मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग ५ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ करूणापर पदे - भाग ५ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ५ Translation - भाषांतर १२८१ ( चाल-धन्य हे प्रदक्षिणा० ) कां गे निष्ठुर रघुवीरे वाड वेळ न बोलसी । आतां केव्हां येइल कृपा सांग केव्हां सांभाळिसी ॥ध्रु०॥तुझे कृपेची पोसणी सुखशब्दाची सुखवासी । जेचि क्षणीं न बोलसी तेव्हांच परदेश आम्हांसी ॥१॥रामीरामदास म्हणे तुजविण विदेश वाटला । आतां झडकरिं सांभाळीं माझा प्राण हा फुटला ॥२॥१२८२( चाल-वरील ) येईं रामराया नेईं भवतम विलया । तुझे चरण ध्यातों शरण तुजचि सखया ॥ध्रु०॥हरिकथेचे मिसें तुझीं पाउलें पावावीं । पोटींची आरत रामा झडकरिं पुरवावी ॥१॥तुजवीण बैभव आम्हां काय रे करावें । तूं जरि न येसी तरि म्यां कवणा शरण जावें ॥२॥चंचळ मानस हरिकथेसी उभा मी राहें । निढळावरि बाहे रामदास वाट पाहे ॥३॥१२८३ ( चाल-धर्म जागो० )राजीवनयना रामा योगीजनमन विश्रामा । साधुजनपूर्णकामा चाल दयाळा रामा ॥ध्रु०॥धीर उदार सुंदर सगुणा गुणगंभीरा । चाल रे करुणाकरा वाट पाह्तों दातारा ॥१॥देव सोडविले त्निदश मजलागीं कां उदास । नको कठिण मानस वाट पाहे रामदास ॥१॥१२८४( राग खमाज; ताल-धुमाळी; चाल-रे मानवा उगीच० )रामा निदान पाहसी किती रे । धांव धांव गा सीतापती । तुजवेगळी न घडे गती । नाम तारक वेद बोलती रे ॥ध्रु०॥जळीं पाषाण तारिले वाड । काय त्याहुनी तुज मी जड । माझे जीविंचे पुरवीं कोड । मनें घेतला विषयीं मोड रे ॥१॥तुझे भेटीचें आरत मोठें । तुजवेगळें न गमे कोठें । तुजवांचुनि सर्वहि खोटें । तुझें बालक दीन धाकुटें ॥२॥वृत्ति गुंतली तुजपाशीं । जैशी गुळासि जडली माशी । देहीं असोनि गुप्त कां होसी । दास उदास देहभावासी रे ॥३॥१२८५( चाल-नामामध्यें उ० )संसारसासुरां तूं टाकोनि गेलासी । मायबापा कां निष्ठुर जालासी । देवराया मागुता कैं येसी । आजि अवस्था लागली रे मानसीं ॥ध्रु०॥पराधीन न चले कांहीं केलें । देहपांगें मज बहु रे गांजिलें । निजधाम शांतीचें क्रोधें नेलें । मायबापा त्वांही कां अव्हेरिलें ॥१॥सर्व दुर्जन लागला यांचा संग । क्षणक्षणां होतसे मनोभंग । घडी एक रंग घडी विकल्पें वोरंग । पुरे संग आतां करावें निःसंग ॥२॥दास म्हणे रे राघवा निजभावें । संग दुर्जनांचा सांभाळित जावें । किती म्हणोनियां धारिष्ट धरावें । मायबापा सर्वथा नुपेक्षावें ॥३॥१२८६( राग-गौड, ताल-दादर )अहो जी मुनिमानसधामा । परम सुखदायका रे । तुजवीण सीण वाटतो रे । जानकीनायका रे ॥ध्रु०॥मायामोहपुरीं वाहवलों दुरीं । तूं धांव धांव देवराया । कामक्रोधमदमत्सरामगरें । विभांडिली सर्व काया ॥१॥नको लावूं वेळु तूं दीनदयाळू । तुझी मन वास पाहे । येथून सोडवी ऐसा । मज तुजविण कोण आहे ॥२॥नको धरूं दुरी नाहीं देहा उरी । किती सत्व पाह्सी रे । रामदास म्हणे झडकरी धांवणें । राहें मज मानसीं रे ॥३॥१२८७( राग-कल्याण; ताल-धुमाळी ) ये रे यादवा ये रे माधवा । ह्रदयनिवासा देवा रे ॥ध्रु०॥काम विराम अंतरीं राम । सर्वकाळ आठवावा ॥१॥उमा राह्तो वाट पाहतो । दास पराकृत गातो ॥२॥१२८८( राग-मैरव; ताल-धुमाळी )तरि त्वां अंतर जाणोनि यावें झडकरी । तुझ्या वियोगें न कंठे क्षणभरी रे रामा । तुजवांचुन अंतीं कोण आहे । ऐसी अवस्था लागली अभ्यंतरीं रे रामा ॥ध्रु०॥संसारसासुरां तुवां बोळवीलें येथें बहुत दिवस कां टाकिलें रे रामा । रात्रिं दिवस तुझी वाट पाहे मज अत्यंत या संसारें गांजिलें रे रामा ॥१॥या लौकिकापासुनी मज सोडवावें । जरी तूं न येसी तरि म्यां काय करावे रे रामा ॥नाहीं कोणीच मज जिवलग येथें कोणाचे आधारें म्यां कंठावें रे रामा ॥२॥सुलभ सांडुनी धांव घेतली रे । या लौकिकाची लाजा सांडिली रे रामा । आलों टाकुनी सर्व अमिमाना तुझ्या पायीं माझी वृत्ति गुंतली रे रामा ॥३॥एकला एकट जालों रानभरी तुजकारणें उदास सर्वांपरी रे रामा । चित्त चंचळ जालें राहवेना भांबावलों हिंडतां वनांतरीं रे रामा ॥४॥पिसाट रामदास तेणें आस केली ते तों आपणचि होउनी पुरवीली रे रामा । दुःख संसारींचें फार जालें तैसी आम्हां संकटीं धांव घालीं रे रामा ॥५॥१२८९ ( राग-खमाज; ताल-दादरा; चाल-धन्य हरीजन० )राम माझें जीवींचें जीवन । राम माझें मनींचे मोहन । येक वेळ भेटवा वो । तनमनधन सर्वही अर्पीन राघव दाखवा हो ॥ध्रु०॥घाळूनि आसन लावूनि नयन चित्तासी चिंतवेना । मीपणें मी मज पाहतां निज परम गुज तर्कवेना ॥१॥जवळी आहे संग न साहे । कोणा न चोजवेतो । रामदास म्हणे आत्मनिवेदनें राघवा पाविजेतो ॥२॥१२९०( चाल-धर्म जागो० )श्रीहरि नारायणा । तुज कां नये करुणा । वेळोवेळां जन्मवीसि । आतां सांगावें कोणा ॥ध्रु०॥कैसा तरि तुझा अंश । तरि कां करिसी उदास । करुणाघन कैसा । किती आतां पहावा वास ॥१॥बहुतांमुखें ऐकलासी । भक्तवत्सल होसी । तरि कां उदासीन होसी । किती सत्व पाह्सी ॥२॥पावला दीनानाथ । भक्तां केलें सनाथ । त्नैलोक्य वर्तवितो । धन्य होय सम्रर्थ ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP