मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| अध्याय नववा श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - अध्याय नववा प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ अध्याय नववा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । महाकाली नमोस्तुते ॥१॥श्रीशनैश्चराय नमः । श्रीहनुमंताय नमः । वरद गुरुदेवाय नमः । चरित्रगायनी यश लाभो ॥२॥चरितामृताची दिव्यसरिता । अखंड वाहो न आटता । तिये माजीं कीं डुंबता । पावन होती भक्तजन ॥३॥“ श्रीस्वामीसमर्थ " ऐशा । मंत्राचा या ध्यास घेता । तृप्त होती जीवनाआशा । संदेह अंतरीं नसावा तो ॥४॥संदेह करितो यत्न नाश । यास्तव तयाचा करा नाश । देवदर्शनाचा हव्यास । असावा सदा वर्धिष्णू ॥५॥सकल संत सांगती ऐसे । असत्य त्या म्हणावे कैसे । मायबाप ते आपणां जैसे । कळवळ्याने कथिती सदा ॥६॥गत अध्यायीं दिव्य घडले । चमत्कार जे त्यां वर्णिले । श्रींचे सामर्थ्य दिसो आले । भक्तजनांसी त्यायोगे ॥७॥बळे न करिती चमत्कार । भुलविण्यासी नारी-नर । ईश्वसेवेसि जन पामर-। लावावया घडती ते ॥८॥संत, सिद्ध ना जादुगार । फसविण्या जनां हा व्यवहार । कदा न करिती अवनीवर । सत्य सत्य त्रिवाचा ॥९॥तयांचे सदा चिता । तरेल कैसी पाखंड जनता । संसार करिता परमार्थ चिंता-। कैसी तयांसी लागेल ॥१०॥माझे करित मरती । परमार्थ मार्गा दुर्लक्षिती । तेणे व्यर्थ करी पडती । यमदूतांच्या भयंकर ॥११॥जनां जाळी संसारचिंता । हे न पाहवे थोर संता । नामामृताची महत्तता । कथन करिती सर्व जनां ॥१२॥परम कोमल अंतःकरण । स्वामी प्रत्यक्ष करुणाघन । गताघ्यायीं धडे दर्शन । कथा वाचुनी स्वामींच्या ॥१३॥इक्षुरसासम अती मधुर । ऐशा कथा ऐकण्या अधिर । जाहला आहांत नारी-नर । जाणुनी कथितो श्रवण करा ॥१४॥कुकर्म करुनी जनां छळिती । स्वार्थाध उन्मत्त राक्षस अती । तयां दंडण्या अवतार घेती । गीतेंत बोलिले भगवंत ॥१५॥तयाचा प्रत्यय पहा आता । वाचिता यतींच्या दिव्य कथा । मग म्हणाल हे भगवंता । सत्य सत्य रे बोल तुझे ॥१६॥अनेक ठायीं संत-महंत । साधण्या आपुले अध्यात्म हित । उग्र साधनीं मग्न असत । पृथ्विवरी या सर्वत्र ॥१७॥अंबेजागाई तीर्थक्षेत्र । स्थान असे ते महाराष्ट्रांत । दर्शन घेतां हो पवित्र । ऐसे मानिती सकल जन ॥१८॥विख्यात साधू दासोपंत । मुकुंदराजादी थोर संत-। नांदले तिथे यात्रा भरत । जगदंबेसी पूजावया ॥१९॥ऐशा स्थलीं यतिवर्य येती । मूर्ती तेजस्वी जन पाहती । लोटांगणे घालुनी नमिती । वदती आम्हां उद्धरावे ॥२०॥समर्थ सर्वा उपदेशिती । प्रत्यक्ष इथे जगदंबा । मूर्ती । आराध्य दैवत मानुनी ती । अखंड सेवा करणे तिची ॥२१॥करिल कामना सर्व सफल । शंका न धरा मनीं फोल । जगन्माता अति दयाळ । कल्याण करी ती भक्तांचे ॥२२॥सुधेहुनीही अति मधुर । वचनामृत ते कल्याणकर । श्रवणीं पडतां खरोखर । भक्त भाविक गहिवरले ॥२३॥जनीं विश्वास दृढावला । अंबिका तारक असे सकलां । सुनिश्चये करु सेवेला । सार्थक व्हाया नरतनुचे ॥२४॥टाळ, झांजा नी मृदंग । यांही भजनीं लोक दंग । उच्चस्वरे गाति अभंग । नानाविध ते संतांचे ॥२५॥अभय सर्वासि देवोनिया । यतिवर्य निघती दुजे ठाया । भक्तजन ते पडती पायां । दया करावी आम्हांवरी ॥२६॥तेधवाम स्वामी सर्वास वदती । शंकित नसो आपुली मती । ह्रदयीं भजा जगदंबा मूर्ती । नित्य नेमे अहर्निश ॥२७॥विश्वतारक आदिमाया ॥ निजभक्तांवरी करी दया । दूर सारुनी मोहमाया । एकाग्र चित्ती स्मरने तिज ॥२८॥सुखें सर्वानीं वर्तावे । विसरोनिया हेवेदावे । कीर्तनीं, भजनीं एकत्र यावे । जयघोष करा अंबेचा ॥२९॥भक्तिसागर उचंबळला । जगदंबेचा गजर केला । आसमंत तो दुमदुमला । स्वामी जाहले प्रसन्न अती ॥३०॥आम्ही जातसो रामेश्वरा । जावे आपण सुखें घरा । सद्धर्माचा आश्रय करा । तेणे ईश्वर जोडाल ॥३१॥यतिवर्य निघती जावयाला । लोकीं तदा जयघोष झाला । स्वामी पुनरपी या स्थळाला । सत्वर यावे परतोनी ॥३२॥स्वामि जातां ह्रदय फुटले । दुःख अनावर जनां झाले । व्यथित मनानें जन परतले । जाते जाहले स्वगृहासी ॥३३॥वायुगेगे चालुनी स्वामी । रामेश्वर या पवित्र ग्रामीं । श्रीरामचंद्रे स्वहस्ते । नामी । स्थापिली असे शिवपिंडी ॥३४॥वेदज्ञ विप्र तेथला एक । सशास्त्र पूजा करि भाविक । वृद्धास त्या पुत्र एक । पुराण सांगे भक्तजनां ॥३५॥पुजारी नेमणे विप्र, नियम । वर्षानुवर्षे ऐसा क्रम । सुखे घेउनी भगवन्नाम । विप्र पुजारी नांदती ते ॥३६॥कालांतरे हो काय झाले । वृद्ध पुजारी मृत जाहले । पुत्र पुराण सांगती भले । मंदिरी करिती धर्मविधी ॥३७॥दुर्जन जंगम दुष्ट लोक । ग्राम सोडा, घालिती धाक । नातरी लुटोनि मागण्या भीक-। लावू तुम्हां घरोघरीं ॥३८॥दंगा करोनि देवळीं घुसले । विप्र पुजार्यांसी बडविले । उद्दंडपणे म्हणु लागले । आम्ही येथेले पुजारी हो ॥३९॥वितुष्ट जाहले ते उत्पन्न । ब्राह्मणा न मिळे दक्षिणा, अन्न । वातावरण होय ते भिन्न । भांडणे माजली अनिवार ॥४०॥विप्र चिंताग्रस्त झाले । काय होणार तरी पुढले । न्यायमंदिरीं पाहिजे गेले । हाचि उरला उपाय कीं ॥४१॥रात्रंदिन लागली चिंता । धावा पावा श्री अनंता । आजपर्यंत धसका नव्हता । सुखे नांदलो येथेची ॥४२॥ जंगम लोक जाहले क्रूर । विप्र घालवूं येथोनि दूर । डरकाळिती ते वारंवार । बघा आमुचा हिसका कीं ॥४३॥कधी-मधी मारामारी । जंगम लागले छळू भारी । विप्रांसि धरिले धारेवरी । त्रस्त जाहले जन सज्जन ॥४४॥न्यायमंदिरीं गेल्याविण । प्रश्न सुटणे महा कठिण । लेख, पुरावे हवे म्हणून । जुनी दप्तरे धुंडाळिती ॥४५॥सर्व तयारी जाहल्यावरी । फिर्याद नेली न्यायमंदिरीं । परंपरागत द्विज पुजारी-। नेमिला असतां छ्ळिती कां ॥४६॥जंगमे लबाडी सर्व केली । तक्रार न्यायलयी नेली । न्यायाधीशे तपासिली । कागदपत्रे पुराणी ती ॥४७॥षण्मास गेलियावरी काल । न्यायालयीं लागे निकाल । विप्र पुजारी असणे चाल-। तीच चालवा रामेश्वरी ॥४८॥न्यायालयीं मिळता न्याय । जंगम करिती हायहाय । पलायनाविण ना उपाय । जंगम करिती पलायन ॥४९॥विप्रवर्गा हर्श थोर । वाटती पेढे घरोघर । प्रसन्न जाहला रामेश्वर । सार्थक झाले सेवेचे ॥५०॥गोड पक्कान्ने, नैवेद्य सुरस । लोक करिती रामेश्वरांस । भजन, गायन उत्सवास । हर्षातिरेके भक्त करिती ॥५१॥गरिबां केलें अन्नदान । तेणे जाहले जन प्रसन्न । जंगम करिती पलायन । त्वरित रामेश्वरांतुनी ॥५२॥वासुदेव द्विज पुण्यवान । रामेश्वराचे करि पूजन । पुरान, कीर्तन नित्य करुन । प्रिय जाहले सर्व जनां ॥५३॥यतिवर्य असतां रामेश्वरीं । अतिवृद्ध जोडपे चरण धरीं । अश्रुपात करिती चरणांवरी । पुत्र संतान व्हावया ॥५४॥सखेद स्वामी तयां वदती । उभयता जाहल जर्जर अती । पुत्र व्हाया परि इच्छिती । अविवेक हा बरवा नसे ॥५५॥परतीर लागे ते दिसाया । आताम संतान आस वाया । स्मरा निशिदिनी रामराया । तोचि तारील परलोकीं ॥५६॥पुत्रप्राप्तीचा मोह भारी । न सुटे केला बोध जरी । निपुत्रतेचा शाप वारी । यास्तव करिती आक्रोश ॥५७॥परोपरीने बोध केला । साधणे तुम्ही निज हिताला । परि न सोडिती आग्रहाला । वदती व्हावाच पुत्र कीं ॥५८॥चिरंतन सुखा अवश्य मागा । सिद्ध मी ते द्यावया गा । नश्चर सौख्य मागणे त्यागा । तुमच्या हितास्तव सांगे मी ॥५९॥आलिंगुनी स्वामी-चरण । मरणे न आम्हां पुत्राविण । दया करोनि आशिर्वचन द्यावेचि आम्हा वृद्धांसी ॥६०॥समर्थ स्वामी मनीं द्रवले । होईल तुम्हा पुत्र वदले । वचन ऐकताम आनंदले । श्रीपद घेती निज माथीं ॥६१॥कालांतरे जाहला पुत्र । हर्ष । पावले ते अत्यंत । लोकीं आश्चर्य सर्वत्र । धन्य देणे समर्थाचे ॥६२॥योगेश्वराचा थोर महिमा । न कळे कदा निगमागमा । सामर्थ्यासी नसे सीमा । म्हणती जन त्यां ईश्वर कीं ॥६३॥भक्तजनां संतुष्ट करुनी । यतिवर्य निघती तीर्थाटणीं ।परस्परे प्रेम करुनी । निर्भर सुखे वर्तावे ॥६४॥द्वेष, भांडणे सोडावी । प्रेमवृत्ती ती धरावी । सर्वावरी माया करावी । देव तेणेचि संतोषे ॥६५॥संसार करिता परमार्थ चिंता-। कराल तरी साधाल हिता । सन्मार्ग केव्हा न सोडता-। जगी आजन्म वर्तावे ॥६६॥सूडबुद्धीस टाकावे । गरजवंता साह्य द्याए । मृदुवचने ते बोलावे । सदासर्वदा लोकांसी ॥६७॥सुखे नांदणे निजग्रामीं । पुढिल स्थळा जातो आम्हीं । सांगोनि निघती असे स्वामी । लोक ढाळिती प्रेमाश्रू ॥६८॥कोटीकूप या तीर्थसि आले । तदा तयाम्ना वृत्त कळले । द्रव्यासाठी गांजिती भले । यात्रेकरुंसी पुजारी ते ॥६९॥स्नानास तीर्थी श्री उतरता । अहोहो थांबा कुठे जाता । रौप्यमुद्रा आधी न देता । तीथस्नान करिता न ये ॥७०॥कोटिकूपाचे आम्ही धनी । आमुच्या आज्ञेविना कोणी । जाऊ न शकती तीर्थस्थानी । हेहि, तुम्हां नुमजे ॥७१॥चला आधी दक्षिणा काढा । लबाड दिसे हा गोसावडा । दाखवूका आम्ही थोडा-। हिसका आमुचा तुम्हासी ॥७२॥निघा चला बाहेर व्हावे । सांगतो तरी न ऐकावे । घटिंगणपणे की वर्तावे । हे न शोभते संन्याशा ॥७३॥विनम्रभावे यती वदती । द्यावया नसे द्रव्य हातीं । देणार कोठुनी दक्षिणा ती । सांगाच आपण भूदेव ॥७४॥गोड वदुनी फसवू नका । जाणतो आम्ही ऐशा ठका । व्यर्थ आमुचा घेऊ नका-। वेळ, सांगतो तुम्हासी ॥७५॥हमरी-तुमरीवरी येती । सक्रोध स्वामी तयां वदती । यात्रेस जातो आम्ही पुढती । यथेच्छ तुम्ही धन मिळवा ॥७६॥शिष्यसंघा सवे घेऊन । महातीर्थासि त्या वंदुन । तेथोनि जाता यति निघोन । हास्यकल्लोळ माजला ॥७७॥दुसरे दिनीं प्रातःकाळी । स्नानासि येतां भक्तमंडळी । जाता तीर्थाचिया जवळी । दृश्य दिसे त्यां भयंकर ॥७८॥दुर्गध सुटे आसमंत । पडले किडे जलाशयांत । जाउ न इच्छिती स्नानार्थ । तक्रार करिती लोक तदा ॥७९॥दक्षिणा घेता बळे करुन । तीर्थी भयंकर असे घाण । स्वच्छतेचे ते महिमान । कैसे न कळे पुजार्यांसी ॥८०॥बडव्यांसवे ते यात्रेकरु । तीव्र भांडणे लागले करु । परत दक्षिणा न दिल्या मारु । सोडणार ना तुम्हांसी ॥८१॥सेवेकर्यांसी धाक पडला । आता करावे काय याला । येथेचि आमुचा जन्म गेला । ऐसे कदापी ना घडले ॥८२॥त्यांतील तेव्हा एक वदला । अहो यतीनें शाप दिधला । ऐसेचि वाटे मन्मनाला । चला तयांचे चरण धरु ॥८३॥यतींस शोधावया निघती । अष्ट दिशांसी धुंडाळिती । सर्वत्र पाहुनी थकले अती । करु लागले आक्रोश ॥८४॥हिंडता, शोधिता सेवकारी । गेले कांहीं शृंगारपुरीं । शारदापीठ तेथले भारी । शंकराचार्य विद्वन्मणी ॥८५॥विधिज्ञ, वेदांत पारंगत । ज्योतिषशास्त्रांत निष्णांत । बहुभाषी ते महापंडित । सकल शास्त्रे जाणते ॥८६॥सद्धर्माची जणूं मूर्ती । योगशास्त्रीं अत्यंत गती । साश्रु नयनें तयां कथितो । घडले जे कीं स्वस्थानीं ॥८७॥वृत्त ऐकुनी चित्त द्रवले । वदले योग्यासि अवमानिले । तडी तापसी सिद्ध आले -। तयां वागवा अत्यादरे ॥८८॥पूजाअर्चा यज्ञ याग । करित असणे यथासांग । यात्रेकरुंसि उद्वेग-। येईल ऐसे वागू नका ॥८९॥सिद्ध, साधू, संत, योगी । हिंडती ते जागोजागी। सेवा कराया अग्रभागी । असणें तुम्हां उचित असे ॥९०॥आहांत तेथले सेवेकरी । भाग्य तुमचे खरोखरी । अनंत योनीं फिरल्यावरी । अमूल्य लाभे नरदेह ॥९१॥मान्य आपुला सुपदेश । सोडवा परंतू गळ्याचा फास । असतील कोठे हो जगदीश । कृपा करोनी सांगावे ॥९२॥तयांसि गेल्याविना शरण । होणार ना दुरित हरण । द्रव्यांध झाला हे कारण । अवमानिलेत योगेश्वर ॥९३॥शंकराचार्य धरितो ध्यान । सेवक बसती कर जोडुन । पंडे बसती श्वास रोधून । ऐकण्या आचार्य वदती ते ॥९४॥समाधे तयांची उतरल्यावर । गंभीर जाहला तयांचा स्वर । सामान्य नव्हते ते यतिवर । प्रत्यक्ष परमात्मा होते ते ॥९५॥अरेरे तुम्ही अति अभागी । मी जर असतो त्या जागी-। पूजिला असता तो विरागी । ह्रदयीं धरोनि पदकमलां ॥९६॥व्यर्थ धरोनी द्रव्याआशा । धिक्कारिले त्यां संन्याशा । घोर भयंकर कृत्या अशा । शिक्षा नरकवासाची ॥९७॥चुकलो, फसलो पूर्ण आम्ही । शरण येतसों वाचवा तुम्ही । ठरलो सेवक हो कुकर्मी । आत्मघातकी चांडाळ ॥९८॥पश्चात्तप्त पाहतां त्यांसी । शंकराचार्य ते निज मानसीं-। द्रवले, करा या उपायासी । त्वरित जावे रामेश्वरीं ॥९९॥ऐकतां आचार्य उद्वार । जाण्या जाहले अति अधीर । वदती आपुले उपकार थोर । साष्टांग नमुनी वंदिले त्यां ॥१००॥सोडुनी निघाले शृंगारपूर । आणि गांठिले रामेश्वर । सोडोनि सर्वही व्यवहार । त्वरित पावले ते मंदिरीं ॥१०१॥देवास घालुनी दंडवत । पाहतां जाहले अति विस्मित । भगवान् यतिवर्य हेच ते होत । यांस्तव सर्वत्र शोधिले ॥१०२॥अकस्मात येथे हे प्रगटले । भाग्य आमुचे हे गवसले । हर्षातिरेके वोळंगले । समर्थचरणी ते सेवक ॥१०३॥आक्रंदता प्रार्थना करिती । क्षमा याचितो आम्हि दुर्मती । द्रव्यार्थ होउनी उन्मत्त अती । अवमानिले हो योगेश्वरा ॥१०४॥कर जोडुनी होउनी दीन । वदती पुनरपी छळणार न । घालोनि चरणीं लोटांगण । शपथ घेती ईश्वराची ॥१०५॥पाहतां तयांची आर्त स्थिती । समर्थ द्रवले अंतरीं अती । निश्चिंत जावे तीर्थाप्रती । ऐकतां सारे आनंदले ॥१०६॥कोटितीर्थासि ते आले । जल पाहतां आश्चर्यले । सुगंध सर्वत्र तो दरवळे । प्राशितो जल अमृतमय ॥१०७॥अघटित करणी यतिंद्रांची । भगवंत ते जनां गमती । ऐशी थोरवी वर्णावयाची-। आहे अनेक अध्यायीं ॥१०८॥इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०९॥॥ श्रीस्वामीसमर्थ की जय ॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP