विविधविषयपर पदे - ब्राह्मण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११८३
( चाल-साधुसंतां० )
ब्राह्मणाचा महिमा वर्णूं काय । नारायणे वंदिले ज्याचे पाय ॥१॥
मूखी अखंड वेदउच्चार । चरणी राहती निरंतर ॥२॥
आशीर्वादे स्वानंदसुख देती । शापे करुनी त्रैलोक्य कांपवीती ॥३॥
सकाळांसी पुज्य हे ब्राह्मण । रामदास वंदितो त्यांचे चरण ॥४॥

११८४.
( राग-मारु, ताल-धुमाळी, चाल-हित गेले रे० )
सोवळे कोणते रे । ब्राह्मणा ओवळे कोणते रे ॥ध्रु०॥
विटाळे उपजला विटाळे वाढला । विटाळेंचि मेला सावकाश ॥१॥
हाडामासाच्या सगट मोळ्या । पाणिये सोंवळ्या होती कैशा ॥२॥
देवाकडे मन लागतां उन्मन । सोंवळा ब्राह्मण तोचि एक ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP