मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| श्रीसमर्थास प्रार्थना श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - श्रीसमर्थास प्रार्थना प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ श्रीसमर्थास प्रार्थना Translation - भाषांतर (वृत्त-भुजंग प्रयात)तुम्हा प्रार्थना नित्य स्वामीसमर्था ।दयाळा रमो त्वत्पदीं चित्त नाथा ॥सदा साधुची संगती दे अनंता ।न बाधो मनालागि संसार चिंता ॥१॥(वृत्त-पृथ्वी)१असोनि नरदेह हा प्रभु न मी तुला पूजिले ।जगीं मिळविता धना तुजसी नित्य दुर्लक्षिले ।अनाथ, अति दुर्बला कधि न साह्य मी ते दिले ।असोनि अपराधि मी तव पदांसि आलिंगिले ॥१॥२दयामृतघना प्रभो मजवरी करावी दया ।असेचि मतिमंद मी हरिल कोण माझे भया ॥निरंतर असावया स्मरण रे तुझे पामरा ।सुबुद्धि मज देइगा प्रभुबरा करोनि त्वरा ॥२॥३तुझे चरण सेविता मज न विघ्न बाधो कदा ।तुझे स्मरण सर्वथा मज गमो खरी संपदा ॥तुझे स्वरुप दर्शनीं मन रमो प्रभो सर्वदा । तुझा वरद हस्त तो मम शिरी असोदे सदा ॥३॥॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥ॐ तत्सत् N/A References : N/A Last Updated : April 15, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP