करूणापर पदे - भाग २

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१२५१
( चाल-रामा तूं माझा यजमान० )
कैपक्षी रघुनाथ । माझा ॥ध्रु०॥
दीनदयाळ कृपाळ कृपानिधि । मी एक दीनअनाथ ॥१॥
त्निभूवनीं जो प्रगट प्रतापी । नामचि दीनानाथ ॥२॥
दास म्हणे करुणाघन पावन । देवाघिदेव समर्थ ॥३॥

१२५२
( ताल-दादरा; चाल-दीनर्बधु रे )
हे दयाळुवा हे दयाळुवा । हे दयाळुवा स्वामि राघवा ॥ध्रु०॥
प्रथन कां मला लाविली सवे । मग उपेक्षणें योग्य हें नव्हें ॥१॥
सकळ जानता अंतरस्थिति । तरि तुम्हांप्रति काय विनती ॥२॥
दास तूमचा वाट पाहतो । बोलतां न ये कंठ दाटतो ॥३॥

१२५३
( चाल-कामदा वृत्ताची ).
दीनबंधु रे दीनबंधु रे । दीनबंधुरे राम दयासिंधु रे ॥ध्रु०॥
मिल्लटीफळें भक्तवत्सलें । सर्व सेविलीं दासप्रेमळें ॥१॥
चरणीं उद्धरी सुंदरी । शापबंधनें मुक्त जो करी ॥२॥
वेदगर्म जो शिव चिंतितो । वानरां रिसां गूज सांगतो ॥३॥
राघवीं बिजें रावणानुजें । करुनि पावला निजराज्य जें ॥४॥
पंकजाननें दैत्यभंजनें । दास पाळिले विश्वमोहनें ॥५॥

१२५४
( चाल-धांव रे रामराया० )
संसारसंगदोषें मी गुंतलों कामा । धांव रे धांव आतां दीनवत्सला रामा ॥ध्रु०॥
मानवदेधारी माझा केतुला केवा । जाणीव जाणपणें तुज चुकलों देवा ॥१॥
मीपण अमिमानें देहीं भरला ताठ । वैभव संगतीचा मज फुटला फांटा ॥२॥
विषय भोगितां रे वय वेंचलें माझें । स्वहित आठवेना ध्यान चुकलें तुझें ॥३॥
विषय़ी मानवती संपत्ति तंवरी । लक्ष्मी वोसरतां सर्व राहिली दुरीं ॥४॥
वैभवें मोकलिलों तुज शरण आलों । धांव रे आतां दास डिंगर जालों ॥५॥

१२५५
( राग-पावक; चाल-चाल रे मना० )
अंतरलों कीं रे । रामा अंतरलों कीं रे । माझें वैभव विघोनि गेलें कोणी नव्हेति अंतीं रे ॥ध्रु०॥
तारुण्य गेलें वय वृद्धाप्य आलें । मायाजाळ खंडवेना आयुष्य निघोनि गेलें ॥१॥
बहुतीं सांगितलें परि म्यां नाहीं घेतलें । ते वेळे वाईट वाटळें तें मज आतां जाणवलें ॥२॥
मदांध जाहलों तेणें तुज चुकलों । सेखी मज कोणी नाहीं जिवलगीं वोसंडिलों ॥३॥
मी मी माझें म्हणतां गेलें अर्थ जोडितां । तुजविषयीं कानकोंडा करूं मी काय आतां ॥४॥
रामदासाची वृत्ति देखूणि आले श्रीपति । मायाजाळ दुरी केलें नाहीं भवमय कल्पांतीं ॥५॥

१२५६
( राग-पावक; चाल-वरील )
रामा तूं ये रे सखया रामा तूं ये रे । तुजविण मज कोणी नाहीं येउनि मेटि तूं दे रे ॥ध्रु०॥
संसारें गांजिलों सुखदुःखें पोळलों । पराधीन जिणें माझें तुज शरण आलों ॥१॥
विभवहीन जाल्या आपंगी कोण । जिवलगें तीं पिसुणें ऐसीं जालीं कठीण ॥२॥
प्रपंचीं रंगलों तुझ्या पायीं वोरंगलों । केले मायेनें चेटक तुझा मार्ग चुकलों ॥३॥
भेटों येतां तुजला विवेक सांडोनी गेला । तयावीण मी परदेशी वहु शीण वाटला ॥४॥
वैभवा भजतों गेल्या निंदक होतो । वृत्ति वैभवीं गुंतली तुझा मार्ग: पाहतों ॥५॥
वरपंग राहिला तुजलागीं प्राण फूटला । माझें अंतर जाणावें जीव उदास जाला ॥६॥
दोष आपुले डोळां दुखुनि आला कंटाळा । रामदासा मुक्त करीं रामा परम दयाळा ॥७॥

१२५७
( राग-मारु किंवा मैरव; ताल-दादरा, चाल-पतित पावन० )
एक वेळे मेटि दे रे ॥ध्रु०॥
प्रीति खोटी खंती मोठी । वाटते रे ॥१॥
विवेक येना विसर येना । काय करावें रे ॥२॥
तुझ्या वियोगें घटिका युग । जातसे रे ॥३॥
स्वरूप वेधू परम खेदु । वाटतो रे ॥४॥
भुवनपाळा दीनदयाळा । दास हेरे ॥५॥

१२५८
( राग-मैरव; ताल-दादरा; चाल-देव पावला रे० )
शरण मी राघवा हो ॥ध्रु०॥
अंतरघ्याना गुणनिधाना । मज पहा हो ॥१॥
भजन कांहीं घडत नाहीं । हें साहा हो ॥२॥
रामदास धरुनि कांस । एक भावो ॥३॥

१२५९
( रागा व ताल-वरील० )
सकळ तूं जाणसी रे ॥ध्रु०॥
अंतर माझें विषम ओझें । नेणसी रे ॥१॥
मनीं उदास फिरत वास । पाहसी रे ॥२॥
रामदासीं राघवासी । बाणसी रे ॥३॥

१२६०
( राग व ताल-वरील )
दयाळा राघवा रे ॥ध्रु०॥
भजक तारी भय निवारीं । या भवा रे ॥१॥
विषमकाळीं शरण पाळीं । या जिवा रे ॥२॥
रामदास मनीं उदास । भेटवा रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 14, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP