कथामृत - अध्याय अठरावा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । प्रल्हादाय नमोस्तुते ॥१॥
गताध्यायीं वाचिले आपण । समोर येता आर्त यवन । समाधिसुख तया देउन । चकित केले योगेश्वरे ॥२॥
श्रीपादभट्ट शास्त्रीसी । जावया सांगती काशीसी । शिरसावंद्य त्या आज्ञेसी । मानुनी केले गमन तये ॥३॥
तिकडे जाताचि द्विजवर्य । लेखिती तुच्छ सर्व । विद्यामदे पंडितां गर्व-। अनिवार जाहला होता की ॥४॥
अंतरीं श्रीपाद उदासले । वाटे येणे व्यर्थ केले । तेथले पंडित भुजंग गमल । गर्वोक्तिविषे भयंकर ॥५॥
नको वाटले राहणे तयां वाटले जावे परतोनिया । मिळणार काय ते शिकावया । वैतागले ते अत्यंत ॥६॥
जाणुनी तयांची अंतःस्थिती । काशींत यती प्रकट होती । भक्तरक्षणा उडि घालिती । भक्ताभिमानी योगेश्वर ॥७॥
पंडितांचा ज्ञान-गर्व । भक्ताकरवी हरविला सर्व । शास्त्रीबुवांसी शरण सर्व-। जाउनी म्हणती क्षमा असो ॥८॥
कार्य होता पावले गुप्त । वैराग्यपूर्ण ते अनासक्त । भक्ताकाजा प्रकटले फक्त । समर्थ ऐसे कनवाळू ॥९॥
समर्थासी वंदुनी आता । सिद्ध होऊ वाचण्याकरितां । वाचता, ऐकता हरती व्यथा । कथा अत्यंत मनोहर ॥१०॥
राज्य असता इंग्रजांचे । एक सरकारी बडे साचे-। अधिकारी ते प्रज्ञापुरीचे । नांव तयांचे बंबगार्डन ॥११॥
प्रशस्त ऐशा बंगल्यांत । गावाबाहेर । अति सुखात । नोकर-चाकर बहुत असत । कुटुंबवत्सल होते ते ॥१२॥
वृत्तिने होते अति उदार । गरिबां करिती साह्य थोर । वाणी तयांची गोड फार । लोकप्रिय ते प्रज्ञापुरीं ॥१३॥
निज उद्यानीं सहज फिरता । विखार पायांस ते डसता । दंशभार्गी स्वये चिरता । रक्त भळभळा वाहतसे ॥१४॥
जखम जाहली ती विषारी । दुःख भोगिले तये भारी । वदले तयासी कोणीतरी । श्रीस्वामींसी शरण रिघा ॥१५॥
पाण्यापरी खर्चिला पैसा । गुण येईना हवा तैसा । दुर्दैवाचा पडे फासा । म्हणे सुटावे कैसे तरी ॥१६॥
येवोनि अत्यंत काकूळती-। विनंती करी एकास ती । तुमच्या स्वामींस सांगा स्थिती । नष्ट करा ही महाव्यथा ॥१७॥
स्वामींस सांगावया जाता । समर्थ त्यासी वदती स्वता । सायबा सांगा सोड चिंता । सांगतो तो उपाय करी ॥१८॥
कडुनिंबाचे घेउनी खोड । उगाळोनी लेप जाड-। लाविताची दिसेल गोड । परिणाम त्याचा सत्वरी की ॥१९॥
त्वरित कारिता हा उपाय । आश्चर्य घडले पहा काय । दोन दिवशीं तो अपाय-। नष्ट जाहला सर्वस्वी ॥२०॥
हर्ष अत्यंत तया झाला । म्हणे दर्शना जाणे मला । वंदितो त्यां महात्म्याला । दुःख जेणे निवारिले ॥२१॥
गाडी-घोडा नको काही । चालत येतो तिथे पायीं । दर्शन होता पडॆ पायी । सर्व सांडुनी अभिमान ॥२२॥
गुलाबांचा हार घाली । फळे-मिठाई ती अर्पिली । संकटीं जाहला तुम्ही वाली । ऋणी आपुला नित्य असे ॥२३॥
बंबसाहेब जाहला दास । स्वामींवरी दृढ विश्वास । स्वामिदर्शनां त्यां उल्हास । सदासर्वदा वाट तसे ॥२४॥
समर्थाचे सामर्थ्य थोर । कथा असती त्या अपार । त्यांतील एक ऐकता फार-। वाटेल आनंद चित्तासी ॥२५॥
अक्क्लकोटीं मुका पोर । भिक्षा मागुनी भरी उदर । यतिदर्शनी ओढ फार-। होती अत्यंत त्याजला ॥२६॥
सांज सकाळीं मध्यान्हकाळीं । येइ दर्शना वेळीं-अवेळीं । येता सहर्ष वाजवी टाळी । नाचे समोर स्वामीच्या ॥२७॥
नांव मन्याबा असे त्याचे । खुणा करोनी कथी साचे । प्रेम त्यावरी समर्थाचे । वाटे सर्वासि आश्चर्य ॥२८॥
नभीं देखता मेघ थोर । नाचे जैसा वनीं मोर । स्वामीसं बघता मुका पोर । थयथया लागे नाचाया ॥२९॥
स्वामींस वाटे अति कौतुक । बघती त्याकडे सहेतुक । बोल बोलरे शब्द एक । स्वामी तयासी खूणाविती ॥३०॥
खूणा करोनी श्रींस सांगे । देव मजला वाचा न दे । दया मजवरी करावी गे । साश्रु नयने नमिले पदां ॥३१॥
ह्रदयीं द्रवले दयाघन। कानें सांगती शब्द दोन । श्रीगुरुदेव दत्त म्हणुन । सांगती त्या भजन करी ॥३२॥
लोक हासले पहा जेव्हा । महदाश्चर्य घडे तेव्हा । मुक्या मुखीं प्रकटले तेव्हा । शब्द गुरुदेव दत्त हे ॥३३॥
माधवाची कृपा होता । मुक्यासि येई वाचाळता । योगेश्वरांची अशी सत्ता । प्रख्यात आहे सुभाषित ॥३४॥
ऐसे सामर्थ्य स्वामींचे । प्रत्यया आले जनां साचे । वर्णू जाता गुण तयांचे । शतमुखांचा शेष शिणे ॥३५॥
वाचू आता अद्‌भुत कथा । महाशास्त्री काशींत होता । बहिरेशास्त्री ’ वदे जनता । होते अत्यंत विद्वान ॥३६॥
न्याय-नीती अनुसरोन । नित्य जीवनीं धर्माचरण । लोक त्यासी आदरे करुन-। नमस्कारिती सप्रेमे ॥३७॥
वाराणशीचे मान्यवंत । प्रसिद्ध होते ते धनवंत । सर्व होते यथास्थित । परंतु नव्हते संतान त्या ॥३८॥
नागबलीदी सर्व करुन । अखेर जाहले त्या संतान । पुत्र जाहला प्राप्त म्हणुन । पेढे वाटिले सर्वासी ॥३९॥
सुलक्षणा हा पुत्र दिसत । पत्रिका याची करा त्वरित । भविष्य पाहू की समस्त । प्रेमानंदे भार्या वदे ॥४०॥
ज्योतिषशास्त्रांत निष्णात । पंडित वसे वाराणशींत । अति उत्साहे त्याम दावित । जातक याचे वर्तवावे ॥४१॥
ज्योतिषी लक्षिता ती पत्रिका । जाहला तयाचा चेहरा फिका । म्हणे आताम विचारु नका । पुढे पाहू केव्हातरी ॥४२॥
निर्विद्य अथवा विपन्नता । होणार जे ते सांगा आता । वृथा लाविता मना चिंता । सांगाचे मातें असेल ते ॥४३॥
तयाचा होताचि निरुपाय-। सांगण्या विना ना उपाय । म्हणे अर्भका असे भय । होणार अत्यंत अल्पायुषी ॥४४॥
हायरे दैवा ऐसे कसे । बालके मातें दिधले असे । आता पुढे मी करु कैसे । उपाय सांगा काहीतई ॥४५॥
गंगाकिनारी घाटावरी-। असे साधू त्या विचारी । कृपा केलिया तुम्हांवरी । उपाय काही सांगेल ॥४६॥
निराशेमधीं दिसे आशा । दया करी गा हे जगदीशा । मिळो मजला मार्ग ऐसा-। जेणे चिंता नाश पावे ॥४७॥
साधूस भेटता दंडवत । कर जोडूनी नम्र होत । म्हणे ऐकणे मनोगत-। माझे आपण महामुनी ॥४८॥
दुःख आपुले वदा काय । असल्या सांगतो मी उपाय । घ्यावी न आपण मनीं हाय । मुक्तपणे ते सांगावे ॥४९॥
पंडिता येतसे गहिंवरुन । दैवे लाभला पुत्र छान । अल्पायु तो असे म्हणून । ज्योतिषमार्तड सांगती ॥५०॥
ऐकता गेले धैर्य खचुन । एकले म्हणे हे संतान । संकटी ऐशा रक्षील कोण । सांगा मातें महामुने ॥५१॥
श्रवण करिता मुनी वदले । कलियुगीं या समर्थ असेल-। साधु-संत ते दुर्मीळ झाले-। आठवे महात्मा एक परी ॥५२॥
अक्कलकोटीं त्वरित जावे । समर्थचरणीं सर्व भावे । शरण जावोनि विनवावे । ह्रदरोग आपुला हरावया ॥५३॥
ते तो प्रत्यक्ष जगदीश्वर । सत्ता त्रिलोकीं असे थोर । त्यांचे समान अवनीवर । ज्ञात दुजे ना मज कोणी ॥५४॥
क्षुधार्ता मिळता गोड अन्न । तृषार्ता मिळता शीत जीवन । मृतासि मिळता संजीवन । वार्ता तैसी ही पंडिता ॥५५॥
हर्षातिरेके वंदोनिया । म्हणे दवडणे वेळ वाया । स्त्री-पुत्रासह निघे जाया । स्वामिदर्शना प्रज्ञापुरीं ॥५६॥
नारायणराव हर्डीकर । प्रज्ञापुरीं जयांचे घर । पुत्र-पत्नीसह द्विजवर । गृहीं तयांचे उतरले हे ॥५७॥
नित्य नेमे दर्शना जाती । गोष्ट काढण्या परि न धजती । जप-तप पारायणे करिती । गुरुचरित्र नी हरिनाम ॥५८॥
दिवस तयांचे असे जात । चिंता परी ना व्यक्त करित । हर्डीकर त्यां धीर देत । योग्य समयीं पुसू तया ॥५९॥
करुण घटना एक घडली । गुरुवारच्या प्रभात काळीं । गोड बालका मूर्च्छा आली । पडे धरणीस निःश्चेष्ट ॥६०॥
माते फोडिला हंबरडा । शास्त्री जाहला पिसा-वेडा । काळें उघडिला जणू जबडा । वाटे बालका गिळायासी ॥६१॥
बाळ ठेविला स्वामींपुढे । म्हणती तीळ द्या मला थोडे । तीळ-शर्करा तोंडी पडे-। स्वामिहस्ते बालकाच्या ॥६२॥
अरे बालका ऊठ ऊठ । सकाळ झाली पहा नीट । खेळावयाचा रे परिपाठ । विसरलासि का तूं आजीं ॥६३॥
हांक ऐकता यतिवराची । झोप उडाली जणू त्याची । आई, आई म्हणोनि साची । हांक मारिता भयग्रस्त ॥६४॥
काळा काळा बुवा एक । ओढिता घाली मला धाक । रडला तरी मारीन खूप । म्हणोनि मारी मज धपाटा ॥६५॥
हेचि बोवा आले तिथे । मला धरोनी एक होते । काळ्या बुवा मारिता लाथे । मला सोडोनि तो पळे ॥६६॥
मातेस बाळे घातली मिठी । बोलती तेधवा जगत्पती । काळाचिये हाणुनी पाठी । बाळासि तुमच्या सोडविले ॥६७॥
पुत्रासवे या निश्चिंत । असावे तुम्ही जीवनांत । ऐसे वदताच भगवंत । हर्षास त्यांच्या पार नुरे ॥६८॥
मिठी घालोनी श्रीचरणा । स्फुंदता वदती जगजीवना । अघटित करणी करुणा घना । धन्य, धन्य हो विश्वेश्वरा ॥६९॥
जन्मोजन्म आसरा द्यावा । आमुचे मागणे हेचि देवा । ठेवितो चरनी शुद्ध भावा । विकल्प बाधो न कल्पांती ॥७०॥
मृतपुत्रा उठविता यती । अवघे जाहले कुंठित मती । पांडवकाळीं रुक्मिणी पती । जेवि उठविती परिक्षिता ॥७१॥
आनंद जाहला सर्वत्र । गुणगान चाले मनीं मात्र । परतोनि जाता स्थलाप्रत । म्हणती यतिवर्य परमेश्वर ॥७२॥
साधुनिंदा ही अनिष्ट-। केलिया येई की अरिष्ट । पुढिल कथा वाचणे इष्ट । स्पष्ट आपुल्या हितास्तव ॥७३॥
मोगलाईत बीड गाव । तिथे नांदे श्रीमंतराव-। गुजराथी तो विप्रराव । नाम नारायण त्याचे ॥७४॥
एके दिनीं यात्रिक एक । कर्मठ परी अतिभाविक । हिंडता लागली तया भूक । नारायणाचे ये गृहीं ॥७५॥
नारायणाते नमस्कारुन । घालून बैसला स्थिरासन । कोण कोठचे हो आपण । प्रश्न नारायणे केला ॥७६॥
तीर्थाटना जात असतो । देव-देवतार्चना करितो । पोथ्या, पुराणे यांत रमतो । सदा सेवितो संतांसी ॥७७॥
देवतांची जागृत स्थाने-। पाहुनी पूजितो प्रसन्न मने । असार संसारांत रमणे । हे न वाटे उचित मला ॥७८॥
करावा सदा संतसंग । नित्य गावे ते अभंग । सिद्ध महात्मे भेटता रंग-। येत असे निज जीवना ॥७९॥
काल पाहिले सिद्ध पुरुष । साम्यर्थ्य त्यांचे अलौकिक । गमन त्रिलोकी हे विशेष । अवश्य जाणे दर्शनासी ॥८०॥
उपहास करोनी नारायण । वृथा वर्णिता सिद्ध म्हणुन । पोटार्थी हे पुरुष असुन । नागविती की लोकांसी । ॥८१॥
ध्यान ठेवोनि द्रव्यावरी । वर्तती हे दुराचारी । दर्शना येती जधी नारी । गोड भाषणे भुलवीती ॥८२॥
संत-साधु हे थोतांड । अलिकडे माजले फार बंड । दिला पाहिजे उग्र दंड-। यांसी समस्त लोकांनी ॥८३॥
संत कसले होते जंत । सावध असणे तुम्ही पंत । फसल्यावरी कराल खंत । यास्तव सारे सांगतसे । ॥८४॥
पंढरपुरीं नी प्रज्ञापुरीं । लबाड लुच्ची मंडळी भारी । यांच्या रुपे अवतार धरी- म्हणे ईश्वर या लोकीं ॥८५॥
यात्रिक वदे थांबवा निंदा । नका पडू हो अशा फंदा । प्रार्थितो मी तुम्हा बंदा-। संत साधुचा सुनिश्चये ॥८६॥
तुम्ही यात्रिक भ्याड दिसता । खो, खो हांसे असे वदता । बोंब ठोकुनी अशा संतां । खुशाल सांगा उच्चस्वरे ॥८७॥
दुःख वाटले यात्रिकासी । पाणी न पिणे या स्थलासी । त्यजोनि गेला त्या गृहासी । नमस्कार ना केला तये ॥८८॥
नसे भोजन ना जलपान । यात्रिक गेलाही निघोन । उं: म्हणोनी नारायण । निघोनि गेला अंतर्गृहीं ॥८९॥
तदनंतरी काळ जाता । प्रसंग उद्‌भवे पहा आता । स्त्रीचे तयाच्या दिव भरता-। प्रसूति वेदना होती ना ॥९०॥
आज उद्या असे करिता । दिवस वरी फार जाता । उदरीं वेदना असह्य होता । व्योकूळली ती अत्यंत ॥९१॥
असह्य कळा बघवती ना । घाम फुटला नारायणा । म्हणे धावरे दयाघना । सोडवि आतां लवलाही ॥९२॥
उपाय करिती लोक नाना । परंतु कोणा यश येइना । सोसवती ना तिज यातना । प्राण जातसे की वाटे ॥९३॥
नारायणाचा धीर सुटला । अखंड करी प्रार्थनेला । प्रमाद असला जरी घडला । क्षमा याचितो भगवंता ॥९४॥
गाभण्या गायीस ताडियले । क्षुधित विप्रासि घालाविले । मुक्या मुलासी चटके दिले . केला पातके काय तरी ॥९५॥
अल्पही ना मना शांती । तळमळ लागे जिवासी ती । तोंच आठवे तया चित्तीं । व्यर्थ निंदिले यतीश्वरा ॥९६॥
देवाधिदेवा योगेश्वरा । प्रज्ञापुरीच्या सिद्धेश्वरा । साष्टांग वंदितो सर्वेश्वरा । अपराधांची क्षमा असो ॥९७॥
करणार नाही कदा निंदा । संतमहंतांची गोविंदा ।  कर जोडूनी चरणारविंदा । शरण येउनीं प्रार्थितसे ॥९८॥
अपराध माझे घाल पोटीं । ठेवू नकोरे मज हिंपुटी । पश्चात्तापे असे कष्टी । शरणागतासी अभय असो ॥९९॥
पुत्र मातें जाहला जरी । आणीन तयातें प्रज्ञापुरीं । घालीन आपुल्या चरणांवरी । दक्षिणा पेढे अर्पीन ॥१००॥
नवस बोलला नारायण । समर्थाचे करोनि स्मरण । जाता पुढे दिवस दोन । आनंदायी घटना घडे ॥१०१॥
गुरुवारच्या उषःकालीं । पत्नीं तयाची प्रसूत झाली । पुत्ररत्ना ती प्रसवली । वार्ता पसरली सर्वत्र ॥१०२॥
नारायणासी तदा वाटे । स्वर्ग उरला दोन बोटे । आकाश पदतलीं तया वाटे । हर्षसागर उचंबळला ॥१०३॥
पतिपत्नीने बेत रचिला । पुत्रोत्सवाचा थाट केला । भाग्यरवी हा की उदेला । वदे सर्वास आनंदे ॥१०४॥
केले तये मिष्टान्नासी । मित्रमंडळी भोजनासी । आग्रहे वाढी अन्न त्यांसी । थाटात करी समारंभ ॥१०५॥
अत्यानंदी दिवस जात । धंद्यास उत्तम ये बरकत । नवसाचे त्या भान नुरत । जाहला ऐसा कृतघ्न तो ॥१०६॥
दोन वर्ष जाहली जरी । नवस फेडणे न घडे तरी । वारंवार तयाचे घरीं । उग्र पीडा होय सुरु ॥१०७॥
धंद्यांत येई नित्य खोट । आरोग्य त्याचे नसे नीट । सर्वासवे सदा कटकट । पुत्रही पडे आजारी ॥१०८॥
पत्नी वदे तदा त्यांसी । फेडणे असे की नवसासी । स्वामींकडे प्रज्ञापुरीसी । येऊ जाउनि सत्वर ॥१०९॥
पुढे जाहला तोइ भ्रमिष्ट । वागे बोले अति अनिष्ट । लोक बोलती हे न इष्ट । सत्वरी फेडणे नवसासी ॥११०॥
मित्रमंडळी कुटुंबासी । घेवोनि जाती यतींपाशी । तत्‌क्षणी ब्रीद राखा निरंतर ॥११८॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥११९॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP