TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कथामृत - आरती दुसरी

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


आरती दुसरी
(चाल-आरती भुवन सुंदराची.)

करुया आरति स्वामिंची ।
प्रज्ञापुरि वसती ज्यांची ॥धृ०॥
स्वामी श्रीसद‌गुरु देवा ।
घडो मज तुझी चरणसेवा ॥१॥
तव सामर्थ्या नच सीमा ।
वर्णु मी कैसा तव महिमा ॥२॥
अससी प्राणसखा अमुचा ।
लागला ध्यास दर्शनाचा ॥३॥
दुस्तर संकटिं तुज स्मरता ।
धावा रात्रंदिन करिता ॥४॥
चाल-लीलया संकट हरतोसी ।
पामरां मायबाप गमसी ।
दुष्ट दमनार्थ काळ होसी ।
येउनी शरण ।
धरियले चरण ।
करुनिया हरण ।
आमुच्या भवभय दुरितांसी ।
चरणिं दे आश्रय दीनांसी ॥
करुया आरति.....
प्रज्ञापुरि वसती.....॥१॥
सिद्ध संतांत महासिद्ध ।
जगीं तूं असा अति प्रसिद्ध ॥१॥
श्रीगुरुदेव दत्त गमसी ।
उग्र नरसिंह कुणा दिससी ॥२॥
दंडुनी दुष्ट दुर्जनांसी ।
तयांना सत्पथ दाखविसी ॥३॥
भक्त तुज करुणार्णव वदती ।
जडो तव चरणीं मम प्रीती ॥४॥
चाल-श्रेष्ठ त्र्यैलोक्यीं तूं अससी ।
सुरगण तत्पर सेवेसी ।
सिद्धि तव लोळति पायांशी ।
तुझे महिमान ।
शेष भगवान।
वर्णिता शीण।
येउनी, मूक होय जाण ।
तिथे मी पामर मग कोण ॥
करुया आरति....॥२॥
घेउनि विविध स्वरुपांसी ।
आर्तजनइच्छा पुरवीसी ॥
योगिजन ध्यान तुझे करिती ।
तयांना पहब्रह्म गमसी ॥
चराचर सकल तुला शरण ।
असे तव अपूर्व महिमान ।
दुष्टिते रोग हरण करिसी ।
कुणाच्या मनोव्यथा हरिसी ॥
कराया प्रभु तव गुणगान ।
अल्पतरि देई मज ज्ञान।
चाल-कुणाला देउनि वरदान।
दिलेसी बहुगुणि संतान।
गरिबां केले धनवान।
दयामृतघना ।
तुजसि याचना ।
करित या क्षणा ।
भक्त भ्रमरासि पादपद्मीं ।
ठाव दे, म्हणुनि प्रार्थितो मी ॥
करुया आरति....।
प्रज्ञापुरि वसती....॥३॥
गगनिचे सूर्य-चंद्र तारे ।
वर्तती तव आज्ञाधारे ॥
ब्रह्मा, विष्णु, महादेव ।
प्रकटले तव रुपे देव ॥
स्वर्ग, पाताळ, मृत्युलोकीं ।
तुझा संचार तिन्ही लोकीं ॥
चाल-तुला ना जन्म आणि मृत्यु ।
अनादी, अनंत अससी तूं ।
सर्वही व्यापुनि उरसी तूं ।
प्रथम तुज स्फुरण ।
ध्वनी ॐ असुन ।
वेदिं हे वचन ।
विश्व हा खेळ निर्मिला तूं ।
ज्ञात, तुज काय यांत हेतू ॥
निरांजन ओवाळित तुजला ।
भाकितो करुणा पदकमलां ॥
निरंतर ठाव मिळो चरणीं ।
प्रार्थि तुज राम, चक्रपाणी ॥
करुया आरति....।
प्रज्ञापुरि वसती....॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-04-15T20:50:58.4370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

table vice

  • मेज शेगडा 
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site