचितीवीण अपाय ॥२॥कितिक आले कितेक गेले । देव ऋषि रायेराय ॥३॥पाहेल तो तो जाणेल तो तो । दास देवगुण गाय ॥४॥१२२६( राग-कमोद; ताल-दादरा )साजणें सुजातीसी करितां संतोषी होसी । जळ हें निववी सकळांसी रे ॥ध्रु०॥अम्रृत लाघलें जरी । अमर जिवातें करी । ते ही उणी सरी । सज्जनासी रे ॥१॥जयाचें सांगणें वाड । पुरती जिवींचे कोड । अमृतापरीस गोड । संग रे ॥२॥दुःख तें सकळ जाय । आनंद पोटीं न माये । तयासि उपमा काय । द्यावी रे ॥३॥रामदास म्हणे संग । साघूचा नव्हे वोरंग । चळे ना अचळ अंतरंग रे ॥४॥१२२७ ( राग-कामोद; ताल-दादरा )शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे । तया घुंडितसे मन माझें रे ॥ध्रु०॥आहेति थोर थोर । परि नाहीं चतुर । तेथें निरंतर मन माझें रे ॥१॥मेदिक शाहणे जनीं । सगुन समाधानी । धन्य धन्य ते जनीं कुळखाणी रे ॥२॥रामीरामदासीं मन । जाहलें उदासीन । ऐसें ते सज्जन पहावया रे ॥३॥१२२८ ( राग-श्रीराग; ताल-दादरा ) निश्चळ तें निंदिताम येना । शिवी दिधलि ते लागेना । तेथें विकल्पचि जागेना रे रे रे० । लेश कल्पनेचा वागेना ॥ध्रु०॥निश्चळ तें अपरांपर । चंचळाचा थोडा विचार । तेथें विकार रे निर्विकार रे रे रे । कैसा ठाकतो पैलपार रे ॥१॥पंचमूत तें अंतवंत । त्यांत ओळखावे ते संत । संत पाहतां हे अनंत रे रे रे० ।संग सज्जनाचा संतत रे ॥२॥१२२९ ( चाल-धर्म जागो० ) जाणता वैद्य भेटे । रोगव्याधि सर्व तुटे । रोकडी सप्रचीति । लोकां आनंद वाटे ॥ध्रु०॥कर्मकांड उपासना । थोरा आधार जनां । न्ययनीतिविवंचना । मुख्य अधिकार ज्ञाना ॥१॥अनुताप उदासीन । तेणें होतसे ज्ञाना । हरिकथानिरूपण । दास म्हणे हें प्रमाण ॥२॥१२३०( राग-केदार; ताल-त्रिताल; चाल कोण मी मज० )नेणे मी मज काय करूं । मज माझा पडिला विसरू ॥ध्रु०॥असतां योग वियोग पातला । जाउनि सज्जनसंग धरूं ॥१॥दास म्हणे मज माजी भेटी । होतां मेद समस्त हरूं ॥२॥ N/A References : N/A Last Updated : May 14, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP